Posts

Showing posts with the label धर्म/अधर्म

मुक्ती पथे… 

Image
मुक्ती पथे…   एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहित आहे की हा रस्ता मुक्तीचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर.. पण हे काय??? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला मात्र आता समोर वळण दिसत आहे, आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट..  एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा.. चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते.. "अग ये चिमणे, कुठं चालली आहेस?" "मला ना त्या मुक्तीच्या रस्त्यावर जायचे आहे. जाऊ द्या ना मला" "अग हो पण या रस्त्यावर तुला मी जाऊ देणार नाही, वरून ऑर्डर आहे तुला सोडायचे नाही म्हणून" "ते काही नाही मला जायचे म्हणजे जायचे म्हणजे जायचेच आहे." "नाही म्हणजे नाही म्हणजे नाही." "मी काही लेचीपेची नाही, नव्या युगातील चिमणी आहे, माझा हक्क मी मिळवणारच, मी पाहतेच कोण मला अडवतय."  हातातील दंडुका आपटत कावळा म्हणतो," तुला एकदा सांगितले ना...

बाप रे बाप.. 😬

Image
बाप रे बाप.. 😬 उद्या जगासाठी व्हॅलेंटाईन डे असेल.. मात्र आम्हा सनातनी मंडळीसाठी मातृपितृ दिवस आहे..🚩 कारण आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलं आहे की आईबापासाठी पोरानं त्याग करायचा असतो… आज आमचे पूज्य आसाराम बापू जरी कारागृहात आहेत, तरी त्यांची सेवा करायला नारायण साई स्वतः कारागृहात गेले आहेत. याला म्हणायंच बापावर प्रेम.. बापाचं ऐकून वनवासात गेलेल्या रामापेक्षा बापासोबत जेलमध्ये जाणारा नारायण साई हा पितृभक्तीचं आदर्श उदाहरण आहे.🥳 धन्य तो बाप आणि धन्य तो पुत्र.. आज या निमित्तानं जगभरातील पुराणकथात अजरामर झालेल्या पितापुत्रांची ओळख करून घेऊया. 😇   असं म्हणतात की मुलाचा जीव त्याच्या आईवर असतो आणि मुलीचा जीव तिच्या बापावर… आई आणि मुलीमध्ये सुप्त स्पर्धा असते तर बाप आणि मुलांमध्ये देखील चुरस सुरू असते. याला ओडीपस कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. (काही लोक इडीपस असं देखील म्हणतात) किशोरवयीन मुलांना बाप हा डोक्याला ताप वाटत असतो. तरी हल्ली बापमंडळी खूप खेळकर झाली आहेत. पोरांना समजावून घेणं आणि त्यांचे हट्ट पुरवणं किती शांतपणे करत असतात.. कुटुंबं छोटी होत चालली आहेत, बहुतेक घरात एकच कि...

स्त्री आणि धर्म

Image
 स्त्री आणि धर्म "स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना सर्वात मोठा विरोध धर्माचा असतो, जगातील सर्वच समाजात धर्माचा आधार घेऊन स्त्रियांचे शोषण होत असते." असे प्रसिद्ध साहित्यिका तस्लिमा नसरीन म्हणतात. उत्क्रांती नंतर जगभरात मातृसत्ताक पद्धती असल्याचे सांगण्यात येते, मग असा पूर्णतः उलट बदल कसा झाला? कारण नंतरच्या काळात धर्म निर्माण होत गेले सर्वच धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे आहेत.. कारण.. कारण सर्वच धर्मसंस्थापक पुरुष होते, धर्मग्रंथांची रचना त्यांनी केली, आणि स्वतःला सोईस्कर अशी व्यवस्था तयार केली आहे. धर्मरक्षण करण्यासाठी, खरतर धर्म बंदिस्त करण्यासाठी योनीशुचीता हेच माध्यम निवडले गेले. आणि त्यास अनुसरून स्त्रियांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या भाकडकथा रचल्या गेल्या. हिंदू धर्म आणि त्याचा पाया असलेली मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याचं स्पष्ट दिसून येतं. सगळे कायदे, सगळ्या रुढी या पुरुषांना मोठेपणा देणाऱ्या आहे. या धर्मात गरोदर बायकोला एकटी जंगलात सोडून देणारा नवरा आदर्श मर्यादापुरुषोत्तम मानला जातो. बायकोला जुगारात डावावर लावणारा धर्मराज म्हणवला जातो. इस्ल...

