Posts

Showing posts from July, 2022

डास दडूनी राहतो

Image
डास दडूनी राहतो कामावरून दमून आल्यानंतर रात्री तुम्हाला कधी एकदा पाठ टेकवता असं झालेलं असतं. घशाखाली कसेबसे दोन घास टाकून तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करता. मोठा दिवा बंद करून छोटा दिवा लावता आणि आपल्या पलंगावर जाता. अशावेळी आपल्या जोडीदाराने काय तरी रोमँटिक गुणगुणावं असं तुम्हाला वाटत असतं.😍 तुम्हाला गुणगुण ऐकू येते मात्र ती रोमँटिक नसते तर धडकी भरवणारी असते. काही सेकंद आधीच तुम्ही बेडरूममध्ये "मच्छर नाही ना" हे पाहिलेलं असतं तेव्हा तो दिसलेला नसतो. कारण "डास दडूनी राहतो, वाट संधीची पाहतो." आणि आता त्याला वाटते हीच ती वेळ, हाच तो क्षण.. चलो पार्टी करे 🤪 तुम्ही या गुणगुणीकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करता. तुम्हाला माहित असतं, की बेडरूममध्ये आणखी एक व्यक्ती आहे, कदाचित डास तिकडं जाईल. किंबहुना तो डास तिकडं जावा अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असता. तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत काढत असता की हा मच्छर तुम्हाला चावणार नाही. मात्र हे खोटं ठरतं. तुमच्या जोडीदाराकडं ढुंकून देखील न पाहता हा मच्छर तुमच्या शरीराचा ताबा घेतो आणि आपलं प्रेमपत्र तुम्हाला पोचवतो. आता त्याचा

वसंत खानोलकर: भारतातील पॅथॉलॉजीचे जनक

Image
वसंत खानोलकर: भारतातील पॅथॉलॉजीचे जनक वसंत खानोलकर: भारतातील पॅथॉलॉजीचे जनक कुष्ठरोग, प्रजननशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्करोग या विषयांमध्ये पायाभूत संशोधन करणारे डॉ खानोलकर हे भारतात झालेल्या आरोग्यविज्ञानाच्या प्रगतीमधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.. व्हीआर सर या लघुनावानं प्रसिद्ध असलेल्या खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांच्या कैक पिढ्या घडल्या. अनेक नव्या संस्थांची पायाभरणी खानोलकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली आहे. कर्करोगाचं प्राथमिक अवस्थेत निदान असो अथवा तंबाखूमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव करण्याची क्षमता, या बाबींच्या संशोधनामध्ये त्यांचं संशोधन मैलाचा दगड ठरलं आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख पुढच्या पिढीला व्हावी म्हणून आजचा लेख. 🙏🏾 वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म कोकणातील एका छोट्या खेडेगावात गोमंतक मराठा समाजातील एका सुशिक्षित कुटुंबात एप्रिल १८९५ रोजी झाला. गोमंतक मराठा समाजाला नूतन मराठा समाज असंही म्हणतात. या समाजाने कला क्षेत्रासोबतच विज्ञान क्षेत्रात देखील अनेक मोठी नावं दिली आहेत. मात्र खानोलकर यांचे घराणं