Posts

Showing posts from July, 2023

ऑक्सिजन.. प्राणवायू

Image
ऑक्सिजन.. प्राणवायू.. O2 मेरी सासोंमे बसा तेरा ही इक नाम.. माझ्याच काय सर्व प्राण्यांच्या श्वासात ऑक्सिजनच वसला आहे. हेनेगया सालमिनिकोला (Henneguya salminicola) हा जेलिफिशचा चुलतभाऊ सोडला तर प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतोच. अद्याप तरी आपल्या महाराष्ट्रात ऑक्सिजनसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र वायुप्रदूषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या दिल्लीमध्ये आज असे बार, पार्लर सुरू झाले आहेत, जिथे जाऊन तुम्ही ३०० रुपये देऊन १५ मिनिटे शुद्ध ऑक्सिजन घेऊ शकता. म्हणजे लवकरच ज्याला परवडेल, केवळ त्यांच्याच सेवेसाठी हा वायू तैनात असणार आहे. 😔 ओझोनचा थर फाटल्याचे देखील आपण ऐकत असतो.. असेच सुरू राहिले तर ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीचे भवितव्य काय असेल?? आज डॉ. रिच्याच्या ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये या ओटूला घेऊ. आपल्या पृथ्वीवरील वातावरणात नायट्रोजननंतर सर्वात जास्त, २१ टक्के ऑक्सिजन असल्याचे आपल्या सर्वांना माहीत असतेच.. मात्र या विश्वात देखील हेलियम हायड्रोजन नंतर ऑक्सिजन हाच तिसऱ्या क्रमांकावरील घटक आहे.😇 मात्र आपल्या सुर्यकुलात सजीवसृष्टीला पुरेल इतका प्राणवायू केवळ

एका कोळीयाने..

Image
एका कोळीयाने.. माशी, मुंगी या कीटकांचा उल्लेख जसा नेहमी स्त्रीलिंगी केला जातो, तसच कोळी हा नेहमी पुल्लिंगी स्वरूपात वापरला जातो. हा कीटक वाटत असला तरी कीटक नाही बरं का! कारण त्याला सहा नाही तर आठ पाय असतात. म्हणून विंचूवर्गीयात त्याची गणना होते. आपल्या शरीरातून ते रेशीम तयार करू शकतात, ज्यामुळे ते एकदम खास बनतात. तब्बल अडीच वर्षे जरी खायला मिळाले नाही तरी काही कोळी जिवंत राहून दाखवतात. किती चिवट ना!! अगदी हेमिंग्वेच्या "ओल्ड मॅन अँड द सी" मधील म्हातारा!❤️ समुद्रात मासेमारीसाठी गेलेला एक म्हातारा महाकाय माश्याशी झुंजताना आपली सगळी अवजारे गमावतो, बहुतेक सगळी शक्ती गमावतो मात्र त्या माश्याला मारूनच परततो.. पु.ल.देशपांडे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.. "एका कोळीयाने!" मात्र आज आपल्याला मासे मारणारा कोळी नाही तर त्याला जाळे विणन्याची प्रेरणा देणारा कोळी या पोस्टमध्ये रंगवायचा आहे. सहा वर्षापेक्षा मोठे असलेले क्वचित एखादेच बालक असेल ज्याला स्पायडरमॅन बद्दल क्रेझ नसेल. एका तरुणाला कोळी किडा चावतो आणि तो स्पायडरमॅन बनतो ही कथा किशोरवयात असताना एवढी खरी वाट

ज्योतिषाचा पाया

Image
ज्योतिषाचा पाया.. दोन आठवड्यापूर्वीच्या रविवारच्या पोस्टवर एका सज्जन गृहस्थाची कमेंट आली की.. "चला ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे असं म्हणता म्हणता आपण मान्य करायला लागला आहात की ज्योतिषशास्त्र हे गणित आहे." कदाचित या गृहस्थाला यानिमित्तानं आपली संस्कृती किती महान आहे हे सांगायचं असेल. त्यांनी दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ज्योतिषशास्त्र, ज्याला आपण एस्ट्रॉनॉमी म्हणू शकतो, ते निर्विवादपणे गणित आहे.. मात्र या गणिताचा वापर करून तयार करण्यात आलेलं फलज्योतिष, ज्याला आपण एस्ट्रॉलॉजी असं म्हणतो, ते निव्वळ थोतांड आहे.😡 सुर्य वगळता आकाशस्थ इतर कोणत्याही ग्रहगोलांचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. सूर्याचादेखील जो परिणाम मानवी जीवनावर होतो, तो कुणाची कुंडली पाहून होत नाही. दोन वेगवेगळ्या नक्षत्रांवर जन्माला आलेल्या व्यक्ती एकाच जागी थांबल्या असतील तर त्यांना सूर्याची उष्णता एकसमान मिळते.‌🔥 कदाचित या गृहस्थांना हे देखील माहीत नसावं की एस्ट्रॉनॉमी अर्थात खगोलशास्त्राचा जन्म भारतामध्ये नाही तर बाबीलोईन संस्कृतीमध्ये ६००० वर्षांपुर्वी झालेला आहे. आज आपण युक्लिडीयन भूमिती