होरेस वेल्स आणि भुलभुलैय्या

होरेस वेल्स आणि भुलभुलैय्या पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आठवते, "मला तथाकथित अवतारी पुरुषांपेक्षा, ज्या व्यक्तीने भूल देण्याचे औषध शोधून काढले त्याचा आदर वाटतो" खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बुवा, बापू, अम्मा, फेकू इत्यादी मंडळी केवळ शब्दाचे बुडबुडे उडवतात, ऐकताना काही क्षण मानवाला दिलासा मिळतो. पण ना दुःख कमी होते ना वेदना..😔 मानवाच्या आयुष्यातील वेदना कमी करण्याचं खूप मोठं काम भूलतज्ञ आणि प्रतिजैविकं यांनी केलं आहे. मात्र नायट्रस ऑक्साईड हा वायू जगाच्या वेदना शमऊ शकेल असा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला, त्याच्या हयातीमध्ये त्याला याचं क्रेडिट कधीच मिळालं नाही. शेवटी स्वतःच्या मानसिक वेदना शमवण्यासाठी त्याला मृत्यूचा आधार घ्यावा लागला.😭 भूल देऊन शस्त्रक्रिया करण्याची सोय नव्हती तेव्हा कसं होत असेल याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. युद्धामध्ये जखम झाली की सैनिकांना प्रतिजैविकाअभावी गॅंगरीन व्हायचा, आणि तो भाग काढून टाकला नाही तर जीवावर बेतायचं. आणि तो भाग काढून टाकताना होणाऱ्या वेदना... त्या कोण सहन करणार, त्यापेक्षा लोकं मृत्यू पत्करायची. सन ११९९ मध्ये इंग्...