शिवजयंती

Image
आज शिवजयंती.. महाराष्ट्राच्या गौरवाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. मात्र आता त्याला काही अती उत्साही भक्त मंडळींकडून केवळ उत्सवी रूप आले आहे. नववारी नेसून, चंद्रकोर लावून, काळा गॉगल टाकून, फेटा बांधला, आणि बंद बुलेटवर बसून फोटो काढला की अनेक स्त्रियांची शिवजयंती साजरी होते. उत्सव साजरा जरूर करावा, अगदी धामधुमीत करावा, त्याबद्दल दुमत नाही. मात्र त्या उत्सवाला अभ्यासाचे अधिष्ठान देखील असावे ही अपेक्षा करणे गैर होणार नाही.  शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचारले की भक्त लोकांची मजल अफझलखानच्या पोटा आणि शाईस्तेखानच्या बोटा पलीकडे जात नाही. अफझलखानाचा पाडाव आणि शाहिस्तेखानाची त्याच्या छावणीत घुसून केलेली फजिती हे निश्चितच शिवरायांच्या शौर्याचे, धाडसाचे निदर्शक आहेत. त्याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाही मात्र त्याचे कुणी भांडवल करु पाहत असेल, तर त्याला सर्व शिवभक्तांनी वेळीच रोखले पाहिजे अन्यथा मिरज दंगलीसारखे प्रसंग घडतात. आपल्या डोक्यामध्...

धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे

Image
धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे? तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे? या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना! कालचे सारे मुके आज बोलू लागले अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना! तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना! धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना! -सुरेश भट पिढ्यापिढ्याच्या गुलामगिरीच्या जोखडाला झुगारून लाखो मानवांना बाबासाहेबांनी धम्माचा.. मुक्तीचा रस्ता दाखवला त्या घटनेला आज अशोकविजयादशमीला चौसष्ठ वर्ष पूर्ण होतील. खरं तर मी १४ तारखेचा आग्रही आहे, अश्विन शुद्ध दशमी या तिथीबाबत नाही.. मात्र या तिथीला सम्राट अशोकने धम्म स्वीकारला होता, म्हणून बाबासाहेबांनी हाच दिवस मुद्दाम निवडला होता असं अनुयायांचे म्हणणं आहे.. असो....  या वर्षी कोरोना मुळे दीक्षाभूमीवर लाखो लोकांचा समुदाय धम्मचक्रप्रवर्तनाचा दिवस साजरा करण्यापासून वंचित राहणार आहे. हा दिवस क्रांतीचा... युगायुगाचा अंधार क...

ही सृष्टी बनवणारा कोण

Image
ही सृष्टी बनवणारा कोण तरी असेलच ना.......  सृष्टि से पहले सत नहीं था असत भी नहीं अंतरिक्ष भी नहीं आकाश भी नहीं था छिपा था क्या, कहाँ किसने ढका था उस पल तो अगम अतल जल भी कहां था सृष्टि का कौन है कर्ता? कर्ता है या है विकर्ता? ऊँचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता वही सचमुच में जानता या नहीं भी जानता है किसी को नही पता नही पता नही है पता.... नही है पता शाम बेनेगल दिग्दर्शित "भारत एक खोज" मालिकेचे हे शीर्षक गीत.. मानवाचा मेंदू जेव्हा विकसित होऊ लागला आणि त्याला सृष्टी, अंतरीक्ष, ऋतुचक्र यांचे कुतूहल निर्माण होऊ लागले तेव्हा त्याच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले .. आणि त्याने जी उत्तरे त्यावर शोधली याचे सुंदर वर्णन या गीतात केले आहे. पृथ्वी वरील आणि अंतरिक्षातील नवलाई पाहून केवळ मानवालाच प्रश्न पडतात बरं का.. इतर प्राण्यांना नाही...  या साऱ्या नवलाईचा निर्माता कोण असेल याची कल्पना प्रत्येक संस्कृतीतील मानवाने त्याच्यापरीने केली आहे. जसे ब्रम्ह हा निर्माता, विष्णु हा पालनकर्ता आणि शिव हा अंतकर्ता अशी आपल्याकडे समजूत तशीच जगातील सर्वच आदीम संस्कृती मध्ये दिसून येते.. त...

