Posts

Showing posts from October, 2021

नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक

Image
नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक आज संपूर्ण जग आणि त्यातील लोक, त्यांचा व्यापार इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेला आहे. लोकांचे शिक्षण, मनोरंजन, एवढंच काय, रोजचं जगणं देखील इंटरनेटवर अवलंबून आहे. गॅस बुकिंग असो अथवा विद्युतबिल भरणा, प्रवासाचे नियोजन असो अथवा वस्तूंची खरेदी..  सर्वकाही घरबसल्या.. एकेकाळी या बाबींसाठी लाईन लावावी लागत होती, प्रचंड वेळ जात होता असं पुढच्या पिढीला सांगितलं तर त्यांना कदाचित खरं देखील वाटणार नाही. इंटरनेटमुळे आपल्या या अनुत्पादक दैनंदिन कामांमध्ये बदल झाला, या कामासाठी पूर्वी लागणाऱ्या वेळेत प्रचंड बचत झाली. आता हा वेळ अधिक सर्जनशील कामासाठी वापरता येऊ शकतो. (बहुतांश लोक सर्जनशील कामासाठी वापरत नाही हा भाग वेगळा😂) एकविसावं शतक हे वेगाचं शतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एके काळी डायलअप कनेक्शनने ६४ kbps पेक्षा कमी इंटरनेटच्या वेगावर भागवायला लागायचं.. आता हा इंटरनेटचा वेग सामान्य ग्राहकाला देखील ३०० Mbps पर्यंत वेग उपलब्ध आहे. अमेरिकेतील ग्राहकांना तर इंटरनेटचा वेग Gbps मध्ये मिळू शकतो.. ही किमया साधली आहे फायबर ऑप्टिक या तंत्रज्ञानाने, आ

आर.के. लक्ष्मण आणि असामान्य लक्ष्मणरेषा

Image
 आर.के. लक्ष्मण आणि असामान्य लक्ष्मणरेषा रोज सकाळी टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीबाहेर एक काळी एंबेसडर थांबायची, त्यातून एक नाजूक शरीरयष्टीची व्यक्ती उतरायची आणि लिफ्टचा वापर न करता जिन्याने तरातरा चालत जाऊन आपल्या जागेवर बसायची. आखुड बाह्यांचा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट, अगदी साधारण इसम वाटावा असं रूप, मात्र ती व्यक्ती आपल्या जागेवर बसून जे काम करायची, त्याची मोठमोठ्या राजकीय नेत्यांना धास्ती असायची.. त्या व्यक्तीकडून कॉमनमॅन चितारला जायचा, आणि त्यातून सामान्य व्यक्तींच्या आवाजाला कणखर वाचा फोडली जायची, राजकारण्यांच्या विसंगतीवर मार्मिक बोट ठेवलं जायचं. आपल्या प्रश्नांना व्यंगचित्रातून वाचा फोडली जाईल अशी आशा असल्यामुळे टाईम्समध्ये दिवसभरातून सामान्य जनतेचे शेकडो फोन यायचे, एखाद्या काल्पनिक पात्राविषयी जनतेमध्ये एवढा विश्वास निर्माण होणे, ही कमाल होती त्या चित्रकाराच्या कुंचल्याची.  मोठे कान, टक्कल असलेला, चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा साधा पोषाख घातलेला एक वृद्ध, ज्याच्या चेह-यावर नेहमी गोंधळलेला भाव असायचा. देशातील वाचा नसलेल्या कोट्यावधी जनतेप्रमाणे असहाय वाटावा, असा कॉमनमॅन गेंड्याच्

स्त्री आणि धर्म

Image
 स्त्री आणि धर्म "स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना सर्वात मोठा विरोध धर्माचा असतो, जगातील सर्वच समाजात धर्माचा आधार घेऊन स्त्रियांचे शोषण होत असते." असे प्रसिद्ध साहित्यिका तस्लिमा नसरीन म्हणतात. उत्क्रांती नंतर जगभरात मातृसत्ताक पद्धती असल्याचे सांगण्यात येते, मग असा पूर्णतः उलट बदल कसा झाला? कारण नंतरच्या काळात धर्म निर्माण होत गेले सर्वच धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे आहेत.. कारण.. कारण सर्वच धर्मसंस्थापक पुरुष होते, धर्मग्रंथांची रचना त्यांनी केली, आणि स्वतःला सोईस्कर अशी व्यवस्था तयार केली आहे. धर्मरक्षण करण्यासाठी, खरतर धर्म बंदिस्त करण्यासाठी योनीशुचीता हेच माध्यम निवडले गेले. आणि त्यास अनुसरून स्त्रियांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या भाकडकथा रचल्या गेल्या. हिंदू धर्म आणि त्याचा पाया असलेली मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याचं स्पष्ट दिसून येतं. सगळे कायदे, सगळ्या रुढी या पुरुषांना मोठेपणा देणाऱ्या आहे. या धर्मात गरोदर बायकोला एकटी जंगलात सोडून देणारा नवरा आदर्श मर्यादापुरुषोत्तम मानला जातो. बायकोला जुगारात डावावर लावणारा धर्मराज म्हणवला जातो. इस्ल

पॉल डिरॅक आणि त्याची अद्भुत यामिकी

Image
पॉल डिरॅकआणि त्याची अद्भुत यामिकी. .  मागील शतकामध्ये होऊन गेलेल्या सर्वात प्रतिभावान शास्त्रज्ञांमध्ये जे नाव आईन्स्टाईनसोबत मानानं घेतलं जातं असा हा पॉल डिरॅक. रिचर्ड फाईनमनसारखा शास्त्रज्ञ ज्याला आदर्श, आपला हिरो मानत होता.. २८ व्या वर्षी रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, वयाच्या ३० व्या वर्षी न्यूटनने भूषवलेल्या लुकासीयन अध्यासनावर बसण्याचा मान, तर वयाच्या ३१ व्या वर्षी पूंजयामिकी विषयामध्ये श्रॉडिंजर या शास्त्रज्ञासोबत नोबेल पारितोषिकावर आपले नाव कोरणारा असा हा पॉल डिरॅक… नास्तिकवादाचा कडवा प्रचारक.. केवळ शास्त्रज्ञ म्हणूनच तो महान नाही तर शास्त्रज्ञ घडवणारा प्राध्यापक म्हणून देखील त्याची ओळख सांगता येईल.  ज्या केंब्रिज विद्यापीठात पॉल डिरॅकच्या अबोलपणाची खिल्ली उडविली गेली, "डिरॅक म्हणजे नवे एकक आहे. एका तासाला एक शब्द म्हणजे डिरॅक." अशी थट्टा केली गेली, त्याच विद्यापीठात चमकणाऱ्या इतर शेकडो ताऱ्यांमध्ये आपले अढळ ध्रुवस्थान निर्माण करणारा हा प्राध्यापक. आपल्या लाडक्या होमी जहांगीर भाभा यांचे ते गुरू. तसेच नारळीकर यांना देखील त्यांनी शिकवले होते. नारळीकर यांची PhD ज्यांच्या मार