Posts

Showing posts from March, 2021

ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️

Image
ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️ सध्या उत्क्रांतीवादाला वाईट दिवस आले आहेत. शालेय अभ्यासक्रमातून त्याला वगळण्यासाठी सरकार आग्रही आहे. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना उत्क्रांतीचे वावडे असणे स्वाभाविक आहे. कारण एकदा तुम्हाला उत्क्रांतीचे तत्व समजले की तुम्हाला कोणत्याही देव आणि धर्म संकल्पनेची गरज लागत नाही. सर्व मानवांचा पूर्वज एकच असल्याने वंश आणि प्रांतवादाच्या भिंती देखील गळून पडतात. उत्क्रांतीवाद आणि मानवतावाद यांना वेगळं काढता येत नाही. मानवता हेच जीवनासाठी आवश्यक सुंदर मूल्य समजत असलेला हा व्यक्ती इतर बंधने नाकारतो. आज आपण एका खानदानी उत्क्रांतीसमर्थकाची आणि मानवतावाद्याची ओळख करून घेणार आहोत. "खानदानी" यासाठी की आजोबा टी एच हक्सले यांनी देखील उत्क्रांतीचा हिरीरीने प्रचार केला आणि तोच वारसा ज्युलियन हक्सले यांनी देखील जपला.   सर ज्युलियन साॅरेल हक्स्ले... एक शास्त्रज्ञ, एक लेखक, एक पक्षीनिरीक्षक, ऑस्कर विनिंग डॉक्युमेंट्री बनवणारा एक अवलिया.. एक युजीनिक्सवादी जो पुढील काळात मानवतावादी बनला, एक शिक्षणतज्ञ ज्याने प्राणिमात्रांच्या संवर्धनासाठी वर्ल्ड वाइ

होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ

Image
होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ भारतामध्ये आयटी नियम २०२१ लागू करण्यात आले आहेत, ज्याद्वारे वेबपोर्टलवरील बातम्यांवर डायरेक्ट शासनाचे नियंत्रण येणार आहे. वेबपोर्टल वरील हवे ते कन्टेन्ट काढून टाकण्यात किंवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार शासनाला म्हणजे पर्यायाने बाबूलोकांना असणार आहेत. द वायरचे संस्थापक त्याविरोधात न्यायालयात देखील गेले आहेत. टीव्हीवरील तर जवळपास सर्वच चॅनल सरकारचीच वकिली करत असतात. लोकांची डोकी बथ्थड करायचा कारखाना जोरात सुरू आहेच ना. 😭अर्थात तिथे केवळ भक्त बळी पडतात.. मग त्याऐवजी असे केले तर...🙄 सरकारने सरसकट सर्व जनतेचं प्रोग्रामिंग केले तर.😬😬 आजपासून ५० वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञाने मानवी मेंदूचे प्रोग्रामिंग करता येते असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. केवळ मानवी मेंदू नाही तर प्राण्यांच्या मेंदूवर देखील त्याने अनेक यशस्वी प्रयोग केले होते. नैतिक अनैतिकची, मानवतेची व्याख्या बदलली, मानसिक रुग्णांवर उपचार करताना काहीसे अघोरी वाटणारे, वैज्ञानिक परिभाषेत बसतील असे अभिनव प्रयोग केले. मात्र सनसनाटी निर्माण करत असले तरी वैद्यकीय जगात त्याच्या प्रयोगांना

दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ

Image
दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ काल आपण दोन आंतरराष्ट्रीय महिला शास्त्रज्ञांची माहिती घेतली, आज महिला दिना निमित्त भारतीय शास्त्रज्ञेची ओळख करून घेऊ. आपल्याकडे एक गमतीशीर विरोधाभास दिसून येतो. ज्या महिला वैज्ञानिक दृष्टिकोनापासून खूप दूर असतात, त्यांनी सणासुदीला नटणे आणि लग्नसमारंभात शोभेची बाहुली बनून मिरवणे यामध्ये त्यांच्या  आयुष्याला मर्यादित करून घेतलेले असते, आणि त्यावेळी स्त्रीमुक्तीच्या घोषणा करणारे किंवा स्त्रीवादी असलेल्या कार्यकर्त्या "साधी राहणी दाखवण्याच्या" प्रयत्नात एक पोशाखी व्यक्तिमत्व बनून वावरतात. पुरुष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देखील हे लागू होते. टागोरांसारखा गेटअप केला म्हणून तुम्हाला कोणी गुरुदेव म्हणत नसतं, तसेच केवळ मफलर गुंडाळला म्हणून तुम्हाला कोण "चळवळ्या" समजत नसतं. आपली ओळख केवळ पोशाखापूरती मर्यादित न राहता आपल्या कामातून व्हावी.   शास्त्रज्ञ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं.. केस वाढलेला, कपडे अस्ताव्यस्त असलेला, जगाचे भान असलेला अवलिया, मात्र शास्त्रज्ञ महिला असेल तर थोडेसे छान, केस व्यवस्थित कापलेल

