विवेकाचा आवाज

 डॉ. दाभोलकर यांचा खून होऊन काल सात वर्षे पूर्ण झाली. डॉक्टरांच्या नसण्याने अंनीस  चळवळ बहुतेक संपुष्टात येईल असेच खून करणारे आणि त्याचा कट रचणारे  यांना वाटले असेल. मात्र या कामास अजून गती आलेली गेल्या सात वर्षात दिसून येते. तसेच चळवळ अधिक व्यापक देखील होत आहे.


सर्वात आश्वासक बाब ही की युवा वर्ग चळवळीशी जोडला जात आहेत. केवळ सोशल मीडिया नाही तर प्रत्यक्ष चळवळीशी जोडला गेला आहे. डॉक्टरांची पुस्तके वाचू लागला आहे, त्यांचे विचार समजून घेऊ लागला आहे. तुलनेने थोडी असतील परंतु आश्वासक संख्या सामाजिक कामात नव्या जोमाने, नव्या तंत्रज्ञानच्या मदतीने हातभार लावत आहे.


खर सांगायचे तर मला देखील केवळ या नव्या पिढीकडून जास्त आशा आहे. मागच्या पिढीने त्यांना जमेल तसे बरे वाईट केले आहे.. पण आता ही नवी पिढी परिवर्तनाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. डॉक्टर दाभोलकरांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहीत की दाभोलकरांचा भर देखील ही  नवीन पिढी अधिक वैचारिक समृध्द करन्यात होता. 


दाभोलकर यांचे खुनी जेव्हा पकडले गेले तेव्हा खरचं पोटात गोळा आला होता. यासाठी की.. जे पकडले गेले ते पंचविशी च्या घरातले होते.. म्हणजे खून केला तेव्हा विशी च्या आसपास .. या वयाच्या तरुणांना एक सत्तरीच्या जवळ आलेल्या निशस्त्र विचारवंताला मागून गोळ्या घालाव्या वाटतात..   😔


ही गोष्ट जास्त गंभीरतेने घेतली पाहिजे.. अनेक युवकांना पद्धतशीर ट्रेनिंग देऊन हे खून करायला भाग पाडले जाते. त्यांच्यापुढे असे चित्र उभे केले जाते की जणू काही दाभोलकर पानसरे हे देव देश आणि धर्म यांचे दुश्मन आहेत.. यांचा खून करणे पवित्र काम आहे. ब्रेन वॉश झालेल्या या पोरांनी केवळ गोळी चालवली आहे हो.. पण त्यांना तयार करणारे त्यांचे प. पू. मात्र जगासमोर येत नाहीत...


बरोबर आहे.. हीच तर त्यांची कार्यपद्धती आहे. Rand चा खून होताना चाफेकर सापडतात.. पण या rand विरूध्द खोटा प्रचार करून जनमत तयार करणारे टिळक, गांधींवर गोळी चालवणारा नत्थु सापडला पण गांधिविरुद्ध खोटा प्रचार करणारे सावरकर हे या हत्या जस्टिफाय करण्याची यंत्रणा उभी करून ठेवतात. 


अजूनही ही यंत्रणा सुरूच आहे. कालच हिंदू जनजागृती समितीने दाभोलकर आणि अर्बन नक्षलवाद या विषयावर एफबी लाईव्ह केले. त्यात बोलताना सनातन चा राजहंस म्हणाला की आज दाभोलकर असते तर अर्बन नक्षलवादी म्हणून जेल मध्ये असते नक्की... सुन्न झालो काही क्षण.. अरे ज्यांचे साधक खुनी म्हणून सापडले आहेत, ज्यांचा वकील संजीव पूनाळे कर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे ते असे दाभोलकर यांच्यावर बेछूट आरोप करतात.


बाकी संपूर्ण भाषणात तेच बिना बुडाचे आरोप केले गेले.. मात्र माझे लक्ष कमेंट सेक्शन मध्ये होते.. जिथे शेकडो युवक दाभोलकरांना शिव्या घालत होते.. एवढे विष पेरले गेले आहे..पेरले जात आहे.


इंग्रजीत म्हण आहे कॅच देम यंग.. पंधरा सोळा वर्षाच्या पोरा पोरींना आपली ओळख निर्माण करायची घाई असते. अश्या वेळी शिवजयंती, दहीहंडी, गणपती, नवरात्री मंडळ असो किंवा ढोल पथक.. पोरांना ओळख मिळत जाते.. आणि अधिक आव्हानात्मक काम करायची इच्छा होत असते. आणि अश्या पिढीला त्यांना हवे तसे कार्यक्रम देऊन पद्धतशीर ब्रेन वॉश करायची संधी समाजकंटक सोडतं नाहीत. आधी केवळ समाज कार्य किंवा गड किल्ले मोहीम असे सोज्वळ रूप घेऊन कळपाला हाकरणे सुरू होते.


वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या संस्था.. मात्र उद्देश एकच .. आपल्या विचार सरणीचा राजकीय फायदा मिळवून देणे. आणि असा फायदा  घेऊन गुन्हेगारी लोक ठीकठीकानी सत्तेवर आलेले आपण पाहिले आहे. भिडे, धनंजय देसाई यांना राजकीय महत्त्वाकाक्षा असेलच असे नाही.. मात्र ते एका यंत्रणेसाठी राबत असतात. 


म्हणजे जो तरुण वर्ग केवळ काही तरी करण्यासाठी धडपडत आहे.. ज्याच्यापुढ सहज उपाय न दिसणाऱ्या शिक्षण, रोजगार अश्या समस्या आहेत.. ते आपली ओळख मिळवायला या समाज कंटकांशी सहभागी होत आहेत. कुजबूज गॅंग तर वर्षानुवर्ष निष्ठेने त्यांचे काम करत आहेत (त्यांचे तन्मय चिन्मय नसतात बर का यात) आणि दर वर्षी तरुणाईचे नवे पीक लुटून नेण्यात भिडे देसाई आदी मंडळीना यश मिळत आहे.


यावर आपण काय करू शकतो.. आपण भरपूर काही करू शकतो.. कारण आपल्याकडे तर्क आहे. आपल्याकडे सत्य आहे. आपल्याला इतिहासाची मोडतोड करून सांगायची नाही.. समोरच्याला केवळ तपासायला शिकवायचे आहे. त्याला समजेल अश्या भाषेत येऊन संवाद साधायचा आहे. मला जमेल तेवढे मी करत आहे.. करत राहणार.. आपण सगळे मिळून प्रयत्न करत राहू..  विवेकाचा आवाज बुलंद करू✊🏾✊🏾✊🏾✊🏾

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव