Posts

Showing posts from May, 2022

चंद्र आहे साक्षीला

Image
चंद्र आहे साक्षीला आज सोमवती अमावस्या.. सोमवार हा चंद्राच्या वाट्याला आलेला वार आहे, त्या दिवशी जर अमावस्या असेल तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यादिवशी अनेक ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र चंद्राचा वार असून चंद्राचाच पत्ता नाही, त्याचा उत्सव का साजरा करायचा.. 😭 खरं तर सोमवती पौर्णिमा साजरी केली पाहिजे. आजवरच्या ग्रह, तारे, नक्षत्र, अधिक महिना,आठवड्याचे वार या सर्व पोस्टमध्ये चंद्र हा अविभाज्य भाग होताच आणि त्याच्या संदर्भातील पौराणिक कथांचा आपण उल्लेख केलेला आहेच. आज थोडी वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करू या🙏🏾 चंद्र.. आपल्याला आकाशात दिसणारी सूर्यानंतरची सर्वात तेजस्वी वस्तू.. आणि आपल्या सूर्यमालेत आकाराने पाचव्या क्रमांकाचा असलेला उपग्रह. केवळ ३४७४ किमी व्यासाचा, म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा लहान. काही शास्त्रज्ञांच्या मते हा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला तेव्हापासूनचा जोडीदार.. तर काही शास्त्रज्ञ म्हणतात कि पृथ्वीला एका मोठ्या अंतरिक्षवस्तूची धडक झाली आणि त्यातून पृथ्वीचा हा टवका उडालेला आहे. चंद्र.. विविध संस्कृतीमधील पुराणकथांमध्ये अविभाज्य घटक, जगातील सर्व धर्मातील अनेक स

महिन्यांची नावं कुठून आली?

Image
महिन्यांची नावं कुठून आली? जानेवारी, फेब्रुवारी आणि सोमवारी, मंगळवारी.. लहानपणी दोन्हीचा काही संबंध असेल असं वाटायचं. पण क्रमवार आणि सहावार, नववार यामधल्या वारांचा जसा एकमेकांशी काही संबंध नाही त्याच पद्धतीनं आठवड्याच्या वारांचा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या नावाशी काहीच संबंध नाही.. खरं तर महिन्याच्या नावांमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने निर्वासित आहेत, कदाचित म्हणूनच त्यांचं वेगळेपण आहे. त्याआधी, जेव्हा दहा महिन्याचं वर्ष पकडलं जायचं, हे दोन महिने आणि त्यांची नावं अस्तित्वात नव्हती. तेव्हा नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरू व्हायचं. 😳 होय.. मार्च महिन्यापासून सुरू झालेल वर्ष डिसेंबर महिन्यात संपायचं. आणि त्यापुढच्या काळात कडक थंडी असल्यामुळं पुढचे दिवस सोडून दिले जायचे. त्यांच्याकडे आधी ८ दिवसाचा आठवडा होता.. आणि ३८ आठवड्याचे वर्ष. ३८*८ म्हणजे केवळ ३०४ दिवस होते का वर्षात?? नाही... वर्ष ३६५ दिवसाचेच होते, तरी बाकीचे ६१ दिवस हे चक्क सोडून दिलेले असायचे. कारण युरोपात एवढी कडाक्याची थंडी पडायची की दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले असायचे. आता देखील नाताळ म्हणजे येशूजन

डॉ. कमल रणदिवे

Image
डॉ. कमल रणदिवे आणि त्यांचे कर्करोगावरील संशोधन. कर्करोग.. नुसतं नाव जरी घेतलं की ऐकणाऱ्याच्या काळजात धस्स होतं, एवढी या रोगाची दहशत. कदाचित त्यामुळेच अनेक वेळा त्याला केवळ सीए या लघुरूपानं संबोधलं जातं. इसवीसन पूर्व १६०० मध्ये पहिल्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची नोंद आढळते. २५०० वर्षांपूर्वी हिप्पोक्रेस्टस या प्रसिद्ध ग्रीक वैद्याने सर्व प्रकारच्या कर्करोगांची यादी केली होती. भारतात सुमारे २८०० वर्षांपूर्वी रचलेल्या चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये कर्करोगाचे उल्लेख आढळतात. पूर्वी कर्करोग व्हायचं प्रमाण कमी होतं, मात्र गेल्या दोन शतकांमध्ये जगभरामध्ये कर्करोगाचा फैलाव खूपच वेगाने झाला आहे. त्याची भीषणता वाढत आहे, दर वर्षी सुमारे दोन कोटी रुग्ण या खेकड्याच्या तावडीत सापडत आहेत. 😔 अनेक वर्ष कर्करोग हा एक उत्तर नसलेला प्रश्न होता.. मात्र विज्ञान विकसित होत गेलं आणि शास्त्रज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधायला भिडले. लवकर निदान झालं तर कर्करोग बरा होऊ लागला, केमोथेरपी, रेडिएशन सर्जरी आणि टारगेट थेरपी यांच्या संयुक्त उपचारांनी कर्करोगावर मात करता येऊ शकते. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या शास्त

डॉ. वामन कोकटनूर : शास्त्रज्ञ की कन्फर्मेशन बायसचा पीडित?

Image
डॉ. वामन कोकटनूर : शास्त्रज्ञ की कन्फर्मेशन बायसचा पीडित? विज्ञान म्हणजे चिकित्सा.. त्यामुळे प्रत्येक वैज्ञानिक, शास्त्रज्ञ हा त्याच्या आयुष्यात चिकित्सक असेल अशी किमान अपेक्षा असते. मात्र काही शास्त्रज्ञ याला अपवाद ठरतात. तुफान हुशार पण सैतानी पूजा करणाऱ्या जॅक पार्सन या शास्त्रज्ञाची आपण ओळख करून घेतली होतीच. (कुणाला माहिती हवी असेल तर https://richyabhau.blogspot.com/2021/02/blog-post_14.html इथे उपलब्ध आहे.) आज ज्या शास्त्रज्ञाची ओळख करून घेणार आहोत त्यांनी ३० पेक्षा अधिक पेटंटवर आपले नाव कोरले होते, मात्र त्यांची पूर्वग्रहदूषित विचारशैली हीच त्यांची मर्यादा ठरली. पुराणातील भाकडकथा खऱ्या ठरवण्यासाठी त्यांनी प्रचंड आटापिटा केला, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक महत्त्वाचं संशोधन होऊ शकलं नाही. 😭 वामन कोकटनूर, रसायनशास्त्रात अतिशय हुशार असलेला हा माणूस कन्फर्मेशन बायसमध्ये अडकला आणि त्याची प्रगती थांबली. " माझ्या धर्मग्रंथात जे लिहिले आहे, मला माझ्या बापजाद्यांकडून जे समजले आहे, तेच अंतिम सत्य आहे, आणि ते मी तपासून पाहणार नाही, उलट तेच खरे कसे हे सिद्ध करण्यासाठी लंगडे पुरावे मांड