Posts

Showing posts from February, 2021

विज्ञान दिना निमित्त 🌄

Image
विज्ञान दिना निमित्त 🌄 आज २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस. सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला प्रसिद्ध रामन इफेक्टचा शोध प्रसिद्ध केला म्हणून देशभरात विज्ञान दिवस साजरा केला जातो. मात्र विज्ञान हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसावे, ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला अविभाज्य भाग असले पाहिजे. विज्ञानाच्या प्रत्येक टप्प्यावर धर्माशी त्याचा संघर्ष झालेला आहे, त्यात अनेक वैज्ञानिकांचे बळी गेलेले आहेत. आज विज्ञानाची सृष्टी आयती उपभोगत असताना यासाठी किती लोकांनी यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, रोषाचा सामना केला आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. . न्यूटन, आइनस्टाइन बद्दल नेहमीच बोलले जाते, मात्र काही कमी प्रकाशित तर काही पूर्णपणे उपेक्षित व्यक्तिमत्त्वांनी विज्ञानाच्या प्रवाहात योगदान दिले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणे सुसंगत ठरेल. इतर भौतिक बाबींबाबत आग्रही असलेली अनेक मोठमोठी व्यक्तिमत्त्व वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आग्रही असताना दिसत नाहीत. एखादा मोठा व्यक्ती सेलेब्रिटी जेव्हा अंधश्रद्धेला बळी पडतो त्यावेळेस त्याचे अनुकरण इथं ख

गिरीन्द्रशेखर बोस आणि भारतीय मनोपचार.

Image
गिरीन्द्रशेखर बोस आणि भारतीय मनोपचार. सुशांतसिंग राजपूत आत्महत्येनंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, की भारतात मानसोपचार तज्ञांची खूप गरज आहे. सुशांतसिंगला तर यांची गरज होतीच, पण या प्रकरणामध्ये वार्तांकन करणारे बहुतेक सर्वच रिपोर्टर आणि अँकर यांचा आक्रळास्तेपणा पाहता सामान्य माणसाला स्वतः ऑड मॅन आउट झाल्यासारखे वाटेल. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की पाचपैकी एका व्यक्तीला लहानमोठ्या आजारांसाठी मानसिक उपचारांची गरज असते. पण प्रसारमाध्यमांकडून श्रोत्यांचे मेंदू हायजॅक करण्याचे चाललेले प्रमाण पाहता भारतामध्ये हे प्रमाण अधिक भीषण असावे. 😞 आधीच आपल्या देशामध्ये मानसिक आजारांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची आणि त्यावरील उपचारांची दुरावस्था जगजाहीर आहेच. आज मानसोपचार विषयातील बहुतेक ज्ञान हे पश्चिमात्य देशातून आलं असलं तर भारतीय मानसोपचार पद्धतीचा ही एक मोठा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळात देखील. अघोरी उपायांपासून मनाच्या तळापर्यंत जायचा प्रयत्न करणाऱ्या ध्यान धारणा पद्धती इथे प्रचलित होत्या. आधुनिक काळात मानसोपचार विषयांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून संप

शिवजयंती

Image
आज शिवजयंती.. महाराष्ट्राच्या गौरवाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. मात्र आता त्याला काही अती उत्साही भक्त मंडळींकडून केवळ उत्सवी रूप आले आहे. नववारी नेसून, चंद्रकोर लावून, काळा गॉगल टाकून, फेटा बांधला, आणि बंद बुलेटवर बसून फोटो काढला की अनेक स्त्रियांची शिवजयंती साजरी होते. उत्सव साजरा जरूर करावा, अगदी धामधुमीत करावा, त्याबद्दल दुमत नाही. मात्र त्या उत्सवाला अभ्यासाचे अधिष्ठान देखील असावे ही अपेक्षा करणे गैर होणार नाही.  शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचारले की भक्त लोकांची मजल अफझलखानच्या पोटा आणि शाईस्तेखानच्या बोटा पलीकडे जात नाही. अफझलखानाचा पाडाव आणि शाहिस्तेखानाची त्याच्या छावणीत घुसून केलेली फजिती हे निश्चितच शिवरायांच्या शौर्याचे, धाडसाचे निदर्शक आहेत. त्याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाही मात्र त्याचे कुणी भांडवल करु पाहत असेल, तर त्याला सर्व शिवभक्तांनी वेळीच रोखले पाहिजे अन्यथा मिरज दंगलीसारखे प्रसंग घडतात. आपल्या डोक्यामध्ये च

