राममंदिर.. देशाची गरज

पाच ऑगस्ट... देशभरात राममंदिर भूमी पूजनाची धामधूम होती. उत्सव प्रिय जनतेने अजून एक सण आनंदात साजरा केला आणि आय टी सेलकडून भोळ्या भक्तांच्या आनंदाचे रूपांतर उन्मादात केले गेले. देशापूढे असलेले सर्व प्रश्न विसरून सर्व  मीडियाने देखील क्षणाक्षणाची माहिती प्रसारित केली.


महामारी ने संपूर्ण देश ग्रासला गेला असताना असे इव्हेंट करुन स्वतःला राजकीय फायदा मिळवून घ्यायचा... जनतेने प्रश्न विचारायला नको म्हणून त्यांना उन्मादात दंग ठेवायचे.. सगळ अगदी क्षुद्र पातळीवर सुरु आहे. देश हिंदू तालिबानच्या दिशेने प्रवास करत आहे.. 


या  पार्श्वभूमीवर पंडीत नेहरूंचे एक वाक्य वाचल्याचे आठवते. भाक्रा नांगल धरणाच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते की "आधुनिक भारताची हीच मंदिरे आहेत." ते एक नेते होते आणि आज एक नेते आहेत. पुतळे आणि मंदिरे यातच ज्यांना स्वारस्य आहे. 


सामान्य जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की मंदिर, पुतळ्याने त्यांचे, त्यांच्या पुढच्या पिढीचे भले होणार नाही..  केवळ राजकारण्यांचे होणार आहे.. नेहमीच मूठभर लोकांच भल करण्यासाठी मंदिर मशीद चर्च ही यंत्रणा राबत असते. 

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव