Posts

Showing posts from December, 2020

जोनास साक : पोलिओ लस शोधणारा मानवतावादी

Image
जोनास साक : पोलिओ लस शोधणारा मानवतावादी आज कोरोना विषाणूवरच्या लसीची आपण उत्कटतेने वाट पाहत आहोत.. जवळजवळ हे संपूर्ण वर्ष आपण कोरोना दहशतीखाली काढले आहे. विषाणू कसा रूप बदलत आहे हे तर पाहिले, आणि इंग्लंड अमेरिका सारख्या फाजील आत्मविश्वास दाखवणाऱ्या देशांना कसा धडा मिळाला आहे हे सुद्धा पाहत आहोत. कोरोनासोबतचा लढा अजून किती दिवस, महिने चालेल माहीत नाही. मात्र काही रोगावर आपण निश्चितपणे कायमची मात केली आहे. देवी, पोलिओ ही त्याची उदाहरणे.. देवीची लस शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरचे नाव आपल्याला शालेय पुस्तकातून माहिती असते.... मात्र पोलिओची लस सर्वप्रथम कोणी शोधली हे अनेक जणांना ठाऊक नसते.😭 असं म्हणतात की १९४० च्या दशकात अमेरिका दोन महायुद्धांमध्ये सहभागी होती, जागतिक महायुद्ध आणि पोलिओ विरुद्धची लढाई. दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त मुलांना पोलिओ होतं होता, त्यातील हजारो मुलांना अपंगत्व येत होते. उन्हाळा आला की पोलिओची साथ आलीच. आता कोरोनाकाळात आहे त्याप्रमाणे तेव्हादेखील स्विमिंगपूल बंद केले जायचे, सिनेमा हॉलमध्ये जागा मोकळ्या ठेवल्या जायच्या. दरवर्षी हाच सीन. 😭 खुद्द राष्ट्राध्यक

मॅक्स प्लँक : पुंजभौतीकीचा पाया

Image
मॅक्स प्लँक : पुंजभौतीकीचा पाया विसावे शतक सुरु होत असताना ऊर्जेचे उत्सर्जन हा विषय एकदम हॉट होता. ब्लॅकबॉडी मधील उत्सर्जन किंवा शोषणाचे गणितीय सूत्र मांडणे यावर "न्यूटनच्या नियमांच्या अधीन राहून" अनेक शास्त्रज्ञ ५० पेक्षा जास्त वर्ष संशोधन करत होत, पण यश येत नव्हते.. मात्र एक शास्त्रज्ञाने रँचोगीरी करत.. न्यूटनच्या नियमांच्या चाकोरी बाहेर जाऊन विचार केला.. आणि गणितीय सूत्र शोधून काढले.. पुंज भौतिकीचा पाया रचला गेला... विज्ञानाची दिशा आणि जगाचा इतिहास बदलला गेला...  तो शास्त्रज्ञ होता मॅक्स प्लँक.. मॅक्स प्लँक.. जर्मनीमध्ये एक व्यक्ती एका प्रयोगावर सोळा वर्ष काम करतो आणि तो पूर्णत्वाला आला तेव्हा त्याला समजते की याचा शोध आधीच अमेरिकेत लागला आहे.. तरी खचून न जाता " पुनश्च येशू" म्हणत😂 नवीन विषयाला हात घालतो... त्याच्या या स्थितप्रज्ञेचा अनुभव ८९ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात वारंवार येतो.. शिवाय दुसऱ्याला मदत करायचा त्याचा स्वभाव जर्मन विज्ञानाला विसाव्या शतकात सर्वोच्च उंचीवर जाण्यास मदत करतो.. संगीत, ट्रेकिंग सर्वच बाबतीत जीवनाचा मॅक्झीमम आनंद घेणारा हा

वर्नर हाइझेनबर्ग : नायक की खलनायक.. की कायम अनिश्चित

Image
वर्नर हाइझेनबर्ग : नायक की खलनायक.. की कायम अनिश्चित दुसऱ्या महायुध्दात हिटलरने केलेला नरसंहार आपल्या सर्वांना माहीत. छळछावण्यांच्या कथा ऐकून तर दगडालादेखील पाझर फुटेल.. समजा त्या काळात हिटलरकडे अणुबॉम्ब असता तर... तर अमेरिकेने जपानवर केला त्यापेक्षा जास्त भयानक अत्याचार शत्रू राष्ट्रावर हिटलर करू शकला असता.. जर्मनीमध्ये अणुबॉम्बसाठी प्रयत्न सुरूदेखील होते.. पण "वेळीच" तो तयार झाला नाही.. काही जण म्हणतात की अणुबॉम्ब बनवणाऱ्या टीमची आणि त्याच्या कॅप्टनची तेव्हढी बौद्धिक क्षमता नव्हती..तर काही जण म्हणतात, या कॅप्टनने मुद्दाम उशीर केला... हा कॅप्टन म्हणजे वर्नर हाइझेनबर्ग.. वर्नर हाइझेनबर्ग, ज्याने अनिश्चितता तत्व मांडले आणि आइन्स्टाइनसारख्या मोठ्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला.. मात्र आज तो इतिहासातील नायक आहे की खलनायक हे निश्चितपणे ठरवणे अवघड झाले आहे. कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याची भूमिका "अनिश्चित".. कदाचित त्याला इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामध्ये स्वतःची छबी दिसली असावी, ज्यातून त्याने अनिश्चिततेचे तत्व शोधले असावे.😬 'सहकारी ज्यू वैज्ञानिका

नील्स बोहर : क्वांटम मेकॅनिक्सचा जनक

Image
नील्स बोहर : क्वांटम मेकॅनिक्सचा जनक एखादी व्यक्ती किती बोअरिंग असू शकते.. गणितावर प्रेम असणे कबुल आहे... पण इतके...🙄 आम्हीपण केलेच की गणितावर प्रेम... पण आमच्यावेळेस असे नव्हते😂 क्लबस्तरीय फुटबॉल मॅच सुरू आहे.. आणि आपला गोलकीपर "बोर" झाला म्हणून खेळाकडे न पाहता गोलपोस्टच्या खांबावर गणिते सोडवतो.. समोरची टीम बॉल घेऊन अगदी "डी" मध्ये येते तेव्हा बाकीच्यांनी आरडाओरडा केल्यावर आपला भाऊ भानावर येतो आणि गोल वाचवतो... याला काय म्हणायचे.. ती व्यक्ती मोठी झाल्यावर शास्त्रज्ञ बनते..  जगातील अतिशय महत्वाच्या व्यक्तींपैकी एक अशी.. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू आहे, ही व्यक्ती जन्माने "अर्धी ज्यू" असल्याने हिटलरकडून तिच्या जीवाला धोका आहे.. तिला वाचवणे आणि इंग्लंड मध्ये घेऊन येण्यासाठी स्पेशल फायटर विमान नियुक्त केले आहे. विमान जर्मनीच्या ताब्यात असलेली नॉर्वे वरून उडणार आहे. विमानावर हल्ला झाला तर किमान याचा तरी जीव वाचावा यासाठी भाऊला इमर्जन्सी एक्झीटपाशीच बसवले आहे. विमान उंच गेले.. ऑक्सीजन मास्क लावण्याची सूचना देण्यात आली. मात्र भाऊ गणिते सोडवत तल्लीन