Posts

Showing posts from February, 2024

तुपात पडली माशी

Image
तुपात पडली माशी “प्रथम ग्रासे मक्षिकापात” पासून तर “कुठं माशी शिंकली” यासारख्या वाक्प्रचारात हीन दर्जाची ठरवत आपण माशीवर कायम अन्याय करत आलो आहोत. तुमची कामं अयशस्वी होण्यात तुमची करणी कारणीभूत असेल ना! त्या कामाशी बिचाऱ्या माशीचा काय संबंध असतो?? मानवाला नेहमीच आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्या कुणावर फोडण्याची सवय आहे, तसंच काही इतर घडलं आहे का? तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी… खरं तर मामानं केलेली रोटी वातड झाली म्हणून चांदोबा ती न खाता उपाशी परतला असणार.. त्यात तुपाची चव घेण्यास आलेल्या माशीचा काहीच संबंध नसणार! मात्र मामानं आपल्या चुकीचं खापर माशीवर फोडलं. बिचारी माशी! कुणी पण या आणि टिकली मारून जा अशी तिची अवस्था.. माश्यांच्या या पृथ्वीतलावर तब्बल दहा लाख प्रजाती आहेत, ज्यातील केवळ सव्वा लाख प्रजातींची नोंद घेणं अभ्यासकांना आजमितीला शक्य झालं आहे. त्यातील केवळ आपल्या घरात राहणाऱ्या माशीबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत. माशी.. अनेक लोक तिच्या हाऊसफ्लाय या इंग्रजी नावाचं घरमाशी असं सोपं भाषांतर करतात. मात्र घरकोंबडा या कुत्सिक विशेषणाप्रमाणं घरमाशी असं आपण नको म्हणुया. इथे केव