बार्बरा लोव्ह : आदर्श शिष्या, आदर्श गुरू आणि संशोधक

Image
बार्बरा लोव्ह : आदर्श शिष्या, आदर्श गुरू आणि संशोधक ऑक्सफर्डमध्ये एका प्राध्यापिकेचे नेमणूक झाली मात्र तिने केवळ मुलींना शिकवायचे होते. मुलांना शिकवायला मनाई केली होती. त्या प्राध्यापिकेने या अपमानाकडे संधी म्हणून पाहिली आणि महिला शास्त्रज्ञांची मोठी फळी उभी केली. आपल्या गुरूचा वसा चालवत त्यातील एक शिष्येने हीच चळवळ अमेरिकेत सुरू केली. मूलभूत संशोधनात तर या गुरुशिष्येचे बहुमूल्य योगदान आहेच पण विज्ञानातील पुरुषसत्ताक यंत्रणेला आव्हान देत महिला शास्त्रज्ञांची फळी निर्माण करण्याचे देखील त्यांना निर्विवाद श्रेय जाते. यातील गुरू होती डोरोथी हॉजकिन तर शिष्या होती बार्बरा लोव्ह. बार्बराचा जन्म इंग्लंडमधील लँकॅस्टर येथे २३ मार्च १९२० रोजी झाला. मॅथ्यू लोव्ह आणि मेरी जेन व्हार्टन या किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या दाम्पत्याच्या दोन मुलींपैकी बार्बरा ही मोठी. मार्जोरी तिची छोटी बहिण. घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे कोणतीही गोष्ट मागितली की लगेच मिळाली नाहीच, त्यासाठी वाट पहावी लागायची, संयम ठेवायला लागायचा. हीच बाब तिला संशोधनात देखील उपयोगी पडली. गरीबीची जाणीव असल्यामुळेच, तिने

डोरोथी हॉजकिन : जीवरसायन शास्त्रातील तपस्विनी

Image
डोरोथी हॉजकिन : जीवरसायन शास्त्रातील तपस्विनी मेरी क्युरी आणि तिची आयरीन क्युरी मुलगी यांच्यानंतर रसायनशास्त्रात तिसरे नोबेल पारितोषिक मिळवलेली एक शास्त्रज्ञा होती.. जिला तिच्या विचारसरणीमुळे अमेरिकेत यायला बंदी घालण्यात आली होती. जी आयुष्यभर मजूर पक्षाची समर्थक होती तरीदेखील हुजूर पक्षाच्या मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या केबिनमध्ये तिचा फोटो होता. कम्युनिस्ट विचारांची नव्हती तरी तिला लेनिन शांतता पुरस्कार मिळाला. ब्रिटनमधील पहिल्या दहा वैज्ञानिक महिलांमध्ये जीचा समावेश होतो अशी शास्त्रज्ञा, रॉयल सोसायटीची सभासद आणि सर्वात महत्वाचे इन्सूलिनची रचना शोधण्यासाठी तब्बल ३५ वर्षे विज्ञानाची तपस्या करणारी तपस्विनी म्हणजे डोरोथी हॉजकिन. खरे तर डोरोथी मेरी क्रोफुट हॉजकिन असे तिचे भले मोठे नाव ब्रिटिश अर्काइव्ह मध्ये नोंदवले आहे. तिचे लग्नापूर्वीचे नाव डोरोथी मेरी क्रोफुट होते, डोरोथी हे तिचे, मेरी हे आईचे तर क्रोफुट हे वडिलांचे आडनाव. थॉमस हॉजकिन याच्याशी विवाह झाल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तिने मेरी वगळून क्रोफुट पुढे हॉजकिन हे नवऱ्याचे आडनाव जोडले, (अगदी आपल्या दीक्ष