Posts

Showing posts from September, 2021

एकांकिका : विज्ञानशलाका कमला

Image
 एकांकिका : विज्ञानशलाका कमला एकांकिका विज्ञान शलाका कमला पात्रे :  १) कमला भागवत सोहोनी  २) नारायणराव भागवत ३) सी वी रमण ४) श्रीनिवासय्या ५) स्वामी (शिपाई) ६) गुप्ता (आस्थापना अधिकारी)  ७) डॉ सरस्वती ८) निवेदक : स्त्री असल्यास उत्तम.  प्रवेश पहिला  (प्रकाश व्यवस्था करणे शक्य असल्यास रंगमंचावर मध्यभागी प्रकाश पडतो.. आणि निवेदक दिसू लागते.) निवेदक : नमस्कार मंडळी.. आज आपण एका विज्ञानशलाकेची गोष्ट ऐकणार आहोत. कमला भागवत सोहोनी यांची... काय म्हणता… यांचे नाव कधी ऐकले नाही.. अहो या कमलाबाई म्हणजे विज्ञानात PhD मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला. अर्थात आपल्याकडे सिनेजगतातील तारकांना प्रसिध्दी मिळते, विज्ञानातील तारकांना नाही.  कमलाबाईंचे स्थान तर सर्व तारकांमध्ये ध्रुवाप्रमाणे अढळ…  तरीही आज नव्या पिढीला त्यांची माहिती नाही. म्हणून तर त्यांची कहाणी नव्याने सांगणे गरजेचे झाले आहे. आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची दारे खुली केली.. आणि स्त्रियांनी त्यांचे क्षितिज रुंदावत गगनी झेप घेतली. खरेच आहे.. मात्र आजही आपण एक गोष्ट विसरतो, भारतात जन्मलेल्या एकाही महिलेला अद्याप नोबेल

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

Image
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या  आज १५ सप्टेंबर.. ही पोस्ट वाचायच्या आधी सकाळीच तुम्हाला "हॅपी इंजिनिअर्स डे" चा msg पण आला असेल, अनेक इंजिनिअर मंडळींना आज प्राऊड वगैरे देखील वाटत असेल. (तसेही त्यांच्या आयुष्यात प्राउड फील करायचे दिवस खूप कमी येतात.) मात्र बहुतेकांना आज मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस आहे एवढेच माहीत असते, त्यांनी केलेलं डोंगराएवढं काम फार कमी लोकांना माहित असते, म्हणून आजची पोस्ट. एक अशी व्यक्ती जिला भारतातील आठ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली आहे, ब्रिटिश काळामध्ये सर हा किताब मिळाला होताच, भारत सरकारने देखील भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.  ही अशी विलक्षण व्यक्ती, जिला भारतरत्न या पुरस्कारासाठी विचारले असता ती म्हणते "हा पुरस्कार घेऊन पुढं भविष्यात मी सरकारविरोधी बोलू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर हा पुरस्कार मला नको." मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना या व्यक्तीचे महत्त्व पटलेलं असतं, सरकारवर टीका करण्याचा अधिकार अबाधितच असल्याचं खुद्द पंतप्रधानांनी कळवल्यानंतर ही व्यक्ती पुरस्कार स्वीकारते. असा पंतप

जानकी अम्मल : विज्ञानाची गोडी देणारी माऊली

Image
जानकी अम्मल : विज्ञानाची गोडी देणारी माऊली विज्ञानक्षेत्रात पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमला सोहोनी यांची माहिती आपण घेतली, मात्र त्यांच्याआधी एका भारतीय महिलेला अमेरिकन विद्यापीठाने विज्ञान क्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केली होती. अमेरिकन विद्यापीठास या व्यक्तीचा सन्मान करावा वाटला अशी कोण ही महिला होती? लंडनमधील जॉन इनिस संस्थेला वाटले की या व्यक्तीच्या नावे शिष्यवृत्ती द्यावी, सी वी रामन यांना वाटते की त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत या व्यक्तीने फेलो म्हणून यावं. पंडित नेहरूंना वाटत होत की या व्यक्तीने नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात यावं. इंडियन ॲकाडमी ऑफ सायन्स मधील पहिली स्त्री संशोधिका असलेली ही व्यक्ती म्हणजे "जानकी अम्मल".  वनस्पतीशास्त्रातील आपल्या कामातून जगभर दबदबा निर्माण करणाऱ्या तरीही आयुष्यभर अगदी जमिनीवर राहून साधे जीवन जगणाऱ्या जानकी.. उसाची गोडी वाढवणारी एक शास्त्रज्ञा म्हणून ती भारतात प्रसिद्ध (?) असली तरी (जरा शंका आहे, प्रसिद्ध आहे की नाही, भारतात कुठे हो शास्त्रज्ञांना प्रसिध्दी मिळते, मात्र ज्यांना माहीत त्यांना ती उसाची गोडी वाढवणारी म्हणून माहित असण्य