जॅक पार्सन्स : एक सैतानी शास्त्रज्ञ 🥶

Image
जॅक पार्सन्स : एक सैतानी शास्त्रज्ञ 🥶 धर्म किंवा अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ कसे आहे हे सांगण्यासाठी अनेक वेळा अनेक नामवंत शास्त्रज्ञांचे दाखले दिले जातात. एवढे मोठमोठे शास्त्रज्ञ, त्यांना एखाद्या देवाची किंवा एखाद्या बाबाची अनुभूती आली असेल तर त्यांना खोटे ठरवणारे तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहात काय? असा प्रश्न विचारला जातो. या मोठमोठ्या नावांमध्ये आपल्या सर्वांचे आवडते मिसाईल मॅन तसेच महासंगणक बनवणाऱ्या टीमचे प्रमुख यांची नावे देखील सामील असतात. मात्र व्यक्ती वैज्ञानिक असला म्हणजे त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःच्या जीवनात अंगिकारला असेलच असे नाही. पाण्यात राहून कोरडे राहणारे कमळाचे पान आपल्याला माहित आहेच. तसेच आयुष्यभर विज्ञानाच्या क्षेत्रात राहणारे काही अभागे स्वतःमध्ये विज्ञान भिनवू शकत नाहीत. जॅक पार्सन्स हा त्याचेच एक उदाहरण. जगात अनेक घटना योगायोगाने घडतात, मात्र त्याला दैवी शक्ती किंवा चमत्कार म्हणून पाहायची सवय लागली की व्यक्ती त्यातच अडकत जातो. जॅक पार्सन्सचे पहा ना.. रॉकेट सायन्समध्ये ज्याच्या नावावर तब्बल सात पेटंट आहेत असा एखादा व्यक्ती सैता

वेंकी रामकृष्णन : एक रॉयल नोबेल रसायन

Image
वेंकी रामकृष्णन : एक रॉयल नोबेल रसायन माणसाच्या जगण्यालाsss जे लाभलं वरदान ... एकमुखाने बोला.. बोला जय जय जय विज्ञान!!!  मानवाने विज्ञानाची कास धरली आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होत आहेत. विज्ञानाने मानवाचे जीवन सुलभ केले आहे.. अनेक कोडी सोडवली आहेत, अनेक कोडी सोडवत आहे. "विज्ञान म्हणजे स्वतःचा आणि जगाचा शोध घेणारं ज्ञान होय!" वाक्य माझे मी नाही. नोबेलविजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन यांनी एका लेखात विज्ञानाची अशी अतिशय उत्तम व्याख्या केली आहे. वेंकटरामन रामकृष्णन किती मोठी नावं आहे ना..माणूस पण तेव्हढाच मोठा आहे.. पण त्यांना सगळे वेंकी याच नावाने ओळखतात. अँड आय लव वेंकीज..😍  पण हा वेंकी शाकाहारी आहे राव😭 आपल्या विज्ञानविषयक लेखात नेहमी लंडनमधील रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा उल्लेख येतो. रॉयल सोसायटी म्हणजे जगभरातील वैज्ञानिकांची काशी, मक्का. विज्ञानाची पंढरी. याची फेलोशिप मिळाली की व्यक्ती डायरेक्ट सीव्ही रामन,आईन्स्टाईनसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या पंगतीला जाऊन बसतो..😍 फेलोशिपचे एवढे कौतुक तर या सोसायटीचा अध्यक्ष होणे किती मोठी गोष्ट असेल