Posts

Showing posts from June, 2021

मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली

Image
 मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली. कहाणी १. एकोणीसावं शतक संपत असताना एका संस्थेमध्ये एक मुलगी गणित आणि शास्त्र शिकण्यासाठी दाखल होते. संपूर्ण वर्गामध्ये ती एकमेव महिला असते. शिक्षण घेत असताना एका सहाध्यायाच्या प्रेमात पडते, गर्भवती होते, त्यामुळे शिक्षणाकडं दुर्लक्ष होतं, आणि पदविका न मिळवता तिला बाहेर पडावं लागतं. ती त्या सहाध्यायाशी लग्न करते.. तिच्या आयुष्यात ती कधीच चमकलेली दिसत नाही, मात्र तिचा नवरा खूप मोठा शास्त्रज्ञ होतो. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर पंधरा वर्षांनी ती दावा करते की नवऱ्याच्या संशोधनामध्ये माझंदेखील महत्त्वाचं योगदान आहे. मात्र तिचं बोलणं कोणीही गंभीरपणे घेत नाही.. कहाणी २. एक दिलफेक स्वभावाचा देखना, हुशार आणि व्हायलीन वगैरे वाजवणारा मुलगा.. थोडक्यात डीडीएलजे मधील आपला शाहरुख.. नुकतचं ब्रेक-अप झाल्यामूळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी धडपडणारा… शिक्षण घेण्यासाठी संस्थेमध्ये दाखल होतो, वर्गामध्ये असलेल्या एकमेव मुलीच्या मागे लागतो. ती मुलगी दिसायला साधारणच, मात्र प्रचंड बुद्धिमान. कदाचित या बुद्धिमत्तेच्या तेजानेच त्याचे डोळे दिपल

डॉ. शकुंतला थिलस्टेड : पौष्टिक शास्त्रज्ञ

Image
 डॉ. शकुंतला थिलस्टेड : पौष्टिक शास्त्रज्ञ पालन-पोषण हा शब्द आपण जोडूनच वापरतो. मात्र पालन आणि पोषण यामध्ये खूप अंतर आहे. एकीकडे सुबत्ता असताना मम्मीच्या हौसेखातर, समाधानाखातर बालकांना ठोसून ठोसून खायला घातलं जातं, मात्र त्या अन्नामध्ये पोषण असेलच असं नाही. 😞 पिझ्झा, बर्गर, मॅगी आणि मैदायुक्त पदार्थ खायला घालून घालून बालकाचं देखील मैद्याचं पोतं करून टाकतात. त्यांचे बाळ गुटगुटीत जरी दिसत असलं, तरी ते कुपोषितच असतं. दुसरीकडे अन्नाचं प्रचंड दुर्भिक्ष.. (हजारे अन्ना नाही.. ते सोयीने उगवतं, मावळत असतात) मुलं कुपोषित होतात यात पालकांचा नाईलाज असतो. रात्रंदिन काबाडकष्ट करून देखील हाताची आणि तोंडाची गाठ पडायची मुश्किल. भात भात करून प्राण सोडलेली मुलगी अजून आपल्या विस्मृतीत गेली नसेल.😞 जगातील ७० कोटी लोक आजही उपाशी झोपतात, दोन अब्ज म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश व्यक्ती कुपोषित आहेत. या भुकेविरुद्ध आणि कुपोषणाविरुद्ध लढण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. आणि या लढ्यात भरीव कामगिरी करणार्यांना जागतिक खाद्य पुरस्काराने गौरवण्यात येतं. यावर्षी हा पुरस्कार भारतीय वंशाच्या डॉ. शकुंतला थिलस्टेड यांन

ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.

Image
 ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.        ५ जून १८३३ चा दिवस. चार्ल्स बॅबेज, ज्याला आपण “कॉम्प्युटरचा पप्पा” म्हणतो, त्याच्या घरी पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता किंवा प्रतिष्ठा यापैकी कोणताही एक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच निमंत्रित केलं होत. या पार्टीत एक १७ वर्षाची मुलगी आलेली असते. विशेष म्हणजे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि प्रतिष्ठा हे तीनही निकष तिच्याबाबत पूर्ण होत असतात. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना चार्ल्स बॅबेज आपलं बहुचर्चित “डिफरन्शीयल इंजिन” दाखवतो. आणि त्या इंजिनकडे सर्वात कुतूहलानं पाहणारी एकमेव व्यक्ती ती सतरा वर्षाची तरुणी असते. इथेच चार्ल्स बॅबेजला आपली शिष्या मिळून जाते.❤️ त्या तरुणीचं नाव होतं ॲडा लव्हलेस.. आपल्यापैकी बहुतेक जणांनी चार्ल्स बॅबेज हे नाव ऐकलेलं असतं, मात्र ॲडा लव्हलेस हे काहीसं अंधारात असलेलं नाव.. जाऊ द्या..शेक्सपियर म्हणून गेला आहेच की नावात काय आहे… इथं मात्र नावात एक गंमत आहे. ॲडा, जीचं बालपण लव्ह लेस होतं. आई बापाच्या प्रेमाविना जे करपून गेलं.. गावभर प्रेम वाटणारा बाप होता, तरी हिच्या वाट्याला काहीच प्रेम आलं नाही