Posts

Showing posts from October, 2022

जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी

Image
जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी कोsहम.. मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? माझा आणि या सृष्टीचा निर्माता कोण? मानवी बुद्धीला पडलेला हा आदीम प्रश्न. प्रत्येक संस्कृतीमध्ये त्याची वेगवेगळी उत्तरं शोधली गेली. ईश्वर संकल्पना निर्माण करण्यात आली. अध्यात्म आणि वेगवेगळी ग्रंथसंपदा तयार झाली आणि या काल्पनिक आधारांच्या बळावर मानवाने स्वतःची समजूत करून घेतली की तो निर्माता नक्की कोण असावा. या निर्मात्याची काल्पनिक जन्मकथा जन्माला आली. विज्ञानाच्या या जगात आता आपल्याला कोणत्याही काल्पनिक आधाराची गरज राहिली नाही. गेल्या दीडदोन शतकात उत्क्रांतीचे सिद्धांत तसेच बिग बँग, सृष्टीच्या निर्मितीचे, ताऱ्यांच्या जन्माचे सिद्धांत मांडण्यात आले. या सिद्धांताचे समर्थन करणारे नवे नवे पुरावे समोर येत गेले, अजूनही रोज नवे पुरावे समोर येत आहेत.. आता तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे विज्ञानाची दृष्टी एवढी विकसित झाली आहे की अब्जावधी वर्षांचा कालखंड ओलांडून मानव त्या काळात डोकावून पाहू शकेल. तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज अर्थात ताऱ्यांच्या जन्माचा मरणाचा सोहळा आपल्याला पाहता येऊ शकतो. विश्वाच्या निर्मितीचे क्षण द