Posts

Showing posts from September, 2020

⌛अपना टाइम आएगा..🕰️

Image
⌛अपना टाइम आएगा..🕰️ "कालाय तस्मै नमः" आजवर  भर्तृहरीचे हे वचन आजवर केवळ "वक्त ने किया क्या हसिं सितम" चे रडगाणे ऐकावयाला वापरलेले पाहिले.. पण खरच त्यावर कधी जास्त विचार नव्हता केला.. कधी वर्गात बोअरिंग लेक्चर सुरू असेल तेव्हा वेळ जाता जात नाही.. मात्र खास व्यक्तीचे हात हातात घेऊन बसलो असलो तर वेळ कसा भूर्रर उडून जातो.. हा वेळ खरच खूप जादूगार आहे राव..  परवा एफबी साथी आरजे शीतल पाटील यांच्यासोबत घड्याळाची माहिती शेअर करताना वाटले  किती रंजक माहिती दडली आहे कालमापणाच्या इतिहासात.. आदीम काळापासून मानवाला वेळेची किंमत असणारच.. कारण सूर्यप्रकाश हाच प्रकाशाचा एकमेव स्त्रोत तेव्हा असणार.. मात्र तेव्हा त्या मानवाला भूक लागली की खायचे आणि झोप लागली की झोपायचे नाटक एवढेच काम ( पुलंच्या तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी आठवले राव) तो एक काळ होता आणि आजचा हा काळ.. कालाय तस्मै नमः.. काळाला वंदन केलेच पाहिजे घड्याळ हे आजमितीला मानवाच्या हाताला नाही तर नशिबाला बांधले आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.. त्यातही मुंबई पुण्यासारख्या महानगरात राहायचे म्हणले की आयुष्यभर घोड्या

ही सृष्टी बनवणारा कोण

Image
ही सृष्टी बनवणारा कोण तरी असेलच ना.......  सृष्टि से पहले सत नहीं था असत भी नहीं अंतरिक्ष भी नहीं आकाश भी नहीं था छिपा था क्या, कहाँ किसने ढका था उस पल तो अगम अतल जल भी कहां था सृष्टि का कौन है कर्ता? कर्ता है या है विकर्ता? ऊँचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता वही सचमुच में जानता या नहीं भी जानता है किसी को नही पता नही पता नही है पता.... नही है पता शाम बेनेगल दिग्दर्शित "भारत एक खोज" मालिकेचे हे शीर्षक गीत.. मानवाचा मेंदू जेव्हा विकसित होऊ लागला आणि त्याला सृष्टी, अंतरीक्ष, ऋतुचक्र यांचे कुतूहल निर्माण होऊ लागले तेव्हा त्याच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले .. आणि त्याने जी उत्तरे त्यावर शोधली याचे सुंदर वर्णन या गीतात केले आहे. पृथ्वी वरील आणि अंतरिक्षातील नवलाई पाहून केवळ मानवालाच प्रश्न पडतात बरं का.. इतर प्राण्यांना नाही...  या साऱ्या नवलाईचा निर्माता कोण असेल याची कल्पना प्रत्येक संस्कृतीतील मानवाने त्याच्यापरीने केली आहे. जसे ब्रम्ह हा निर्माता, विष्णु हा पालनकर्ता आणि शिव हा अंतकर्ता अशी आपल्याकडे समजूत तशीच जगातील सर्वच आदीम संस्कृती मध्ये दिसून येते.. त

