Posts

Showing posts from December, 2023

गोमू आणि गोमाजीराव

Image
गोमू आणि गोमाजीराव वळवळणाऱ्या सर्व जीवांमध्ये गोम या जीवाला जरा जास्तच महत्व मिळालेलं दिसतं, त्यामध्ये काय गोम आहे काय माहित? लाडक्या कोकणकन्येला गोमू असं संबोधन देऊन कितीतरी गाणी रचली गेली. सोम्यागोम्या या शब्दामध्ये टुकार लोकांची गणती केली जाते. अशी टुकार मंडळी जर थोडी प्रतिष्ठीत असतील तर टिकोजी गोमाजी म्हणवली जातात. हिंदीमध्ये गोमेला कनखजुरा आणि गोजर असे दोन शब्द आहेत. गोम कानात जाण्याची दहशत कनखजुरा हा शब्द व्यक्त करतो तर गोजर हा शब्द गोमेची गोवंशांची जवळीक जोडू पाहतो. "खायला हिरवं गवत आवडणं" हा एक भाग सोडला तर तसं गोमाता आणि गोमेमध्ये काही संबंध नाही. काही गोमा शाकाहारी तर काही कीटकाहारी असतात. पावसाळ्यात कीटकांची पैदास मोठ्या संख्येने होत असताना गोमांची संख्या देखील वाढलेली दिसून येते. शहरातील पोरांनी गोमा पाहिल्या असतील/ नसतील पण ग्रामीण भागात लहानाचा मोठ्या झालेल्या पोरांना गोमेची ओळख करून द्यायची गरज नाही. गोम आणि चप्पल यांचं अतूट नातं त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं. “दिसली गोम की ठेच तिला” हा एकच गोमांतक नियम त्यांना ठाऊक असतो. गोमेला पहिला फटका बसल्यावर ती