Posts

Showing posts with the label शास्त्रज्ञ

राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ

Image
 राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ १९७१ मध्ये झालेलं भारत पाक युद्ध, यामध्ये अनावश्यक अमेरिकन हस्तक्षेप होऊ लागला. मात्र त्याला न जुमानता पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्यात भारताला यश आलं. यावेळी जाणीव झाली होती की अण्वस्त्रधारी देशांच्या मनमानी दंडुकेशाहीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताला स्वतःला अण्वस्त्रधारी बनावं लागेल. १९६५ तसेच १९७१ मधील युद्धांमध्ये झालेले लागोपाठचे पराभव पाकिस्तान पचवू शकणार नाही आणि पुन्हा मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी परिस्थिती होती.‌ १९६२ मध्ये भारतावर विजय मिळवल्यानंतर चीननं लगेचच १९६४ मध्ये अणुचाचणी करून स्वतःची क्षमता वाढवली होती. या पार्श्वभूमीवर भारत अण्वस्त्रसज्ज होणं अत्यंत गरजेचं होतं. अखेरीस १९७४ मध्ये पोखरणमध्ये चाचणी घेऊन भारतानं अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं. डॉ. राजा रामण्णा हे या चाचणीचे शिल्पकार होते.   १९४५ मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि दुसरं जागतिक महायुद्ध थांबलं.‌ या घटनेतून जग आणि सत्तांचे नकाशे बदलले. नवी राष्ट्रं जन्माला आली.‌ १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा द...

डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक

Image
 डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक “विज्ञानाला कोणताही धर्म नसतो, देशांची सीमा नसते” असं सांगणारा एक शास्त्रज्ञ, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं तरीदेखील त्याच्या देशानं “तो केवळ वेगळ्या पंथाचा आहे” म्हणून त्याला स्वीकारलं नाही. विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारा पहिला मुस्लिम शास्त्रज्ञ, ज्याच्या देशामध्ये त्याला तो अहमदिया पंथाचा आहे म्हणून मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं आणि दुय्यम दर्जाचा नागरिक ठरवण्यात आलं. पाकिस्तानला आजवर केवळ दोन नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, ज्यातील एक पुरस्कार मलाला युसूफजाईला शांततेसाठी मिळाला असला तरी तिच्या कैक दशकं आधी पाकिस्तानला विज्ञानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. मात्र या करंट्या या देशानं पुरस्काराची आणि तो मिळवणाऱ्या डॉ. अब्दुस सलाम यांची किंमत ओळखली नाही.  डॉ. अब्दुस सलाम यांचा जन्म २९ जानेवारी १९२६ रोजी आज मध्य पाकिस्तानात असलेल्या झांग शहरामध्ये झाला. वडील मोहम्मद हुसेन हे त्यांचा पिढीजात हकीमीचा धंदा सांभाळत एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. मोठे चुलते हे शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. मोहम्मद हुसेन यांची पहिली बायको सईद...

जगदीशचंद्र बोस: जीव जाणणारा भौतिकशास्त्रज्ञ

Image
 जगदीशचंद्र बोस: जीव जाणणारा भौतिकशास्त्रज्ञ  कुंभमेळ्याचं आयोजन करण्यासाठी नाशिक मधल्या तपोवनमध्ये हजार वृक्ष छाटले जाणार आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाला देशभरातील पुरोगामी लोक विरोध करत आहेतच, त्यासोबत या वृक्षतोडीला हिंदुत्ववादी संघटनांचा देखील विरोध आहे. मात्र या शासनाचा आजवरचा कारभार पाहता त्यांना हवी ती गोष्ट ते रेटून नेतीलच, आणि कुंभमेळ्याचा उत्सव कॅश करण्यासाठी तपोवन आणि तेथील जैवविविधता नष्ट करून व्हीआयपी लोकांसाठी तंबू उभारले जातील. हजारो झाडांचा हा खून असेल. मात्र ओरडू शकणाऱ्या माणसांच्या जीवाची जिथं किंमत नाही, तिथं या मुक्या झाडांची आरोळी कोण ऐकणार? मात्र ही झाडं किंचाळतात, त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही भावना असतात असं सव्वाशे वर्षापूर्वी सिद्ध झालं आहे. जगदीशचंद्र बोस यांनी हे शोधून काढलं होतं, आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांची सविस्तर माहिती घेऊया.  आज बांगलादेशमध्ये असलेल्या मुंसिगंज या शहराजवळच्या एका खेड्यात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचा जन्म झाला. बामसुंदरी आणि भगवानचंद्र बोस हे त्याचे आईवडील. पाच बहिणींच्या पाठीवर झालेला असल्यामुळं हा आईच...