अलेक्झांडर फ्लेमिंग.. संजीवनी दाता

Image
अलेक्झांडर फ्लेमिंग.. संजीवनी दाता उत्क्रांती प्रक्रियेमध्ये मानव आणि जंतू (यात जीवाणू विषाणू सगळे आले बरं का.. शेवट पर्यंत हाच अर्थ घ्यावा) यांचा संघर्ष अविरत सुरू आहे. कोरोना विषाणूशी सुरू असलेला लढा आजच्या पिढी समोर आहे.. मात्र त्याआधीदेखील अनेक रोग आणि त्याचे जंतू यावर मानवाने विजय मिळवला आहे.. आजही जेव्हा आपले अंतरीक्ष यात्री पृथ्वीवर परतल्यावर त्यांची कसून तपासणी केली जाते.. नकळत आपल्याला माहीत नसलेला जंतू या पृथ्वीवर यायला नको म्हणून.. कारण असा जंतू आजार पसरायला लागला तर आपल्याकडे उत्तर नसेल..   मानवाचा इतिहास हा प्रश्न पडणे आणि त्यावर उत्तर शोधायचा इतिहास आहे.. आजवर जे काही साध्य केले आहे ते चिकिस्तक वृत्तीच्या जोरावर....परिकथा किंवा पुराणकथांमधील चमत्कार केवळ घटकाभर करमणूक करू शकतात.. मात्र मानवाचे सुख दुःख, आजार यावर मानवालाच काम करावे लागले आहे.. आजवर, आणि पुढे ही..कोणताही देव धाऊन आला नाही. एकेकाळी जंतूसंसर्ग झाल्याने लाखो लोक मरत होते. त्यांच्यासाठी संजीवनी बुटी ज्याने आणली...तो अलेक्झांडर फ्लेमिंग हाच मानवासाठी देव..  स्कॉटलंड मध्ये एका छोट्या खेड्यात एका शेतक

मेंदू नसलेले कळप

Image
लोकांना शांती, विवेक सांगणे खूप अवघडच... कृष्णाला अर्जुनाला युद्धास उद्युक्त करणे शक्य झाले..  दुर्योधनाला शांतीसाठी नाही... जसे वणवा लावणे सोपे असते.. एक काडी सुद्धा पुरेशी ठरते.. मात्र जंगल वाढवणे अनेक वर्षे घेतात. तसेच डोकी भडकावने सोपे असते.. डोक्यात विचार पेरणे अवघड... स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून विचारांशी सहमत नसलेल्या व्यक्ती, समाजाची हत्या घडवून आणणे खूप सोपे असते.. बस तुम्हाला गरज असते मेंदू न वापरणाऱ्या कळपाची.. याचे खूप छान वर्णन गुलाल मधील गीतात पियूष मिश्रा यांनी केले आहे... आरम्भ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या कि जान का हो दान आज इक धनुष के बाण पे उतार दो आरम्भ है प्रचण्ड... मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं, तो मौत से भी क्यों डरें ये जा के आसमान में दहा

युरेनस आणि नेपच्यून.. सौरकुलातील नकुल सहदेव

Image
युरेनस आणि नेपच्यून.. सौरकुलातील नकुल सहदेव महाभारतात जसे नकुल सहदेव हे कायम साईडला टाकलेली पात्रे... तसेच काहीसे युरेनस आणि नेपच्यून याबाबत म्हणावे लागेल.. गुरू शनी यांचे ते भाऊ आहेत बस.... बाकी त्यांना काहीच रोल नाही. बरे एकट्याला अशी काय किंमत नाहीच.. नाव आले तर दोघांचे जोडीनेच येते.. वाटल्यास आता गूगल करून पाहा... एकाचे नाव टाकून.. पाच पोस्ट त्याच्या असल्या तर सहावी लगेच जोडीदाराची.... म्हणून मी पण त्या दोघांची ओळख एकत्रच करून देणार.... द्रौपदीने कधी नकुल सहदेव वर प्रेम केले असेल असे वाटत नाही.. केले असेल तर ते केवळ उपकारापुरते... युरेनस आणि नेपच्यूनवर पण कधी खास अंतरीक्ष मोहीम काढली गेली नाही.. सुर्यमालेच्या शेवटपर्यंत पाठवलेले व्होयाजर यानानेच पुढे जाताना यांचा अभ्यास केला आहे ... आणि तसाही या दोघांचा सूर्यमालेतील घटनांवर विशेष प्रभाव पडत नाही.. विनोद मेहरा चित्रपटात असला काय अन् नसला काय, फरक पडत नाही. तसेच यांचे पण काहीसे...😬 लयच मार्केट डाऊन केले का दोघांचे..😬 जाऊ द्या आपण विषय बदलू..... समजा तुम्हाला एखादे असे ठिकाण सांगितले ... जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो तर....🤔

रिचर्ड डॉकिन्स.. आपला भिडू..

