होमी भाभा : भारतीय अणुऊर्जेचे जनक मार्च २०२६..हा महिना सुरू झाला तो इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी सुरू केलेल्या लढाईपासून. इराण दोन दिवसांमध्ये शरण येईल असं अमेरिका आणि इस्रायलला वाटलं होतं. मात्र हल्ल्यामध्ये प्रमुख नेत्यांची सर्व फळी मेल्यानंतर देखील इराणनं चिवट प्रतिकार करत अमेरिका आणि इस्रायलच्या नाकी नऊ आणले. हे युद्ध सुरू झालं कशावरून? अर्थातच तेल हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असलं, तरी ते उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळं इराण हा अण्वस्त्र सज्ज होण्याची तयारी करत आहे, ज्याचा जगाला धोका आहे असा नेहमीचा कांगावा अमेरिकेनं केला. असाच कांगावा करून त्यांनी इराण आणि इराकवर याआधी देखील हल्ले केले आहेत. मात्र आजपर्यंत या देशांचं कोणतंही अण्वस्त्र अमेरिकेला दाखवता आलं नाही. किंबहुना या देशांकडं अण्वस्त्र असतं, तर कदाचित अमेरिकेनं हल्ला देखील केला नसता. कारण उत्तर कोरियामध्ये किम जोंग कॅमेऱ्यासमोर अण्वस्त्र दाखवत अमेरिकेला खिजवतो, मात्र त्याच्याविरुद्ध काही कारवाई करण्याची हिंमत अमेरिका करत नाही. यावरून आपण समजून घेऊ शकतो की एखाद्या देशाकडं अण्वस्त्र असणं किती महत्त्वाचं...