Posts

Showing posts from February, 2022

मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन

Image
मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन आज राष्ट्रीय विज्ञान दिवस.. विज्ञानधर्म मानणाऱ्यांचा आज सण. विज्ञान हाच खरंतर निसर्गनिर्मित धर्म आहे.. (बाकीचे सगळे धर्म मानवनिर्मित आहेत) फेब्रुवारी महिना सुरू झाला की विज्ञानधर्मियांना २८ फेब्रुवारीचे वेध लागतात. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सी. व्ही. रामन यांचा प्रकाशाच्या विकिरणाचा शोधनिबंध "नेचर" या विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झाला, पुढं रामन यांना त्यामुळं नोबेल पारितोषिक देखील मिळालं. रामन हे नोबेल पारितोषिक मिळालेले पहिली भारतीय व्यक्ती ठरले. १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा होतो आहे. या विज्ञानाच्या सणानिमित्ताने होतो विज्ञानाचा जागर, प्रचार-प्रसार. ✊ अखिल मानवजातीवर उपकार केलेल्या या विज्ञानधर्माचे गोडवे गावे तितके थोडेच आहेत, तुम्ही विज्ञानधर्म मानत असाल किंवा नसाल, परंतु विज्ञानाला टाळून तुम्हाला जगता येणार नाही. विज्ञानाने निर्माण केलेली एकही गोष्ट न वापरता एक दिवस जगण्याची कल्पना करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही अतिशय अवघड बाब आहे. उत्क्रांतीमध्ये मानवाला काही विशेष देणग्या भेटल्या, त

रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ

Image
रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ . वैज्ञानिक झालं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी लाभली असं नाही, त्यामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात देखील गुणी शास्त्रज्ञांवर वेळोवेळी अन्याय करणारा लिंगवाद, वंशवाद, प्रांतवाद आपल्याला पाहायला मिळतो. एक शास्त्रज्ञ अहवालात आपले काही निष्कर्ष ठामपणे मांडतो, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतात. मात्र नेटिव्ह लोकांना श्रेय कशाला द्यायचे? वरिष्ठांकडून त्यांचं श्रेय हिरावून घेतलं जातं, त्या घटनेच्या अहवालामध्ये रुचिराम साहनी यांचं नावदेखील नसतं. कारण ते नेटीव्ह असतात. अर्थात या बाबीकडे दुर्लक्ष करून साहनी आपलं काम सुरू ठेवतात.. आणि काळाला या नेटिव्ह शास्त्रज्ञाच्या बुद्धीमत्तेची दखल घ्यावीच लागते.✊ एक भारतीय व्यक्ती भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र यांसारख्या विषयांवर आपला ठसा उमटवते. पुरावनस्पतीशात्राचा पाया घालते, अणूशास्त्रामध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या रुदरफोर्ड सोबत संशोधन करून संशोधनपत्रिका प्रसिद्ध करते.‌ भारतातील डायनोसोरच्या जीवाश्मावर संशोधन करते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेते, त्या सोबतच विज्ञानाच्या प्रसाराची चळवळ हिरीरीने चाल

बाप रे बाप.. 😬

Image
बाप रे बाप.. 😬 उद्या जगासाठी व्हॅलेंटाईन डे असेल.. मात्र आम्हा सनातनी मंडळीसाठी मातृपितृ दिवस आहे..🚩 कारण आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलं आहे की आईबापासाठी पोरानं त्याग करायचा असतो… आज आमचे पूज्य आसाराम बापू जरी कारागृहात आहेत, तरी त्यांची सेवा करायला नारायण साई स्वतः कारागृहात गेले आहेत. याला म्हणायंच बापावर प्रेम.. बापाचं ऐकून वनवासात गेलेल्या रामापेक्षा बापासोबत जेलमध्ये जाणारा नारायण साई हा पितृभक्तीचं आदर्श उदाहरण आहे.🥳 धन्य तो बाप आणि धन्य तो पुत्र.. आज या निमित्तानं जगभरातील पुराणकथात अजरामर झालेल्या पितापुत्रांची ओळख करून घेऊया. 😇 असं म्हणतात की मुलाचा जीव त्याच्या आईवर असतो आणि मुलीचा जीव तिच्या बापावर… आई आणि मुलीमध्ये सुप्त स्पर्धा असते तर बाप आणि मुलांमध्ये देखील चुरस सुरू असते. याला ओडीपस कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. (काही लोक इडीपस असं देखील म्हणतात) किशोरवयीन मुलांना बाप हा डोक्याला ताप वाटत असतो. तरी हल्ली बापमंडळी खूप खेळकर झाली आहेत. पोरांना समजावून घेणं आणि त्यांचे हट्ट पुरवणं किती शांतपणे करत असतात.. कुटुंबं छोटी होत चालली आहेत, बहुतेक घरात एकच किंवा जास्ती

नील देशमुख : आश्वासक युवासंशोधक

Image
नील देशमुख : आश्वासक युवासंशोधक "जगाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक मानवाला चांगलं आयुष्य जगता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे जग बदलणं हे माझं स्वप्न आहे, मला हा बदल घडवायचा आहे." हे वाक्य आहे नील नितीन देशमुख या युवासंशोधकाचं. हे वाक्य त्यानं उच्चारले तेव्हा त्याचं वय होतं अवघं सोळा वर्षं. किशोरवयीन मुलांमध्ये हा नेहमीचा समज असतो की "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही संकट येतं, तेव्हा मानवाला वाचवायला कोणी सुपरहिरो किंवा दैवीशक्ती समोर येत असते." मात्र याच वयोगटातील नील देशमुखला हे ठाऊक असतं की आजच्या संगणकयुगात कोणती दैवीशक्ती असेल तर ती आहे 'कृत्रिम प्रज्ञा'. ❤️ मानवाच्या प्रत्येक अवघड, किचकट कामांमध्ये आपण कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला पाहिजे यासाठी नील आग्रही असतो. आज नील प्लांटम कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील उद्योजक आणि तज्ज्ञ व्याख्याता तर आहेच, याशिवाय त्याचं स्वतंत्र संशोधनदेखील सुरू आहे. आजच्या तरुण पिढी पुढं नील सारखे आदर्श मांडले पाहिजेत.. थेरगाव क्वीनच्या फालतू संवादाचे व्हिडिओ मोठ्ठ्या संख्येने व्हायरल होतात, हिंदुस्तानी भाऊ सारख्या उप