Posts

Showing posts from November, 2020

वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया

Image
  वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया❤️❤️❤️ समजा "क्ष" नावाच्या व्यक्तीचे स्वप्न असते काहीतरी.. मात्र त्याला घरचे नावडत्या क्षेत्रात टाकतात. परदेशातून शिकून आल्यावर त्याच्यावर एक वर्ष खेडेगावात काम करण्याची सक्ती करण्यात येते, जिथे तो दर महिन्याला राजीनामा देत असतो आणि राजीनामा नामंजूर होत असतो...सलग आठ महिने.. 😭 तर अशी व्यक्ती त्याला सोपवलेले काम किती प्रामाणिकपणे पार पाडेल? 🤔 "सहकारी संस्था" कश्या काम करतात हे आपल्याला माहीत आहेच. चेअरमनपद मिळवण्यासाठी कायकाय कुरापती केल्या जातात हे पण माहीत... पण केरळमध्ये जन्मलेली एक व्यक्ती गुजरात येथे स्थापन झालेल्या सहकारी संस्थेचा तब्बल तीस वर्ष चेअरमन बनते.. तेही बिनविरोध , एकमताने..😱 ही तीच "क्ष" नावाची व्यक्ती आहे.. कधीकाळी जिचा मारूनमुटकून "मारुती" केलेला.. "भारताचा मिल्कमन", ज्याचा जन्मदिवस "नॅशनल मिल्क डे" म्हणून साजरा केला जातो. ही व्यक्ती म्हणजे वर्गीस कुरियन.. ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष आज पासून सुरु होत आहे. "देवभूमी" केरळमधील कोळ्हिकोड गावात

सापेक्षतावाद आणि काळप्रवास

Image
सापेक्षतावाद आणि काळप्रवास आइन्स्टाइनचे नाव घेतले की e =mc^2 हे लगेच सगळ्यांना आठवते त्यातील e, m हे एनर्जी, मास म्हणजेच ऊर्जा आणि वस्तुमान हे आपल्याला माहीत.. पण c म्हणजे???... अनेक लोकांना माहीत नसते. अश्या अनेक गोष्टी असतात जगात. अतीपरिचय असल्यामुळे ज्यांच्या खोलात आपण जात नाही..  (उदा. आयुर्वेदिक डॉक्टरच्या बोर्डवर असलेले चिन्ह.. दोन सापांनी एकमेकाला वेटोळे मारले.. हे कुठून आले 🤔) चौथी मिती, जुळ्याचा विरोधाभास, टाइम ट्रॅव्हल अर्थात काळ प्रवास यावर लेखन करायला आजवर अनेक एफबी मित्रांनी सुचवले होते. आज त्यावर मी माझ्या आकलनानुसार व्यक्त होत आहे. अर्थात माझ्या मित्र यादीत अनेक दिग्गज आहेत, त्यांनी माझ्या आकलनात दुरुस्ती सुचवली तर त्यांचे स्वागत असेल. हा विषय खूपच क्लिष्ट आहे.. मात्र शक्य तेवढं सोपं करून सांगायचा माझा प्रयत्न असेल. हा विषय खूपच रसाळ आहे, त्यापासून केवळ भाषेच्या, गणिती आकडेमोडीच्या क्लिष्टतेमुळे कोणी वंचित राहू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. वार्धक्य हा माणसाचा आयुष्यातील एक अटळ भाग... त्याच्याविरुद्ध लढण्याचे, त्याला हटवण्याचे मानवाने शक्य तेवढे सर्व प्रयत्न

अलेक्झांडर ग्रॅहम बेल: संवाददाता, ऊर्जादाता

Image
अलेक्झांडर ग्रॅहम बेल: संवाददाता काही शोध असे असतात की शोध लागताना त्याचे पुरेपूर महत्त्व संशोधकाला देखील कळले नसते, मात्र या शोधामुळे पुढील शतकाची दिशा बदलणार असते. टेलीफोनचा शोध असाच एक... टेलीफोनचा शोध लागला तेव्हा बेलला देखील वाटले नसेल की पुढे फोन हा व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा होईल.. त्याच्या एवढ्या आवृत्त्या येतील आणि येड्या गबाळ्या लोकांना पण स्मार्ट बनवतील. आज तुम्ही पोस्ट वाचणाऱ्यापैकी क्वचित एखादा कॉम्पुटरवर वाचत असेल.. बाकी मोबाईलफोन हेच आपल्या संवादाचे साधन...  बेलचा प्रतिस्पर्धी असलेला एलिश ग्रे म्हणाला होता.. "फोन हे केवळ एक वैज्ञानिक खेळणे असेल, त्याचा जास्त फायदा होणार नाही". बेलदेखील केवळ आपल्या बहिऱ्या आई आणि बायकोशी संवाद साधता असा उद्देश ठेवून संशोधन करत होता, ज्यातून जगाशी संवाद साधायचा मार्ग मोकळा झाला. ग्रॅहम बेल आणि टेलिफोन हे नाते आपल्याला शाळेपासून माहीत असते. मात्र केवळ बेलचे कार्य "टेलिफोनचा शोध" एवढ्या पुरते मर्यादित नाही. आज अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा तीनही देश म्हणतात की "बेल आमचा सुपुत्र आहे.." कारण बेलने