Image
  रिचर्ड डॉकिन्स.. आपला भिडू..  माझ्या प्रोफाइल वरील नाव ज्यांच्या नावावरून घेतले आहे असे रिचर्ड डॉकिन्स यांना जागतिक नास्तिकवादाच्या चळवळीचे अग्रणी मानले जाते. चार्ल्स डार्वीन नंतर उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे नाव मानाने घेतले जाते. रिचर्ड डॉकिन्स यांचा जन्म २६ मार्च इ.स. १९४१ रोजी नैरोबी, केनिया येथे झाला. बालपणीच्या त्यांच्या आयुष्यात काही क्लायमॅक्स नाही. विज्ञानाला पोषक अश्या सधन घरात त्यांचे बालपण गेले.  थोडक्यात खायचे प्यायचे वांदे नव्हते आणि विचार करायला स्वातंत्र्य पण होते. नियमित चर्चला देखील ते जात होते. मात्र वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या वाचनात चार्ल्स डार्विन चा उत्क्रांतीवाद आला आणि त्यांचे जीवन बदलून गेले. त्यांनी चर्च मध्ये जाणे सोडून दिले. महाविद्यालयीन काळात त्यांना जगप्रसिद्ध साहित्यिक आणि नास्तिक सर बर्ट्रांड रसेल यांचे why I am not a Christian पुस्तक वाचायला मिळाले आणि त्यांची नास्तिक धारणा पक्की झाली. उत्क्रांती वादी जीव शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक म्हणून नाव कमावत असताना त्यांनी विपुल लिखाण केले आहे. द सेल्फीश जीन - १९६७, द एक्स्टेंड

मेरी क्युरी.. प्रेरणेचा किरणोत्सार करणारं व्यक्तिमत्व.

Image
  मेरी क्युरी.. प्रेरणेचा किरणोत्सार करणारं व्यक्तिमत्व. महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण म्हणजे मेरी क्युरी. दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती, दोन वेगळ्या विषयात नोबेल मिळवणारी पहिली व्यक्ती, विज्ञान विषयात डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला, युरोपीय विद्यापीठातील पहिली महिला प्राध्यापक....  ते अगदी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या फ्रान्सच्या पँथिऑन राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आलेली पहिली महिला.. शिकायला बंदी असलेल्या देशात जन्मलेल्या मुलीचा हा थक्क करणारा प्रवास...  मेरीचे मूळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का (हे आडनाव एकदाच बरं का.. लय अवघड टाईप करायला).. ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एक कृश बाळ जन्माला आले. आधीची चार पोरं असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले हे शेंडेफळ. किरट्या अंगाचे.. अगदीच नाजूक. तिचा बालपणीचा काळ पोलंड मध्ये रशिया विरोधी धामधूमीचा होता... रस्त्यावर कधीही  हिंसाचार सुरु व्हायचा .. हिने त्याची एवढी धास्ती घेतली होती की कधी भावंडं खेळत असतील तर त्यांना सामील झाली नाही.. नुसती घरकोंबडी झाली होती मारिया. मग घरात बसून काय क

बेंजामिन फ्रँकलिन... द फौंडींग फादर ऑफ अमेरिका.

Image
  बेंजामिन फ्रँकलिन... द फौंडींग फादर ऑफ अमेरिका. अमेरिका स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेली, अमेरिकन घटना निर्मितीत प्रमुख आणि अमेरिकन डॉलर वर ज्याचा चेहरा आहे अशी व्यक्ती म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन. अमेरिकन लोक त्यांना अमेरिकेचा आत्मा, पहिला अमेरिकन म्हणून पण संबोधतात. अमेरिकेच्या founding father पैकी एक. मात्र केवळ राजकारणी, मुत्सद्दी किंवा स्वातंत्र्य सैनिक ही त्यांची ओळख खूप अपुरी राहील. लेखक, मुद्रक, प्रकाशक, संशोधक आणि थोर मानवता वादी असलेला हा बेंजामिन फ्रँकलिन नुकत्याच स्वतंत्र झालेल्या अमेरिकेच्या विकासाची भक्कम पायाभरणी करून गेला होता.  बेंजामिन फ्रँकलिन (लाडाचे नाव बेन) याचा जन्म १७ जानेवारी १७०६ साली त्या बापाच्या पोटी झाला... ज्याला सतरा पोरं होती.... 😷 आणि परिस्थिती पण गरीब..  साबण मेणबत्या बनवून विकायचा घरचा  धंदा. मग साहजिक आहे शिक्षण काय घंटा मिळणार.. दोन वर्ष शाळा मिळाली नंतर बेन्याला वयाच्या दहाव्या वर्षी झक मारत घरच्या धंद्यात उतरावे लागले. मात्र या शाळेच्या दोन वर्षात त्याला वाचायची एवढी आवड लागली की शिकवायच्या आधी त्याने पुस्तक वाचलेलं असायचे.. जमेल तेव

निकोला टेस्ला.. जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ.