मेंदू नसलेले कळप

Image
लोकांना शांती, विवेक सांगणे खूप अवघडच... कृष्णाला अर्जुनाला युद्धास उद्युक्त करणे शक्य झाले..  दुर्योधनाला शांतीसाठी नाही... जसे वणवा लावणे सोपे असते.. एक काडी सुद्धा पुरेशी ठरते.. मात्र जंगल वाढवणे अनेक वर्षे घेतात. तसेच डोकी भडकावने सोपे असते.. डोक्यात विचार पेरणे अवघड... स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून विचारांशी सहमत नसलेल्या व्यक्ती, समाजाची हत्या घडवून आणणे खूप सोपे असते.. बस तुम्हाला गरज असते मेंदू न वापरणाऱ्या कळपाची.. याचे खूप छान वर्णन गुलाल मधील गीतात पियूष मिश्रा यांनी केले आहे... आरम्भ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या कि जान का हो दान आज इक धनुष के बाण पे उतार दो आरम्भ है प्रचण्ड... मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं, तो मौत से भी क्यों डरें ये जा के आसमान में...

भोंदू गिरी. पहिल्या धारेची

Image
मुंबई लोकल मध्ये कायम असे पोस्टर लावून बंगाली बाबा आपल्या धंद्याची जाहिरात करत असतात. मला नाही वाटत यांना दिवसातून तीन चार पेक्षा जास्त कॉल येत असतील.. पण कॉल आला की त्याला बोलबच्चन टाकून बरोबर बाटलीमध्ये उतरवतात.  भोंदू गिरीचा हा सगळ्यात खालच्या दर्जाचा प्रकार.. हातभट्टी दारू सारखा. इथे पण बरोबर वर्गवारी झाली आहे.  उच्च भ्रू वर्गासाठी जसे स्कॉच शॅम्पेन सारखी महागडी दारू असते.. तसे ओशो, रवी शंकर जग्गी वासुदेव सारखे अध्यात्मिक गुरु. दुसऱ्या फळी मध्ये ( रम व्हिस्की वगैरे) ज्यांना अध्यात्मिक भाषा समजत नाही.. त्यांची काही तरी अध्यात्मिक करायची खाज आसाराम, निर्मला माता, नरेंद्र महाराज सारखी मंडळी मिटवत असतात. तर ज्यांना चढणारी देशी दारू पाहिजे असते त्यांच्या साठी मग गल्लो गल्ली बुवा बाबा अम्मा लोक आहेतच कायम आहेच.  साई बाबा भक्त वरच्या तीन ही स्तरामध्ये आढळतात.. आणि यांचा पेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या ग्राहकाच्या सोयीसाठी या साईबाबांच्या अघोषित बेकायदा असलेल्या शाखा.  फोटोत आहे तश्या बंगाली बाबांच्या. साई बाबा चाच फोटो का.. तर हिंदू मुसलमान दोघांना पण captur...

राममंदिर.. देशाची गरज

Image
पाच ऑगस्ट... देशभरात राममंदिर भूमी पूजनाची धामधूम होती. उत्सव प्रिय जनतेने अजून एक सण आनंदात साजरा केला आणि आय टी सेलकडून भोळ्या भक्तांच्या आनंदाचे रूपांतर उन्मादात केले गेले. देशापूढे असलेले सर्व प्रश्न विसरून सर्व  मीडियाने देखील क्षणाक्षणाची माहिती प्रसारित केली. महामारी ने संपूर्ण देश ग्रासला गेला असताना असे इव्हेंट करुन स्वतःला राजकीय फायदा मिळवून घ्यायचा... जनतेने प्रश्न विचारायला नको म्हणून त्यांना उन्मादात दंग ठेवायचे.. सगळ अगदी क्षुद्र पातळीवर सुरु आहे. देश हिंदू तालिबानच्या दिशेने प्रवास करत आहे..  या  पार्श्वभूमीवर पंडीत नेहरूंचे एक वाक्य वाचल्याचे आठवते. भाक्रा नांगल धरणाच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते की "आधुनिक भारताची हीच मंदिरे आहेत." ते एक नेते होते आणि आज एक नेते आहेत. पुतळे आणि मंदिरे यातच ज्यांना स्वारस्य आहे.  सामान्य जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की मंदिर, पुतळ्याने त्यांचे, त्यांच्या पुढच्या पिढीचे भले होणार नाही..  केवळ राजकारण्यांचे होणार आहे.. नेहमीच मूठभर लोकांच भल करण्यासाठी मंदिर मशीद चर्च ही यंत्रणा राबत असते.  ...

