Posts

Showing posts from June, 2023

वासरे.. संवत्सरे

Image
वासरे.. संवत्सरे पंचांगामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात की जे आपल्याला खूप गूढ वाटतात. मात्र त्यामध्ये गूढ असं काहीच नसते, असते फक्त गणित. काही हौशी लोकांनी लग्नाच्या पत्रिकेत भौमवासरे वगैरे शब्द वापरलेले असतात. आपल्या हातात पत्रिका आली की आपण फक्त लग्नाची तारीख, स्थळ आणि वेळ पाहतो, तो विषय क्लिअर झाला की बाकी आपल्याला फक्त जेवणाच्या वेळेशी मतलब असतो. त्यामुळे हे भौम वासरे वगैरे काय आहे याचा प्रश्न आपल्याला पडत नाही. असेल बाबा एखादा गोभक्त.. आणि लग्नामध्ये एखादा वासरू बांधलं असेल, आपल्याला काय घेणं!! वासरे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वार याचाच समानार्थी शब्द आहे. अनेक वेळा भौम् वासरे देखील लिहिलेले असते आणि पुढे मंगळवार पण दिलेले असते. हे म्हणजे लेडीज महिला असं म्हटल्यासारखे द्विरुक्तीचे उदाहरण झाले मात्र साध्या सोप्या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड केल्या तरच ज्योतिषी मंडळीची हुशारी लोकांना दिसेल ना!! भानुवासरे किंवा आदित्यवासरे(रविवार), इंदुवासरे(सोमवार), भौमवासरे(मंगळवार), सौम्यवासरे(बुधवार), बृहस्पतीवासरे(गुरुवार), भृगवासरे(शुक्रवार), मंदवासरे(शनिवार) अशी आठवड्यातील वारांची न

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी

Image
मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी "या पृथ्वीवरून मधमाश्या जर नाहीशा झाल्या तर पुढील चार वर्षांमध्ये मानववंश देखील संपलेला असेल" असं अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतो.. या वाक्यामध्ये जरा देखील अतिशयोक्ती नाही, कारण मानवाला मिळणाऱ्या अन्नधान्यांपैकी ७० टक्के धान्य मधमाशांद्वारे होणाऱ्या परागसिंचनामुळे तयार होत असते, गाई म्हशींच्या चाऱ्यापैकी ८० टक्के गवत मधमाशांच्या परागसिंचनामुळे जन्माला येते. कपाशीच्या उत्पादनात देखील मधमाशांची महत्वाची भूमिका असते. थोडक्यात सांगायचे तर मधमाशा नसतील तर "खानेको रोठी नय मिलेगा, पेहननेको कपडा नय मिलेगा." म्हणूनच आजवर मानवाव्यतिरिक्त इतर कोणत्या सजीवाचा सर्वात जास्त अभ्यास झाला असेल तर तो सजीव आहे मधमाशी!! मधमाशीबद्दल उपलब्ध माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्यातून काही परागकण आपल्यासाठी आज वेचत आहे.. या मधमाश्या पृथ्वीतलावर कधी आल्या असाव्यात? १५ कोटी वर्षांपूर्वीच्या मधमाशीचे जीवाश्म सापडले आहे. सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये औषध आणि अन्न म्हणून मधाचा वापर केलेला आढळतो. इजिप्शियन संस्कृतीमध्ये मृतदेह टिकवण्यासाठी देखील मधाचा वापर केलेला दिसतो. ९००० वर्