Posts

Showing posts from July, 2021

महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा

Image
 महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा "माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे.. असे तुझे माझे नाते जडावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे..‌ माणसा इथे मी तुझे गीत गावे...." आपली प्रतिभावंत लेखणी आणि आपली धारदार वाणी माणसाच्या कल्याणासाठी झिजवणाऱ्या वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दीवर्ष येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. शाहिरी जलसा हे आंबेडकरी चळवळीच महत्त्वाचं अंग. नव्या युगाचे नवे विचार गावागावात पोचवण्याचं काम महाराष्ट्रातील लोकशाहीरांना जाईल.. आणि या शाहिरी परंपरेचा मानबिंदू म्हणून वामनदादा यांचं नाव आदराने घेतले जाईल...फक्त शाहीर नाही तर महाकवी उपाधीने गौरवण्यात येणारे वामनदादा एकमेवच..‌  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या दहा भाषणाचे काम शाहीरांचे एक गाणे करते.. दलीत, श्रमिक, शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत.. समतेचा, जातीवर्गदास्यअंताचा, स्त्रीस्वातंत्र्याचा प्रचार करत आणि संयुक्त महाराष्ट्राचा जागर करत शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांच्या डफांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. वामनदादा कर्डक हे देखील त्यात आघाडीवर होते. दुर्दैवाने अमर

मोटिवेशनल स्पीकर आणि त्यांचा उच्छाद.

Image
  मोटिवेशनल स्पीकर आणि त्यांचा उच्छाद. मोटिवेशनल स्पीकर हा एक नवा व्यवसाय आज तेजीमध्ये आहे.. एका अर्थाने हा बिनभांडवली धंदा… हा.. ब्लेजर वगैरे लागतं, मात्र ते विकत घ्यावं असं काही नाही. शादी का लड्डू खाल्लेल्या अनेक जणांकडे धूळ खात पडलेले असतंच. दुसऱ्याला मोटिवेशन देण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रामध्ये काही तरी उत्तुंग कामगिरी केली पाहिजे असं अजिबात नाही.. किंबहूना यातील अनेक लोक असे असतात जे आयुष्यात काहीच करू शकलेले नसतात आणि मग मोटिवेशनल स्पीकर झालेले असतात. 😂 तुमच्याकडे असावी लागते जेमतेम वकृत्व शैली.. (हो प्रभावी असावी असे मी अजिबात म्हणणार नाही कारण मी असे अनेक वक्ते पाहिले आहेत.. ज्यांच्या वक्तृत्वाचा अजिबात प्रभाव पडत नाही मात्र शासन दरबारी त्यांचं सेटिंग असल्यामुळे त्यांना शासकीय कार्यक्रमांमध्ये नेहमी बोलावलं जातं.) वाचनदेखील चांगल्या पातळीचं असावं असंही काही नाही.. अडचणीचे प्रश्न आल्यावर आपण पुढच्या भेटीमध्ये याच्यावर बोलू असं म्हणून भागत असतं. तुमचं व्यक्तिमत्त्व दिसायला खूप छान असायला हवं असं देखील काही नाही.. अनेक तुपकट चेहऱ्याचे वक्ते तोंडावर अजून पावशेर तूप चोपडून त्याच्य