Posts

Showing posts from January, 2022

निकोलाय वाविलोव्ह

Image
निकोलाय वाविलोव्ह आणि त्याचे विज्ञाननिष्ठ सहकारी जेव्हा सत्तेवर मूर्ख व्यक्ती बसलेला असतो, त्यावेळी शास्त्राचे, विज्ञानाचे संदर्भ बदलले जातात.. आणि त्या नेत्याला सोईस्कर बोलणारे चमचे "तज्ज्ञ" म्हणून गणले जातात, सत्यापेक्षा सत्तेला प्रिय असलेली मांडणी केली जाते. सत्तेला अप्रिय ठरेल अशी शास्त्रीय परखड मांडणी करणारे लोक खड्यासारखे बाजूला केले जातात, प्रसंगी त्यांचा जीव घेतला जातो. मात्र विज्ञानासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक वीर मानवी इतिहासात होऊन गेले, म्हणून तर आजवरचे विज्ञान विकसित होऊ शकले. ज्याप्रमाणे गॅलिलिओ, ब्रुनो यांनी विज्ञानाची कास न सोडता तत्वासाठी मरण पत्करले, त्याच पंक्तीत निकोलाय वाविलोव्ह तसेच त्याच्या सहकाऱ्यांचं नाव देखील घ्यावे लागेल. ✊ मानवाच्या इतिहासात दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तींना अनेकवेळा सामोरं जावं लागलं.. मात्र अश्या आपत्तींना तोंड देतच कणखर व्यक्तिमत्वाची घडण होत असते. २७ तारखेला आपल्याला सोडून गेलेले सर्वांचे लाडके लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांची जडणघडण सत्तरीच्या दशकातील बिहारमधील दुष्काळ निवारण करतानाच झाली होती. निकोलाय

अक्षांश आणि रेखांश

Image
अक्षांश आणि रेखांश मंगळवारी ड्रायव्हिंग लायसनची टेस्ट देण्यासाठी गेलो होतो, तिथं एक अठरा वर्षाची पोरगी भेटली. अठराचीच असताना तिला चारचाकीचं लायसन हवं आहे, याचं मला कौतुक वाटलं, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. उन्हावरून विषय झाला, आणि ती सहज म्हणून गेली की आत्ताच मकरसंक्राती झाली ना.. आपण मकरवृत्तात राहतो ना.. आता दिवस मोठा होत जाणार, उन वाढत जाणार. एवढ्या आत्मविश्वासाने तिने चुकीची माहिती सांगितली तर काही क्षण मी अवाकच झालो. कदाचित ते तिने तिच्या घरातून लहानपणी कधीतरी ऐकलं असेल. आणि तिच्या बालमनाने स्वतःची समजूत काढून घेतली असेल. 😭 खरं तर शाळेत मन लावून भूगोलासारखा सुंदर क्वचितच मन लावून शिकवला जात असेल... त्यामुळे शाळा सुटली की भूगोल विसरायला होते. तिला सांगितलं, दिवस मोठा व्हायला सुरुवात २२ डिसेंबर पासून होते. २२ डिसेंबर हा सर्वात छोटा आणि २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. मकरवृत्ताचा भारताशी काही संबंध नाही, भारताच्या मध्यातून कर्कवृत जातं. आपण उत्तर गोलार्धात राहतो, कर्कवृत्त उत्तर गोलार्धात आणि मकरवृत्त दक्षिण गोलार्धात आहे. मकरसंक्रांतीचा संबंध सूर्याचा मकरराशीतील प्रवेशाशी असतो

सूर्य आणि सनसनी

Image
सूर्य आणि सनसनी १४ डिसेंबर २०२१ रोजी नासाकडून एक सनसनी बातमी आली. नासाने सोडलेल्या पार्कर या सोलर प्रोबने सूर्याला स्पर्श केला.‌ आजवर केवळ 'जला के राख कर दूंगा' हा डायलॉग मारणाऱ्या सूर्याला स्पर्श करणं ही अवकाशशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट केली पाहिजे, हा नेहमीचा स्पर्श नव्हता. सूर्य हा तर वायूचा गोळा आहे. गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय बल यामुळे त्याच्याभोवती तेजोवलय किंवा दीप्ती (कोरोना) आहे. (ग्रहणकाळामध्ये हे तेजोवलय अधिक चांगल्या पद्धतीने दिसतं.) सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल दूरपर्यंत पसरलेल्या या वातावरणामध्ये एका मोटारीच्या आकाराच्या पार्कर या प्रोबनं प्रवेश केला, आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास त्याने सुरू केला आहे. आता आपण म्हणू शकतो "सूरज अब दूर नही." सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती आपण मागे घेतली होती. मात्र चंद्र आणि सूर्य राहून गेले होते. "पुरे झाले चंद्र सूर्य" ओळीचा प्रभाव असेल कदाचित.😂 या उपग्रहाबद्दल आणि या ताऱ्याबद्दल एवढी माहिती उपलब्ध आहे की, त्यातील काही निवडावी हा प्रश्नच. आजवरच्या सर्व

डॉ. शंकर आबाजी भिसे : अफाट, अचाट शास्त्रज्ञ

Image
डॉ. शंकर आबाजी भिसे : अफाट, अचाट शास्त्रज्ञ एक व्यक्ती.. जी भौतिकशास्त्रात अनेक शोध लावते.. रसायनशास्त्रात नवे फॉर्म्युले शोधून काढते, औषधीविज्ञानात आपली करामत दाखवते, कुशल जादूगाराप्रमाणे दृष्टीभ्रमाचे प्रयोग करते, कुशल उद्योजक आणि उत्कृष्ट व्यवस्थापक.. याशिवाय साहित्यात देखील आपलं योगदान देते. ❤️ त्यांच्या संशोधन कार्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्यांना भारताचा एडिसन म्हणण्यात येत. मला मात्र एडिसन ही उपमा त्यांच्या कामापुढे छोटी वाटते. २०० पेक्षा जास्त शोध आणि ४० पेटंट असलेला हा शास्त्रज्ञ.. चक्क आपल्या मराठी मातीत जन्मला आहे. आज बालभारती तिसरीच्या पुस्तकात ज्यांचा धडा आहे … त्यांचे नाव आहे डॉ. शंकर आबाजी भिसे. लहानपणी एका बालकानं एका विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये युरोपीय शास्त्रज्ञांचं भारतीय लोकांविषयी मत वाचलं की "भारतीय लोक केवळ युरोप, अमेरिकेत लागलेल्या शोधांचा फायदा घेऊ शकतात, मात्र नव्याने काही निर्माण करू शकत नाही. भारतीयांची केवळ मशीन पुसायची लायकी आहे" असं विधान वाचलं, त्याचवेळी त्या बालकानं ठरवलं होतं की मी असं मशीन तयार करेल, ज्याची मागणी संपूर्ण जगात असेल