Posts

Showing posts from April, 2023

मुंगी: मानवाची प्रतिस्पर्धी

Image
मुंगी: मानवाची प्रतिस्पर्धी होय.. मुंगी मानवाची प्रतिस्पर्धी आहे, कारण वसाहत करणे, आपल्या सोयीसाठी दुसरे प्राणी पाळणे यासारख्या बुद्धिमान म्हणता येईल अशा गोष्टी मुंगी करत असतेच. मुंग्या सर्वात बुद्धिमान कीटक म्हणून ओळखल्या जातात. काही शास्त्रज्ञ तर असे म्हणतात की मेंदू आणि पूर्ण शरीराचे वजन यांच्या गुणोत्तराचा विचार करता मुंग्या या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहेत. 😳 उत्तर आफ्रिकेत असे समजले जाते की मानवाने शेती करून धान्य जमवणे तसेच घर बांधणे या बाबी मुंगीकडून शिकल्या आहेत. मुंग्या एका ठिकाणी साठविलेले अन्न दुसरीकडे नेताना दिसू लागल्या की लवकरच पाऊस येणार असा अंदाज ग्रामीण भागात बांधला जातो. एक ना हजारो गोष्टी.. अंटार्क्टिका आणि इतर बर्फाळ प्रदेश वगळता पूर्ण पृथ्वी व्यापणाऱ्या मुंग्यांची काही वेगळी माहिती आज आपण घेऊया.❤️ सुमारे १४ कोटी वर्षांपासून, म्हणजे डायनोसोर नामशेष झाले त्या कालखंडाच्या आधीपासून मुंग्या या पृथ्वीतलावर आपले शिस्तबध्द आयुष्य जगत आहेत. दोन लाख वर्षांपूर्वी पैदा झालेल्या बुद्धिमान मानववंशाच्या विविध संस्कृती, धर्म ग्रंथ, लोककथांचा आणि मुंगळा मुंगळा सारख्

गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व

Image
गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व . १३ एप्रिलला गॅरी कास्पारोव्हचा साठावा वाढदिवस झाला.. या बुद्धिबळ खेळातील जागतिक विश्वविजेत्याची ओळख ६४ घरांमध्ये त्याने केलेल्या पराक्रमापुरती मर्यादित नाही, किंबहुना तसे असते तर त्यावर लेख लिहायची मी तसदी देखील घेतली नसती. आपण कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या वर थोडीच लिहीतो, मग या ग्याऱ्या वर आज का लिहीत असेल? कारण बुद्धिबळातील जागतिक अव्वल स्थानावर तब्बल २५५ महिने राहण्याचा विक्रम करणारा गॅरी त्याच्या लोकशाही, मानवी अधिकारांसाठी झपाटून काम करत आहे, प्रसंगी पुतीनसारख्या हुकुमशहाशी पंगा घेत आहे. रशियन हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या अनेक विचारवंतांचा गूढ मृत्यू कसा होतो हे आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचत असतो. अशा पार्श्वभूमीवर बुद्धिबळ खेळात अफाट पैसा कमावून सुखाचे आयुष्य जगण्यात ऐवजी गॅरी का विनाकारण सत्ताधीशांना आव्हान देत असतो हे समजावून घ्यायला हवे ना!! सोव्हिएत संघराज्यातील अझरबैस्तान राज्याच्या राजधानीमध्ये, बाकू या शहरामध्ये गॅरी चा जन्म १३ एप्रिल १९६३ रोजी झाला. वडील किम वेनस्टेन हे ज्यू तर आई क्लारा कास्पारोव्हा ही आर्मेनियन. दोघेही इंजिनिअर.