विवेकाचा आवाज

Image
 डॉ. दाभोलकर यांचा खून होऊन काल सात वर्षे पूर्ण झाली. डॉक्टरांच्या नसण्याने अंनीस  चळवळ बहुतेक संपुष्टात येईल असेच खून करणारे आणि त्याचा कट रचणारे  यांना वाटले असेल. मात्र या कामास अजून गती आलेली गेल्या सात वर्षात दिसून येते. तसेच चळवळ अधिक व्यापक देखील होत आहे. सर्वात आश्वासक बाब ही की युवा वर्ग चळवळीशी जोडला जात आहेत. केवळ सोशल मीडिया नाही तर प्रत्यक्ष चळवळीशी जोडला गेला आहे. डॉक्टरांची पुस्तके वाचू लागला आहे, त्यांचे विचार समजून घेऊ लागला आहे. तुलनेने थोडी असतील परंतु आश्वासक संख्या सामाजिक कामात नव्या जोमाने, नव्या तंत्रज्ञानच्या मदतीने हातभार लावत आहे. खर सांगायचे तर मला देखील केवळ या नव्या पिढीकडून जास्त आशा आहे. मागच्या पिढीने त्यांना जमेल तसे बरे वाईट केले आहे.. पण आता ही नवी पिढी परिवर्तनाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. डॉक्टर दाभोलकरांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहीत की दाभोलकरांचा भर देखील ही  नवीन पिढी अधिक वैचारिक समृध्द करन्यात होता.  दाभोलकर यांचे खुनी जेव्हा पकडले गेले तेव्हा खरचं पोटात गोळा आला होता. यासाठी की.. जे पकडले गेले त...

देव .. नाबाद

Image
 W G ग्रेस यांना इंग्लंड मध्ये क्रिकेटचे पितामह म्हणले जाते.. इंग्लंड मध्ये क्रिकेट रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची बॅटिंग बघायला गर्दी जमायची.. आणि ते खेळायचे पण धमाल.. अनेक किस्से मशहूर आहेत त्यांचे....  पण त्यांची एक खोड होती.. आपण आऊट झालो आहे हे मान्य करायला तयार नसत.. एकदा पहिल्या बॉल वर lbw आऊट दिल्यावर हा भाऊ अंपायर ला जाऊन बोलला पण "ही जी लोक आली आहेत.. ती माझी बॅटिंग पाहायला आली आहेत.. तुझी पंच गिरी बघायला नाही." 😁😁😁 तर थोडक्यात नंतर अंपायर मंडळींवर पण दडपण असायचे ह्याला आऊट देताना चूक व्ह्यायला नको असे एकदा हा बॅटिंगला आला .  पहिल्या बॉललाच चेंडू ह्याच्या बॅटचे पुसटसे चुंबन घेऊन कीपरच्या हातात.. जोरदार अपील...  मात्र याचे हावभाव असे.. की कट लागलाच नाही .. अंपायरने नाबाद दिले. दुसऱ्याचं बॉलच्या वेळी ह्याचा पाय स्टंप समोर... Lbw चे जोरदार अपील.  मात्र याने bat दाखवून सूचित केले की bat ला देखील चेंडू लागला होता.. अंपायरचा निर्णय अर्थात "नाबाद" बॉलर तर इरेला पेटला... तिसरा बॉल असा टाकला की ह्याचा ऑफ आणि मिडल स्टंप गुल... नाराज ग्रे...