Image
  निकोला टेस्ला.. जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ.. टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का.. चूक तुमची नाही.. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही..  कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही...  ज्याच्या मुळे आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणे सुरू आहेत त्या टेस्लाचे नाव उपेक्षित आहे.  १० जुलै १८५६ रोजी क्रोएशिया ( तेव्हाचे ऑस्ट्रिया) मध्ये मुसळधार पावूस पडत होता.. मध्यरात्री विजांचा कडकडाट. होत असताना एक बालक जन्माला आला.. ज्याने आयुष्यभर आपल्या मर्जीप्रमाणे शब्दशः विजेला खेळवले.. पाद्री वडील आणि निरक्षर गृहिणी आई च्या पोटी जन्माला आला निकोला टेस्ला.  टेस्ला त्याच्या आईचे खूप कौतुक करतो.. घरात काही बिघडू दे, त्याची ही निरक्षर आई ते दुरुस्त करायची.. टेस्ला म्हणतो शोधक आणि कल्पक वृत्ती ही त्याला खात्रीने केवळ आईकडून भेटली आहे, वडिलांकडून नाही. वडिलांशी त्याचे जास्त पटायचे नाही. पाद्र्याची पोरं पाद्री व्हावीत (🤣) असे त्याच्या बापाला वाटायचे. त्यात ह्याचा एकमेव भाऊ अपघातात मेला, मग जी काही आशा ती ह्यावर.. पण हा लहा

भोंदू गिरी. पहिल्या धारेची

Image
मुंबई लोकल मध्ये कायम असे पोस्टर लावून बंगाली बाबा आपल्या धंद्याची जाहिरात करत असतात. मला नाही वाटत यांना दिवसातून तीन चार पेक्षा जास्त कॉल येत असतील.. पण कॉल आला की त्याला बोलबच्चन टाकून बरोबर बाटलीमध्ये उतरवतात.  भोंदू गिरीचा हा सगळ्यात खालच्या दर्जाचा प्रकार.. हातभट्टी दारू सारखा. इथे पण बरोबर वर्गवारी झाली आहे.  उच्च भ्रू वर्गासाठी जसे स्कॉच शॅम्पेन सारखी महागडी दारू असते.. तसे ओशो, रवी शंकर जग्गी वासुदेव सारखे अध्यात्मिक गुरु. दुसऱ्या फळी मध्ये ( रम व्हिस्की वगैरे) ज्यांना अध्यात्मिक भाषा समजत नाही.. त्यांची काही तरी अध्यात्मिक करायची खाज आसाराम, निर्मला माता, नरेंद्र महाराज सारखी मंडळी मिटवत असतात. तर ज्यांना चढणारी देशी दारू पाहिजे असते त्यांच्या साठी मग गल्लो गल्ली बुवा बाबा अम्मा लोक आहेतच कायम आहेच.  साई बाबा भक्त वरच्या तीन ही स्तरामध्ये आढळतात.. आणि यांचा पेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या ग्राहकाच्या सोयीसाठी या साईबाबांच्या अघोषित बेकायदा असलेल्या शाखा.  फोटोत आहे तश्या बंगाली बाबांच्या. साई बाबा चाच फोटो का.. तर हिंदू मुसलमान दोघांना पण capture करता येत हो..  ये

