Posts

Showing posts from March, 2022

असीमा मुखर्जी चॅटर्जी

Image
असीमा मुखर्जी चॅटर्जी : आणि त्यांची असीम कामगिरी xx गुणसूत्रे घेऊन जन्म झालेली व्यक्ती असो किंवा xy.. व्यक्तीच्या कर्तुत्वाला या गुणसूत्रावरून निसर्गानं बंधनं घातली नाहीत, समाजानं घातली आहेत. हे आजच्या काळातही खरे आहे की xy गुणसूत्रे घेऊन तुम्ही जन्माला आला असाल, तर तुम्हाला तुमचे कर्तुत्व दाखविण्याची अधिक संधी मिळते, अजूनही xx गुणसूत्रे असलेल्या बहुतेक व्यक्तींना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई करावी लागते. त्यातील काहीच ही लढाई जिंकतात. अशा या लिंगभेद करणाऱ्या समाजात शंभर वर्षापूर्वी जन्मलेल्या स्त्रीची कहाणी जाणून घेऊ, विज्ञानाच्या पुरुषप्रधान क्षितिजावर महिलांचं वेगळं स्थान निर्माण करून जी अजरामर झाली आहे. जी भारतीय विज्ञान काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती. भारतीय विद्यापीठामध्ये विज्ञान क्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेली ही पहिली महिला. पद्मभूषण असीमा मुखर्जी चॅटर्जी, सेंद्रिय रसायनशास्त्रात केलेल्या असीम करणारी ही विदुषी, ज्यांनी शोधलेली औषधे कर्करोग, फिट येणे, हिवताप यावरील उपचारासाठी वापरली गेली, काही आजही वापरली जातात. भारताचं नोबेल पारितोषिक समजलं जाणारं शांतीस्वरूप भटनागर

मुक्ती पथे… 

Image
मुक्ती पथे…  एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहित आहे की हा रस्ता मुक्तीचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर.. पण हे काय??? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला मात्र आता समोर वळण दिसत आहे, आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला.  काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा..   चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते.. "अग ये चिमणे, कुठं चालली आहेस?" "मला ना त्या मुक्तीच्या रस्त्यावर जायचे आहे. जाऊ द्या ना मला"  "अग हो पण या रस्त्यावर तुला मी जाऊ देणार नाही, वरून ऑर्डर आहे तुला सोडायचे नाही म्हणून" "ते काही नाही मला जायचे म्हणजे जायचे म्हणजे जायचेच आहे." "नाही म्हणजे नाही म्हणजे नाही." "मी काही लेचीपेची नाही, नव्या युगातील चिमणी आहे, माझा हक्क मी मिळवणारच, मी पाहतेच कोण मला अडवतय." हातातील दंडुका आपटत कावळा म्हणतो," तुला एकदा सांगितल