Posts

Showing posts from October, 2020

"द अमेझिंग" जेम्स रँडी

Image
"द अमेझिंग" जेम्स रँडी "आज कुछ तुफानी करते है.." मनुष्य स्वभावातील साहसवेडाला साद घालून आपले प्रोडक्ट विकताना अनेक ब्रँड पाहिले आहेत.. जेम्स रँडी हा व्यक्ती नसून एक ब्रँडच .. नायगारा फॉल वर "खाली डोके वर पाय" करून टांगलेल्या, हात बांधलेल्या अवस्थेतून स्वतची सुटका करून घेणारा प्रयोग असो.. किंवा युरी गेलर, पिटर पॉपऑफ यांसारख्या भोंदूविरुद्ध दिलेला चिवट लढा... रँडीचे आयुष्य रोजच तुफानी होते... आपल्या ब्रँडपॉवरचा उपयोग करून त्यांनी भोंदूगिरीवर चांगला चाप बसवला..  विसावे शतक... जसे नव्यानव्या वैज्ञानिक शोधांनी गाजले त्याच वेळी पारलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू बाबांचे देखील जगभर पेव फुटले होते.. दैवी उपचारांचा दावा, हातचलाखी किंवा विज्ञानाचा वापर करून लोकांची सर्रास फसवणूक होत होती. जगभरचे विवेकवादी याविरुद्ध लढा देऊ लागले.. या चळवळीत सुरुवातीच्या अब्राहम कोवूर, बी प्रेमानंद यांसारख्या शिलेदारांमध्ये जेम्स रँडी यांचे पण नाव घ्यायला लागेल. (पांढरी दाढी ही तिघांची पण ओळख.. 😀) एकाच वेळी ब्रँडपण आणि विचारवंत पण..... होय "द अमेझिंग" रँडी भा

धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे

Image
धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे? तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे? या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना! कालचे सारे मुके आज बोलू लागले अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना! तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना! धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना! -सुरेश भट पिढ्यापिढ्याच्या गुलामगिरीच्या जोखडाला झुगारून लाखो मानवांना बाबासाहेबांनी धम्माचा.. मुक्तीचा रस्ता दाखवला त्या घटनेला आज अशोकविजयादशमीला चौसष्ठ वर्ष पूर्ण होतील. खरं तर मी १४ तारखेचा आग्रही आहे, अश्विन शुद्ध दशमी या तिथीबाबत नाही.. मात्र या तिथीला सम्राट अशोकने धम्म स्वीकारला होता, म्हणून बाबासाहेबांनी हाच दिवस मुद्दाम निवडला होता असं अनुयायांचे म्हणणं आहे.. असो....  या वर्षी कोरोना मुळे दीक्षाभूमीवर लाखो लोकांचा समुदाय धम्मचक्रप्रवर्तनाचा दिवस साजरा करण्यापासून वंचित राहणार आहे. हा दिवस क्रांतीचा... युगायुगाचा अंधार कापत

रॉबर्ट बॉयल.. किमयागार

Image
रॉबर्ट बॉयल.. किमयागार मानवाच्या इतिहासात जेव्हा सोने हा क्रय धातू झाला.. तेव्हापासून मानवाला त्याचा हव्यास. मिळेल तो धातू सोने कसे करता येईल यासाठी मानवाने प्रचंड प्रयत्न केले... जगभरात लाखो किमयागार इतर धातूपासून सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते.. प्रयोगांच्या अपयशासोबत अनेक दंतकथा जन्माला येत होत्या..मात्र रसायनांवर वारंवार प्रयोग करण्यातून मानवाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजत गेला आणि रसायनशास्त्र विकसित होऊ लागले..  या शास्त्राचा जनक समजला जातो रॉबर्ट बॉयल. रॉबर्ट बॉयलचा जन्म अगदी अलीकडचा.. सतराव्या शतकात. त्याआधीच मानवाने रसायनांचा वापर करून वस्तू तसेच औषध निर्मितीमध्ये मोठी मजल मारली होती. भारतात नागार्जुन यांनी लिहलेले रसायनशास्त्र विषयावरील ग्रंथ जगभर अनुवादित करून वाचले जात होते. मात्र तर्क, प्रयोग, निरीक्षण, अनुमान आणि पुनप्रचीती या वैज्ञानिक दृष्टिकोनातील अंगभूत बाबींचा केलेला वापर पाहता गॅलिलिओ हाच "सर्व आधुनिक विज्ञानाचा जनक" मानला जातो. रसायनशास्त्रासाठी हा मान गॅलीलिओचा एकलव्य शिष्य रॉबर्ट बॉयल याला मिळतो. २५ जानेवारी १६२७ रोजी आयर्लंड मध्ये रॉबर्ट चा ज

चार्ल्स डार्विन.. माकडाशी नाते जोडणारा सेपियन.