राममंदिर.. देशाची गरज

Image
पाच ऑगस्ट... देशभरात राममंदिर भूमी पूजनाची धामधूम होती. उत्सव प्रिय जनतेने अजून एक सण आनंदात साजरा केला आणि आय टी सेलकडून भोळ्या भक्तांच्या आनंदाचे रूपांतर उन्मादात केले गेले. देशापूढे असलेले सर्व प्रश्न विसरून सर्व  मीडियाने देखील क्षणाक्षणाची माहिती प्रसारित केली. महामारी ने संपूर्ण देश ग्रासला गेला असताना असे इव्हेंट करुन स्वतःला राजकीय फायदा मिळवून घ्यायचा... जनतेने प्रश्न विचारायला नको म्हणून त्यांना उन्मादात दंग ठेवायचे.. सगळ अगदी क्षुद्र पातळीवर सुरु आहे. देश हिंदू तालिबानच्या दिशेने प्रवास करत आहे..  या  पार्श्वभूमीवर पंडीत नेहरूंचे एक वाक्य वाचल्याचे आठवते. भाक्रा नांगल धरणाच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते की "आधुनिक भारताची हीच मंदिरे आहेत." ते एक नेते होते आणि आज एक नेते आहेत. पुतळे आणि मंदिरे यातच ज्यांना स्वारस्य आहे.  सामान्य जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की मंदिर, पुतळ्याने त्यांचे, त्यांच्या पुढच्या पिढीचे भले होणार नाही..  केवळ राजकारण्यांचे होणार आहे.. नेहमीच मूठभर लोकांच भल करण्यासाठी मंदिर मशीद चर्च ही यंत्रणा राबत असते. 

विवेकाचा आवाज

Image
 डॉ. दाभोलकर यांचा खून होऊन काल सात वर्षे पूर्ण झाली. डॉक्टरांच्या नसण्याने अंनीस  चळवळ बहुतेक संपुष्टात येईल असेच खून करणारे आणि त्याचा कट रचणारे  यांना वाटले असेल. मात्र या कामास अजून गती आलेली गेल्या सात वर्षात दिसून येते. तसेच चळवळ अधिक व्यापक देखील होत आहे. सर्वात आश्वासक बाब ही की युवा वर्ग चळवळीशी जोडला जात आहेत. केवळ सोशल मीडिया नाही तर प्रत्यक्ष चळवळीशी जोडला गेला आहे. डॉक्टरांची पुस्तके वाचू लागला आहे, त्यांचे विचार समजून घेऊ लागला आहे. तुलनेने थोडी असतील परंतु आश्वासक संख्या सामाजिक कामात नव्या जोमाने, नव्या तंत्रज्ञानच्या मदतीने हातभार लावत आहे. खर सांगायचे तर मला देखील केवळ या नव्या पिढीकडून जास्त आशा आहे. मागच्या पिढीने त्यांना जमेल तसे बरे वाईट केले आहे.. पण आता ही नवी पिढी परिवर्तनाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. डॉक्टर दाभोलकरांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहीत की दाभोलकरांचा भर देखील ही  नवीन पिढी अधिक वैचारिक समृध्द करन्यात होता.  दाभोलकर यांचे खुनी जेव्हा पकडले गेले तेव्हा खरचं पोटात गोळा आला होता. यासाठी की.. जे पकडले गेले ते पंचविशी च्या घरातले हो

विजीगिषू मायकल फॅरेडे

Image
 विजीगिषू मायकल फॅरेडे न्यूटन, आइन्स्टाइन या थोर प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे नाव घेताना बिचाऱ्या मायकल फॅरेडेकडे बहुतेक वेळा  दुर्लक्ष होते. त्याने लावलेले शोध आणि त्यातून मानव जातीचे झालेले कल्याण पाहता तो या दोघांपेक्षा मुळीच कमी नाही. न्यूटन नंतर आणि आइन्स्टाइन च्या आधी असा मधल्या काळात याचा जन्म झाला.. त्याची आत्मकथा ही अतिशय रोमांचकारी तसेच प्रेरणा दायी आहे. मनात इच्छा असेल तर व्यक्ती सर्व कुंपण तोडून आपले ध्येय कसे गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल फॅरेडे... शाळेत असताना त्याला र उच्चारता येत नव्हता...मात्र शिक्षिकेला वाटले तो तिची टिंगल उडवतो आहे.. त्याला शिक्षा दिली.. भाऊचा हा शाळेचा शेवटचा दिवस . मग परत कधी शाळेचे तोंड पाहिले नाही.  वयाच्या अकराव्या वर्षा पासून कामाला लागला.. बुक बायंडींग चे काम भेटले.  तिथेच काम करत वाचनाची गोडी लागली.. ती त्याने काळजीपूर्वक जोपासली. त्याचे हे वाचनाचे वेड पाहून एका मित्राने त्याला रॉयल इन्स्टिट्यूट लंडन  मध्ये होणाऱ्या वैज्ञानिक प्रदर्शनाचा पास मिळवून दिला.रॉयल इन्स्टिट्यूट चा संचालक  रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याचे तिथे सप