लिझ माइटनर - नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती

Image
लिझ माइटनर - नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती  एखाद्या व्यक्तीला तब्बल ४८ वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले असेल, मात्र एकदा सुद्धा पुरस्कार मिळाला नसेल, त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल.. जेव्हा ती व्यक्ती स्वतः केलेल्या संशोधनासाठी आपल्याच सहकाऱ्याला नोबेल घेताना पाहते.... आणि तरी ते शांतपणे त्याचे कौतुक करते. समोरचा व्यक्ती त्या पुरस्कारातील रक्कम देऊ करतो तेव्हा ती रक्कम जशीच्या तशी दान करून टाकते...❤️  काही व्यक्ती पुरस्कारापेक्षा मोठी असतात.. आणि त्या व्यक्तींना आपण मिळावे एवढे कदाचित त्या पुरस्काराचे भाग्य नसते... अश्या व्यक्तींपैकी एक लिझ माइटनर.. नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती  लिझ माइटनर.. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात पायाभूत संशोधन करणारी भौतिक शास्त्रज्ञ... "अणुबॉम्बची माता" असे तिला ना आवडणारे बिरूद अनेकवेळा तिला चिटकवले जाते.. मात्र "मला बॉम्ब बनवण्यामध्ये रस नाही" असे सांगून तिने मॅनहॅटन प्रकल्पात काम करायची संधी नाकारली होती. "विज्ञानाचा वापर विधायक कामासाठी झाला पाहिजे, वि

रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा डीएनए

Image
रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा डीएनए रोझलिंड फ्रँकलिनचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का.. ओके.. DNA चे मॉडेल कुणी बनवले???  अर्थात हे तुम्हाला माहीत असेल.. वॉटसन आणि क्रिक आणि त्यांचे "डबल हेलिक्स" मॉडेल... शाळेमध्ये हे शिकवले होते. उत्क्रांतीचे रहस्य उलगडणारे DNA...  या मॉडेलमुळे वॉटसन, क्रीक आणि मॉरिस विल्किंस यांना नोबेल पारितोषिक देखील भेटले होते. मात्र तेव्हा या नोबेलवर तेवढाच हक्क होता रोझलिंड फ्रँकलिनचा...जे  नाव आपल्या भारतात जास्त प्रसिद्ध नाही. एक स्त्री म्हणून तिला तेव्हा जरी दुय्यम वागणूक दिली जात होती तरी तिच्यावर झालेल्या अन्यायाची आता सर्वांना जाणीव झाली आहे. आज जिचे नाव जगभरात अनेक संस्थांना दिले आहे.. आकाशात सापडलेल्या नव्या ॲस्ट्रॉइडला देखील दिले आहे. २०२२ मध्ये मंगळावर पाठविण्यात येणाऱ्या यानाला देखील तिचे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर विज्ञान,  तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना "रॉयल सोसायटी" मार्फत तिच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.. अशी ही रोझलिंड फ्रँकलिन.. तिचा डीएनए आज समजून घेऊ या. रोझलिं

जेम्स बॅरी.. चाचा ४२० डॉक्टर

Image
जेम्स बॅरी.. चाचा ४२० डॉक्टर भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण?? यावर आपल्याकडे नेहमी वाद होतात. आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत यांच्या बरोबरीने कादंबरी गांगुली यांचे नाव देखील घेतले जाते. पण "जगातील" पहिली महिला डॉक्टर कोण.. असे विचारलं तर सहसा आपल्याला माहीत नसते.. अलेक्सा, सिरी, गुगलअसिस्टंट यांना विचारले तर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे नाव सांगितले जाईल.. मात्र हे खरे नाही. जगातील पहिली महिला डॉक्टर आहे जेम्स बॅरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सिनेमातील कथेपेक्षा रोमांचक असू शकेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेम्स बॅरी... स्वतःचे स्त्रीत्व लपवून, पुरुष बनून मेडिकल कॉलेजला एडमिशन मिळवले, नंतर ५६ वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिचे स्त्रीत्व बाकीच्यांना कळले... आपण सिनेमामध्ये अनेक वेळा स्त्री पुरुष एकमेकांच्या वेशात येताना पाहिलं असेल (खर तर लिंगबदलाचा मेकओव्हर एवढा फालतू असतो की शेंबडे पोरग पण ओळखेल.. 😭) मात्र जेम्स ५६ वर्ष स्त्रीत्व लपवून पुरुष बनून राहिला... आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनून. हे खरे की पहिल्या नोंदणीकृत महिला डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल याच