डॉ. कमल रणदिवे
डॉ. कमल रणदिवे आणि त्यांचे कर्करोगावरील संशोधन. कर्करोग.. नुसतं नाव जरी घेतलं की ऐकणाऱ्याच्या काळजात धस्स होतं, एवढी या रोगाची दहशत. कदाचित त्यामुळेच अनेक वेळा त्याला केवळ सीए या लघुरूपानं संबोधलं जातं. इसवीसन पूर्व १६०० मध्ये पहिल्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची नोंद आढळते. २५०० वर्षांपूर्वी हिप्पोक्रेस्टस या प्रसिद्ध ग्रीक वैद्याने सर्व प्रकारच्या कर्करोगांची यादी केली होती. भारतात सुमारे २८०० वर्षांपूर्वी रचलेल्या चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये कर्करोगाचे उल्लेख आढळतात. पूर्वी कर्करोग व्हायचं प्रमाण कमी होतं, मात्र गेल्या दोन शतकांमध्ये जगभरामध्ये कर्करोगाचा फैलाव खूपच वेगाने झाला आहे. त्याची भीषणता वाढत आहे, दर वर्षी सुमारे दोन कोटी रुग्ण या खेकड्याच्या तावडीत सापडत आहेत. 😔 अनेक वर्ष कर्करोग हा एक उत्तर नसलेला प्रश्न होता.. मात्र विज्ञान विकसित होत गेलं आणि शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधायला भिडले. लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ लागला, केमोथेरपी, रेडिएशन सर्जरी आणि टारगेट थेरपी यांच्या संयुक्त उपचारांनी कर्करोगावर मात करता येऊ शकते. कर्करोगावर संशोधन करणा...