Image
चार्ल्स डार्विन.. माकडाशी नाते जोडणारा सेपियन.  मानवाची बुद्धी जेव्हा विकसित होऊ लागली तेव्हा त्याला प्रश्न पडू लागले... एवढा अचूक मनुष्यदेह बनवणारा निर्मीक किती कुशल कारागीर असेल.. देव संकल्पनेचा जन्म तिथे झाला.. नंतर अनेक संस्कृती आल्या.. काळाच्या ओघात नष्ट झाल्या.. अनेक धर्म आले.. आणि त्यांचे धर्मग्रंथ आले, ज्यात देव आणि सृष्टीची निर्मिती हाच विषय प्रमुख होता... हा जो निर्मीक आहे,  तो सुद्धा कुणाची तरी निर्मिती असेल असा प्रश्न उपस्थित झाला तर तो मात्र स्वयंभू असे सोयीस्कर उत्तर दिले जायचे. यावर शंका उपस्थित करायची तर पर्यायी सिद्धांत मांडावा लागणार..  जोवर प्रकाश नसतो तोवरच अंधार असतो.. चार्ल्स डार्विनने उत्क्रांती चा सिद्धांत मांडला... मानवाचा पूर्वज कोण होता, जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली याचे कोडे सुटले.. आणि देव संकल्पनेची गरज राहिली नाही.. म्हणजे एका अर्थाने देवाला रिटायर करणारा माणूस म्हणजे चार्ल्स डार्विन.. चार्ल्सचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी इंग्लंडमध्ये शॉर्पशायर जवळच्या एका खेडेगावात सधन कुटुंबात झाला.  वडील नामांकित डाॅक्टर, आई पण श्रीमंत घरातून आलेली.. सगळ

नक्षत्रांचे देणे...

Image
नक्षत्रांचे देणे कॅलेंडरमध्ये अनेक गमतीशीर बाबी असतात.. पण लहानपणापासून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत येतो... कारण त्या बाबी महत्त्वाच्या वाटत नाहीत.. मात्र कधी घरात धार्मिक कार्य करायचे असेल त्यावेळी मात्र तिथी पाहिली जाते.. या महिन्यात १ ऑक्टोबर २०२० रोजी पौर्णिमा होती जी मध्यरात्रीनंतर २.३४ वाजता संपली..   तुम्हाला प्रश्न पडला असेल की पौर्णिमेचा चंद्र तर सकाळी मावळनार मग पौर्णिमा आधीच कशी संपते...  तिथी आणि सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त याचा काही संबंध नसतो.. तिथी हे तर नक्षत्रांचे देणे.. केवळ हेच नाही तर मराठी बारा महिन्याला मिळालेली नावे ही पण नक्षत्रांची देणं.. याशिवाय आपल्या ओळखीची कोणी अश्विनी,  रोहिणी, आश्लेषा, फाल्गुनी, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, रेवती असेल तर तिचे नाव हे पण नक्षत्रांची देणं....😀😀 आकाशात अब्जावधी तारे तारका आहेत.. मात्र आपला चंद्र, सुर्य ( खर तर पृथ्वी) आणि इतर ग्रह यांचे फिरणे एका विशिष्ठ पट्ट्यातून होते..जमिनीवरून झोपून पाहिले.. तर दिसणाऱ्या अवकाशाचे उत्तर ते दक्षिण क्षितिज असे १८०° मध्ये विभागणी केली असता मध्यबिंदू पासून + -

अधिक महिना + लिप वर्ष ~

Image
अधिक महिना + लिप वर्ष ~ "यावर्षी कोरोना मुळे नवरात्र पण साजरी झाली नाही वाटत.. अजून पेपरला फोटो आले नाहीत बायकांचे" आमच्या आईचे निरीक्षण... तिला बोललो "अग नवरात्र सुरू व्हायचे आहे" "अरे पण पितर पाक तर संपला की"  तिला सांगितले " यावर्षी अधिक महिना आला आहे." आई वैतागली... "अरे देवा, दुष्काळात तेरावा महिना का?" या टोनमध्ये बोलली जणू काही अधिक महिना आल्याने कोरोना त्याचा मुक्काम वाढवणार आहे 😀.. पण हा अधिक महिना येतो कुठून..  जगामध्ये सर्वच संस्कृतीमध्ये कालगणना करताना ऋतुंची सांगड घालण्यात आली आहे. आदीम अवस्थेत ऋतु मोजायला सूर्य मावळताना पूर्वेकडे उगवणारे नक्षत्र पाहिले जायचे.. तर तिथी मोजायला सर्वात सोपी बाब होती चंद्रकला पाहायचे. (चंद्रकला म्हणले की पिंजराच आठवतो राव❤️) चंद्राच्या कलेच्या अनुषंगाने मानवाने चांद्रमास बनवले.. २९.५ दिवसांचे मासिक चक्र मानवाच्या सर्वच संस्कृतीमध्ये वापरले जाऊ लागले.. सूर्याचे (खर तर पृथ्वीचे) ३६५ दिवसांचे चक्र मानवाच्या लक्षात आले..  एका दिवसात किती तास असावेत आणि त्या तासात किती मिनि