Posts

Showing posts from November, 2021

गीतांजली राव : 🧚 द लिटिल जिनियस🧚

Image
  गीतांजली राव : 🧚 द लिटिल जिनियस🧚 आज बालदिनानिमित्त आपण एका बाल वैज्ञानिकेची माहिती घेणार आहोत. तुमच्या आमच्या आसपास असलेल्या लहान मुलांप्रमाणेच तिचा दिवस सुरू असतो. सकाळी उठलं की आवरून शाळेला जाणं, घरी आलं की गृहपाठ आणि शाळेचा अभ्यास करणं, मित्रमैत्रीणींसोबत खेळायला जाणं, थोडसं सोशल मीडियावर चक्कर टाकून येणं. मात्र यासोबत ही १५ वर्षांची गोड मुलगी स्वतः संशोधन करत असते, तसेच तिने सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत जगभरातील इतर ३०००० मुलांना मार्गदर्शन करत असते, त्यांच्या कार्यशाळा घेत असते. यासोबत ती शिकत असलेल्या स्टेम या अभ्यासक्रमाची ब्रँड ॲम्बेसिडर देखील आहे. Science, Technology, Engineering, and Mathematics (STEM) या विषयाचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. "आम्ही तर लहान मुले आहोत, आम्ही काय बदल घडवू शकतो?" या नेहमीच्या वाक्याऐवजी  "आम्ही तर लहान मुले आहोत, आम्हीच बदल घडवू शकतो" या वाक्यावर विश्वास असणारी ही मुलगी वैज्ञानिक, लेखिका, व्याख्याती, प्रशिक्षक आणि कुशल उद्योजक आहे. ती म्हणते की "जगभरातील आजच्या बालकांमधूनच उद्याचे संशोधक उदयाला येणार आहेत, हे जग तेच स