Posts

Showing posts from December, 2022

झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक

Image
झुरळ: काटकी कीटक, नाटकी कीटक आपल्या पुराणात हनुमान, विभीषण, व्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा, परशुराम, बळीराजा ही सात लोकं चिरंजीव मानली गेली आहेत. पृथ्वीच्या अंतापर्यंत ती जिवंत राहणार असे पुराण कथांमध्ये ठोकून दिले आहे. मात्र पृथ्वीच्या अंतापर्यंत मानव वंशातील कोणी राहील की नाही ते माहित नाही, झुरळ मात्र नक्की राहील. राहुल द्रविड सारखी भक्कम बचावप्रणाली असल्याने झुरळ वंश नाबाद राहण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत सर्वात अधिक आहे. "ओगी अँड द कॉकरोचेस" हे कार्टून ज्यांनी पाहिले असेल त्यांना तर पक्के माहित असेल की आपण या झुरळांचे काहीच करू शकत नाही, त्यांचे सहअस्तित्व मान्य करूनच आपल्याला जीवन जगावे लागणार आहे. 🤪 सुमारे ३५ कोटी वर्षापूर्वीच्या झुराळाचे जीवाश्म सापडले आहे.. म्हणजे जेव्हा डायनोसोर या पृथ्वीवर गर्जत होते, तेव्हा त्यांच्या शेजारी झुरळ आपल्या मिशा परजत होते. डायनोसोरचा अंत या झुरळांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे, आणि तेव्हा कदाचित ते म्हणाले देखील असतील, "हमको मिटा सके, जमाने मे वो दम नही, हमसे जमाना है, जमाने से हम नाही." 😀 हिंदी डायलॉग वरून आठवले, हिंद

राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण

Image
राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यांच्या निमित्ताने जेवढी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा भारतात सर्व भाषेतील न्यूज चॅनल्स मनोभावे करतातच. काही महिन्यांपूर्वी एका न्यूज चॅनलला तर असं दाखवलं की एका इंग्रजी महिन्यामध्ये दोन चंद्रग्रहणे येत आहेत, तर नक्कीच अशुभ काळ सुरू होणार आहे. खरंतर अंधश्रद्धा आणि दहशत पसरवल्याबद्दल अशा चॅनलवर कारवाई व्हायला हवी. सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यामागे केवळ गणित असते. आणि ते गणित आपल्या पूर्वजांना हजारो वर्षापूर्वीच चांगले माहीत झाले होते. मात्र आज एकविसाव्या शतकात जेव्हा प्रसिध्दीमाध्यमातील प्रतिनिधी त्यांचे अज्ञान प्रदर्शित करत असतात, तेव्हा त्यांची कीव येते. राहू केतू हे राक्षस असून खरच सूर्य चंद्राला गिळतात असेही कदाचित त्यांना भविष्यात वाटेल.. खरं तर त्यांच्या बुद्धीला ग्रहण लागलेलं असतं.😭😭 आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास अगदी अचूकपणे करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे भविष्यातील ग्रहणे कोणत्या तारखेला किती वाजता येणार आहेत, ती कुठून दिसणार आहेत हे आपण अगदी अचूकपणे सांगत असतानाच न्यूज

धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच

Image
धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच डावकिनाचा रिच्या धूमकेतू.. अवकाशातील एक आकर्षक मात्र दुर्मिळ आविष्कार. धूळ आणि बर्फाचा बनलेला एक मोठा आकार जो सूर्याभोवती फिरतो. लांब आणि प्रकाशमान शेपटामुळं धूमकेतू अतिशय सुंदर दिसतात. आणि ते क्वचितच दिसतात म्हणून त्यांना भाव मिळतो. जसं आमिर खान वर्षा-दोन वर्षांतून एकच चित्रपट काढतो तर लोक उत्सुकतेनं वाट पाहतात, तोवर अक्षय कुमारचे पाच सहा चित्रपट कधी येऊन जातात ते पण कळत नाही.😭 या आकाशस्थ हिरोला भाव देत आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून धूमकेतूंचं निरीक्षण नोंदवलं आहे. लांब पांढरे केस मोकळे सोडून फिरणाऱ्या झिपऱ्या म्हातारीप्रमाणे त्यांना धूमकेतू वाटला. अर्थात त्यांच्या काळात हॅरी पॉटर सिरीज आली असती तर त्यांनी हॅरीच्या झाडूची उपमा धूमकेतूला दिली असती.🤔 आकाशात आपल्या नेहमीच्या ग्रहताऱ्यांपेक्षा काही वेगळे घटक देखील फिरत असतात. अशनी किंवा ॲस्ट्रॉईड हे देखील त्यापैकी एक. आपल्या सौरमालेत मंगळानंतर आणि गुरुपूर्वी ॲस्ट्रॉईडचा मोठा पट्टा आहे, ज्यामध्ये लाखो अशनी देखील सूर्याभोवती फिरत आहेत. याशिवाय भरपूर लहानमोठे घटक अंतराळात फिरत असतात, कधीकधी ते गुरुत्