सुशील संस्कारी दहशतवादी

Image
 चित्रात वरील भागात अतिशय रानटी आणि हिंस्र लोक आहेत.. ज्यांनी आपल्या दहशती द्वारे संपूर्ण जगास वेठीस धरले आहे.  मात्र खालच्या भागात जे लोक आहेत त्यांनी आपल्या देश आणि धर्माला वाच वाचविण्यासाठी शस्त्र हाती घेतले आहे. वरील चित्रात तर सगळे अडाणी लोक दिसत आहेत. अडाणीपणा त्यांच्या तोंडावरच पसरला आहे. खालच्या चित्रात मात्र शिकले सवरलेले, छान व्यवस्थित पोशाख असलेले लोक आहेत. त्यांच्या तोंडावर कसे शौर्य तेज झळकत आहे. सुदर्शन चानेल चे सर्वेसर्वा सुरेश चव्हाणके तर पाव किलो तूप तोंडावर चोळून आले आहेत. वरच्या फोटोत तुम्हाला महिला नाही दिसणार.. कारण महिलांचे समान स्थान या रानटी लोकांना माहीत. खालच्या फोटोत सुशील संस्कारी महिलांना योग्य स्थान दिले आहे. वरच्या फोटोतील लोकांच्या अल कायदा,  बोको हराम, इसिस, तालिबान, हिजबुल मुजाहिदीन सारख्या क्रूर संघटना स्थापन करून हजारो निष्पाप लोकांचे जीव घेतले.  खालच्या फोटोतील लोकांनी आरएसएस, बजरंग दल, अभिनव भारत, हिंदू युवा वाहिनी सारख्या संघटनाच्या माध्यमातून या पवित्र भारत भूमीत राम राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यासाठी त...

७२ हूर .. एक प्रवास

Image
 ७२ हूर .. एक प्रवास🤨 काल एक व्हिडिओ भेटला.. व्हिडिओ मधील ह्या मौलाना ला खरी युवकांची नस सापडली आहे. जिहाद मध्ये शहीद व्हा .. जन्नत मध्ये प्रत्येकाला ७२ हूर (अप्सरा) मिळणार... भारी ऑफर दिली आहे राव.. आसपास बुरखा धारी मुली बघून ज्यांचे डोळे आसुसले आहेत,  त्यांच्यासाठी ही प्रानापेक्षा प्रिय गोष्ट होणार.. त्यासाठी जिहाद करताना दुसऱ्याला मारणेच काय स्वतच्या बुडाखाली सुद्धा बाँब फोडून घेतील रताळे..... इतके दिवस विचार यायचा ७२ हूर एकदम भेटून काय उपयोग आहे.. पण त्याचे उत्तर पण मौलाना कडे आहे... नो शिलाजीत.  नो व्हायग्रा.. कशाची गरज नाही.  इथे 100 पुरुषांची ताकद आपोआप मिळून जाते..  ऑफर सॉलिड ना.... यार एवढी मोठी ऑफर कोणत्याच धर्मात नाही.. हिंदू धर्मात स्वर्ग म्हणजे काय तर मस्त कल्पवृक्ष खाली बसायचे किंवा कामधेनू कडे मागायचे.. तुमच्या सगळ्या सात्विक इच्छा पूर्ण होतील.. पोटभर अमृत प्या.. इंद्राच्या दरबारात मेनका रंभा उर्वशी चा डान्स सुरू असेल तर त्याचा सात्विक आनंद घ्या.... जे काही आहे ते सगळे सात्विक..  अप्सरा जरी तुमच्या पुढे नाचत असल्या तरी त्यांना हा...

कुंभ मेळा.. वेड्यांचा बाजार

Image
या वर्षी आषाढी एकादशी झाली. कोरोनाच्या साथीच्या सावटामुळे मुळे या वर्षी पायी वारी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा पंढरीत फुलला नाही. शासन निर्णया ला वारकरी संप्रदायातील सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. याच वेळी प्रकर्षाने जाणीव झाली कुंभमेळ्याची.  दर बारा वर्षांनी येणारी सिंहस्थ पर्वणी.. त्या निमित्ताने होणारा शासन पुरस्कृत नंगा नाच.. हो शासन पुरस्कृत म्हंटले पाहिजे कारण ४५० कोटींचे बजेट या पर्वणीसाठी दिले जाते. आणि त्यातून साध्य काय होते.. अंधश्रद्धेची बजबजपुरी माजण्या पलीकडे यातून काहीच मिळत नसते.  तिथे येणारे साधू कोण असतात... मुळात त्यांना साधू म्हणावे का हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांनी साधू कुणाला म्हणायचे हे आपल्या अभंगात सांगितले आहे. मृदू सबाह्य नवनीत ऐसे ज्याचे चित्त.. इथे अंघोळीच्या क्रमांकाच्या मानावरून हाणामाऱ्या होतात, प्रसंगी खून पडतात असले हे साधू..  अंघोळीला जात असताना बँडबाजा लावून स्वतची मिरवणूक काढणारे... ज्यांच्यासाठी गांजाची आयात टनावर केली जाते. काय भले केले आहे समाजाचे या साधूंनी.. निम्मे अर्धे तर गुन्हेगार असतील त्यात.. गुन्हे करून फ...