निसेफोर नीप्स : फोटोग्राफीचा जनक

Image
  निसेफोर नीप्स : फोटोग्राफीचा जनक फोटो काढणं एवढं सोप्प झालं आहे, की आज प्रत्येकाला असं वाटतं की तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. उत्कृष्ट फोटोग्राफर होण्यासाठी एकेकाळी आवश्यक असलेल्या एक्सपोजर, शटर स्पीड या गोष्टींचा गंध नसला तरी देखील व्यक्ती बऱ्यापैकी फोटो काढू शकते. एकेकाळी घरात फोटो असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. फोटोग्राफरला घरी बोलवून, त्याच्याकडून ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून मस्त फ्रेममध्ये लावून ठेवलेले असायचे. नंतरच्या काळात फोटोग्राफी थोडी स्वस्त झाली आणि सर्वसामान्य व्यक्तीचे लग्नाआधी उमेदवार म्हणून तसेच प्रत्यक्ष लग्नामध्ये फोटो निघू लागले. नंतरच्या काळात स्टुडिओमध्ये फोटो काढण्याची टूम निघाली आणि स्टुडिओमध्ये असलेल्या निसर्गरम्य सिनच्या पडद्यासमोर उभं राहून व्यक्ती फोटो काढू लागल्या आणि अशा अनेक फोटोंचा काचेच्या फ्रेममध्ये कोलाज करून, लोकांना दिसेल अशा ठिकाणी ही फ्रेम लटकली जाऊ लागली.  मधल्या काळामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कोडॅकचे कॅमेरे दिसू लागले. मग एकदा रोल टाकला की तो पूर्ण संपेपर्यंत फोटो काढत राहणं सक्तीचं असायचं. अर्थात त्यातही फोटो काढताना रेशनिंग केल...

डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक

Image
 डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक जानेवारी २०२५मध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले आणि कोविडमध्ये दीड वर्षे होरपळलेल्या जनतेला पुन्हा एखादी नवीन महामारी आली की काय याचा धसका बसला. मात्र सुदैवाने जीबीएसचा प्रसार महामारी म्हणावी एवढा झाला नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र जसजसं विकसित होत गेलं तसतसा मानवजातीचा अनेक महामारींशी लढा सुरू झाला. अर्थात त्यापूर्वी देखील या महामारी होत्याच, मात्र या आजारांचे कारण माहीत नसल्यामुळं त्यांना दैविकोप असं नाव दिलं गेलं. रेबीज, प्लेग, टायफॉइड, मलेरिया, कॉलरा, पिवळा ताप आणि गुप्तरोग यांनी आजवर जगभरात अब्जावधी लोकांचे बळी घेतले आहेत. हे आजार जंतूंमुळे होतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि मानवजातीच्या रक्षणाचा लढा त्या दिशेनं सुरू झाला. या लढाईमधील सर्वात मोठा योद्धा असं आपण डॉ. वाल्देमार हापकिन यांना म्हणू शकतो. याच महा योद्ध्याने प्लेग आणि कॉलरा या शत्रुगोटातील प्रबळ महारथींना पराभूत केलं होतं म्हणून वाल्देमार हापकिन हे मानवजातीचे रक्षक ठरतात. डोंगराएवढे काम केलेल्या या माणसाला आज समाज विसरला आहे. त्याच्या मायदेशात अगदी त्याच्या जन्मगावी देखील त्या...