Posts

Showing posts from March, 2024

कीटक उवाच:

Image
कीटक उवाच: रिच्यापुराणातील आठव्या अध्यायात भगवान विचारतात की आम्ही तुम्हा कीटकांपासून मुक्ती का मिळवू शकत नाही. भगवान उवाच: कथं वयं भवतः मुक्तिं कर्तुं न शक्नोमि? कीटक उवाच : अहं भवतः अपेक्षया श्रेष्ठः अस्मि। अहं पृथिव्याः एकमात्रः देवः अस्मि. अर्थात तुम्ही आमच्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही, कारण आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत. या पृथ्वीवर आम्हीच एकमात्र देव आहोत. “देवांना ही नाही कळला अंतपार ज्याचा” असा हा कीटकांचा चिवट प्रवर्ग. आणि त्यातही आपल्या केसांना चिकटून बसणारी उ हा प्रचंड चिवट असा कीटक! “कोण नाही कोणचा आणि वरण भात लोणचा” हे जीवनातील अंतिम सत्य असेल तर उ मात्र त्याला अपवाद ठरते. आई वडील, बहिण भाऊ, जोडीदार, मुलं, मित्रमंडळी यापैकी कोणीही असो, व्यक्तीच्या सर्वच नात्यांमध्ये भविष्यात अहंकाराची दरी येऊ शकेल. अडचणीच्या वेळी ही सर्व मंडळी पाठ फिरवतील. मात्र उ हा असा साथी असतो, जो आयुष्यभर व्यक्तीची साथ देत राहतो. व्यक्तीचा आर्थिक स्तर कितीही ढासळला, तरी तिची साथ कायम असते. व्यक्तीने त्या उवेला मारायला काही उपाययोजना केली तरी त्याचीदेखील खुन्नस उ कधी धरत नाही. आपला सर्व अहं

उपद्व्यापी वाळवी

Image
उपद्व्यापी वाळवी “भ्रष्टाचार ही देशाला लागलेली वाळवी आहे.” हे नेहमी वापरलं जाणारं वाक्य असो अथवा “मधुमेह म्हणजे आपल्या शरिराला लागलेली वाळवी आहे.” असं वाक्य! वाळवीचं रूपक वापरून “हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं” धोकादायक चित्रण अनेक वेळा केलं जातं. सध्याच्या भ्रष्ट वातावरणात रोजच कानावर पडणारा हा शब्द आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस अशी वेळ येईल की वाळवी ही केवळ लोकशाहीला किंवा सरकारी व्यवस्थेलाच लागते असं पुढच्या पिढीचा समज होईल. या पिढीने कदाचित “झाडाचं खोड खाण्याची खोड” असलेली खरी वाळवी कधी पाहिली नसेल, मात्र त्यांना वाक्प्रचार ठाऊक असेल! वाळवीला अर्थात तुमच्या म्हणी आणि वाक्प्रचाराशी काही घेणं देणं नाही. त्यांना केवळ “हाती घ्याल ते तडीस न्याल” ही एकच म्हण ठाऊक आहे. त्यामुळे जो पदार्थ ते चावायला घेतात, त्याचा पूर्ण भुगा केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. मॅरेथॉनमध्ये धावत असल्याप्रमाणे वाळवी सतत मात्र मंद गतीने खात असते. हिंदी भाषेत दीमक, उधई तर संस्कृतमध्ये वल्म म्हणवून घेणारा हा कीटक झुरळ आणि मुंगी या दोघांशी नाते सांगतो. हा जीव तिच्या उपद्व्यापांमुळे बदनाम आणि नको