Posts

Showing posts from March, 2023

ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे

Image
ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या संगीताला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. जय हो गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण मी सांगतो हे खोटे असणार… परीक्षकांना त्या चित्रपटातील दुसरे एक गाणे जाम आवडले असणार.. रिंग रिंग रींगा.. या गाण्यात ढेकणाने एका ललनेशी केलेले लगट आणि तेव्हा तिने सोडलेले कामुक सुस्कारे याचे वर्णन गुलझार आणि रेहमान जोडीने असे केले आहे की त्यांना ऑस्कर मिळाले त्यात काहीच नवल नाही… मात्र आपण आंबटशौकीन आहोत असे जगासमोर जायला नको म्हणून परीक्षक मंडळींनी जय हो या गाण्याला पुढे केले अशी ढे कूनकून मला लागली आहे. 😎 ढेकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे वाढला साधू जैसा ॥ भावे तुका हा सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥ झुरळ किंवा मच्छर या प्राचीन किटकांपेक्षा अध्यात्मात ढेकूण बऱ्याच अधिक वेळा दर्शन देतो आणि भाव खाऊन जातो. कारण जगातील सर्वात कठीण पदार्थ असलेल्या हिऱ्याला देखील ढेकूण भंग करू शकतात अशी त्यांची महती आहे. असे म्हणतात की हिरा आणि ढेकूण हे एका डब्यात काही दिवस ठेवले तर त्या काळात ढेकूण हिरा हळूहळू