Posts

Showing posts from July, 2026

निळू फुले: डोंगराएवढा माणूस

Image
निळू फुले: डोंगराएवढा माणूस  ज्या काळात रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर मराठी सिनेमे दाखवले जायचे, आणि त्यांची शीर्षकं सुरू व्हायची, त्यावेळी टीव्हीपाशी जमलेल्या आयाबाया म्हणायच्या की निळू फुल्या हाय का बघ? अर्थात या निळू फुल्यावर त्यांचं प्रेम नसायचं, किंबहुना जगामध्ये सर्वात जास्त तिरस्कार ते या खलनायकाचा करत असतील. मात्र तरीही हा माणूस सिनेमामध्ये असला की तो खूप वाईट कामं करणार, नायक नायिकेची अवस्था बिकट करणार. सिनेमाच्या शेवटी नायकाला हिरोगिरी करण्याची संधी मिळणार तेव्हा या बायाबापड्यांना जास्त समाधान मिळणार. खलनायक प्रभावी असेल तरच नायकाचा प्रभाव पडणार ना! अशोक सराप, अबिता बच्चन प्रमाणे निळू फुल्या हेच नाव माझ्या लहानपणीच्या शब्दकोशात होतं. “निळकंठ कृष्णाजी फुले” हे त्यांचं नाव तसं आजही फारसं प्रसिद्ध नाही. लोकांमध्ये ते निळू फुले आणि निळूभाऊ याच नावानं प्रसिद्ध झाले.  सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडं तुम्हाला रस्त्याच्या कडेला निळूभाऊंचा फोटो लावलेला दिसतो, ज्याच्या खाली लिहिलं आहे “मोठा माणूस!” हे संबोधन अगदी १०० टक्के खरं आहे. कलाकार म्हणून निळूभाऊ खूप मोठे ...