Posts

Showing posts from April, 2024

चावट भुंगा

Image
चावट भुंगा "भवरेने खिलाया फुल.. फुलको बेच रहा राजकुंवर" गाणं चुकलं का.. जाऊ द्या सध्या विकायचे दिवस सुरू आहेत. मात्र कवी आणि शाहिरांनी सर्वात जास्त प्रेम कोणत्या कीटकावर केलं असेल, तर तो म्हणजे भुंगा होय! कितीतरी लावणी, भावगीते, भक्तिगीतांमध्ये भुंग्याच्या गुंजारवाची दखल घेतली आहे. खरं तर याची भूणभूण डासापेक्षा किती तरी तीव्र असते, मात्र तरीही एखादी व्यक्ती प्रेमात असेल, त्यावेळेस तिला ही भुणभुण गोड गुणगुण वाटते, आणि त्यावर ती कविता लिहिते. अर्थात प्रेमात असताना व्यक्तीला आपल्या जोडीदाराचं बोलणं देखील गुणगुण वाटत असतं, मात्र लग्न झाल्यावर ती भूणभूण वाटायला लागते!! शृंगारकाव्यात भुंगा चावट म्हणून का बदनाम केला आहे काय माहित? कारण भुंगा अजिबात चावट नसतो. नर भुंगा खरं तर पोट भरायला या फुलापासून त्या फुलावर जात असतो. कामानिमित्त विविध व्यक्तींना भेट देणाऱ्या व्यक्तीला थोडीच आपण बदनाम करत असतो का? नाही ना.. म्हणजे भुंगा अजिबात चावट नाही. गंमत म्हणजे परागवेचनाचं काम मादीपेक्षा अधिक निगुतीनं नर करत असतो, नर भुंगा असेल तर फुलाची काळजी घेतली जाते. मादीवर जर पराग वेचायची वेळ आल

रेशमाच्या किड्यांनी

Image
रेशमाच्या किड्यांनी रेशीम.. केवळ धागा नाही तर नात्यांना, संस्कृतींना आणि जगाला जोडणारा एक बंध.. युरोपमधून आशियाकडे येणारा रस्ता हा सिल्क रुट म्हणून ओळखला जायचा यावरून रेशमाचं तत्कालीन व्यापारातील महत्त्व लक्षात येऊ शकतं. पुढं याच मार्गांने बौद्ध धर्माचा प्रसार झाला. जगज्जेता सिकंदर जेव्हा भारतात आला, तेव्हा इथला गरीब माणूस देखील रेशमी वस्त्रं, ती देखील अंगभर, वापरतो आहे हे पाहून त्याला मत्सर वाटला होता. असं हे रेशीम! राखीच्या रेशमी धाग्याने बहिणभावामध्ये “हे बंध रेशमाचे” तयार होतात, मात्र हे रेशीम कसं तयार होतं? रेशीम तयार करतो रेशमाचा किडा... हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांना कपडे पुरवणाऱ्या या किड्याची माहिती घेतली पाहिजे ना! रेशमाच्या धाग्यांसाठी बॉम्बिक्स मोरी या प्रजातीच्या कीटकांचा वापर केला जातो. मलबेरी म्हणजेच तुतीच्या पानांवर या किड्यांचं पालनपोषण केलं जातं. या वनस्पतीच शास्त्रीय नाव मोरस अल्बा असल्यामुळं या बॉम्बिसिडी कुळातील प्रजाती असलेल्या या कीटकाला बॉम्बिक्स मोरी असं शास्त्रीय नाव मिळालं आहे. साडीच्या दुकानात गेल्यावर टसर सिल्क, मुगा सिल्क वगैरे शब्द आपण पहिल्या