Posts

Showing posts from August, 2021

जेम्स वॉट : व्हॉट अ जेम इन सायंस

Image
  जेम्स वॉट : व्हॉट अ जेम इन सायंस वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला?? अहो हे काय विचारणं झालं का..  जेम्स वॉट.. बच्चा बच्चा जानता है. कारण आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी एक गोष्ट ऐकलेली असते. "चहाच्या किटलीवरील झाकण पुन्हा पुन्हा का उडत आहे हा प्रश्न पडलेला जेम्स नावाचा छोटासा मुलगा आधी घाबरतो, त्याला वाटतं नक्कीच किटलीमध्ये भूत आहे. किटलीमध्ये कोंडलेल्या वाफेमध्ये शक्ती असेल असे त्याला सुचते."  आपल्याकडे शास्त्रज्ञांच्या संशोधनाला गोष्टीचं रूप दिलं की मुलांना सांगायला सोपं पडतं. (मी सुद्धा अनेक व्याख्यानामध्ये जेम्स वॉटची किटली आणि न्यूटनच्या सफरचंद यांचं उदाहरण दिलं आहे, मात्र आता नाही देणार)  खरतर वाफेच्या शक्तीवर चालणारी उपकरणे आपल्याकडे गेल्या दोन हजार वर्षापासून बनवण्यात येत आहेत. वाफेवर वाफेच्या शक्तीवर चालणारे पहिले इंजिन बनवण्याचा मान देखील थॉमस न्यूकोमेन या शास्त्रज्ञाला जातो. मात्र थॉमस न्यूकोमेनच्या इंजिनात आमूलाग्र बदल करून, त्याची उपयुक्तता पाच पटीने वाढवून जेम्स वॉटने औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. निःसंशय जेम्स वॉट हा औद्योगिक क्रांतीचा प्रणेत

एमी नोटर : भौतिकशास्त्राला सममिती देणारी गणितज्ञ

Image
 एमी नोटर : भौतिकशास्त्राला सममिती देणारी गणितज्ञ. कदाचित एमी नोटर हे नाव पहिल्यांदा ऐकत असाल.. काय करणार.. कलाकारांना जेवढी प्रसिद्धी मिळते, त्याच्या एक शतांशदेखील शास्त्रज्ञांना मिळत नाही, आणि शास्त्रज्ञांना जेव्हढी प्रसिद्धी मिळते, त्याच्या एक दशांशदेखील गणितज्ञांना मिळत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत गणितीय पातळीवर देखील सिद्ध करावे लागतात, जसे मायकल फॅरेडेचे विद्युतचुंबकीय सिद्धांत सिद्ध करण्यासाठी गणित मांडायला जेम्स मॅक्सवेल हवा असतो, किंवा ओट्टो हानच्या किरणोत्सार शोधाला सिद्ध करण्यासाठी लिझ माईटनरचे गणित गरजेचे असते. अगदी तसेच आइन्स्टाइनचा सापेक्षता सिद्धांत गणितीय पातळीवर सिद्ध करण्याचे काम एमी नोटर या गणितज्ञेने केलं. मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून आपले संपूर्ण आयुष्य गणिताला वाहून घेणाऱ्या, आणि आजच्या भौतिकशास्त्रात जिच्या सिद्धान्ताचा रोजच वापर होतो अश्या या तपस्विनीची जगाला पुरेशी माहिती झालीच नाही. गणित हा विषय बहुतेक सगळ्यांचा नावडता.. मात्र ज्यांना तो आवडतो, ते त्याच्या प्रेमातच असतात. रात्रीची झोप उडवणारा हा प्रेमी, (पोरांसाठी प्रेमिका समजा गणिताला) त्य