Posts

Showing posts with the label रंजक माहिती

ऑक्सिजन.. प्राणवायू

Image
ऑक्सिजन.. प्राणवायू.. O2 मेरी सासोंमे बसा तेरा ही इक नाम.. माझ्याच काय सर्व प्राण्यांच्या श्वासात ऑक्सिजनच वसला आहे. हेनेगया सालमिनिकोला (Henneguya salminicola) हा जेलिफिशचा चुलतभाऊ सोडला तर प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतोच. अद्याप तरी आपल्या महाराष्ट्रात ऑक्सिजनसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र वायुप्रदूषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या दिल्लीमध्ये आज असे बार, पार्लर सुरू झाले आहेत, जिथे जाऊन तुम्ही ३०० रुपये देऊन १५ मिनिटे शुद्ध ऑक्सिजन घेऊ शकता. म्हणजे लवकरच ज्याला परवडेल, केवळ त्यांच्याच सेवेसाठी हा वायू तैनात असणार आहे. 😔 ओझोनचा थर फाटल्याचे देखील आपण ऐकत असतो.. असेच सुरू राहिले तर ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीचे भवितव्य काय असेल?? आज डॉ. रिच्याच्या ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये या ओटूला घेऊ. आपल्या पृथ्वीवरील वातावरणात नायट्रोजननंतर सर्वात जास्त, २१ टक्के ऑक्सिजन असल्याचे आपल्या सर्वांना माहीत असतेच.. मात्र या विश्वात देखील हेलियम हायड्रोजन नंतर ऑक्सिजन हाच तिसऱ्या क्रमांकावरील घटक आहे.😇 मात्र आपल्या सुर्यकुलात सजीवसृष्टीला पुरेल इतका प्राणवायू केवळ ...

वासरे.. संवत्सरे

Image
वासरे.. संवत्सरे पंचांगामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात की जे आपल्याला खूप गूढ वाटतात. मात्र त्यामध्ये गूढ असं काहीच नसते, असते फक्त गणित. काही हौशी लोकांनी लग्नाच्या पत्रिकेत भौमवासरे वगैरे शब्द वापरलेले असतात. आपल्या हातात पत्रिका आली की आपण फक्त लग्नाची तारीख, स्थळ आणि वेळ पाहतो, तो विषय क्लिअर झाला की बाकी आपल्याला फक्त जेवणाच्या वेळेशी मतलब असतो. त्यामुळे हे भौम वासरे वगैरे काय आहे याचा प्रश्न आपल्याला पडत नाही. असेल बाबा एखादा गोभक्त.. आणि लग्नामध्ये एखादा वासरू बांधलं असेल, आपल्याला काय घेणं!! वासरे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वार याचाच समानार्थी शब्द आहे. अनेक वेळा भौम् वासरे देखील लिहिलेले असते आणि पुढे मंगळवार पण दिलेले असते. हे म्हणजे लेडीज महिला असं म्हटल्यासारखे द्विरुक्तीचे उदाहरण झाले मात्र साध्या सोप्या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड केल्या तरच ज्योतिषी मंडळीची हुशारी लोकांना दिसेल ना!! भानुवासरे किंवा आदित्यवासरे(रविवार), इंदुवासरे(सोमवार), भौमवासरे(मंगळवार), सौम्यवासरे(बुधवार), बृहस्पतीवासरे(गुरुवार), भृगवासरे(शुक्रवार), मंदवासरे(शनिवार) अशी आठवड्यातील वारांची नाव...

राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण

Image
राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यांच्या निमित्ताने जेवढी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा भारतात सर्व भाषेतील न्यूज चॅनल्स मनोभावे करतातच. काही महिन्यांपूर्वी एका न्यूज चॅनलला तर असं दाखवलं की एका इंग्रजी महिन्यामध्ये दोन चंद्रग्रहणे येत आहेत, तर नक्कीच अशुभ काळ सुरू होणार आहे. खरंतर अंधश्रद्धा आणि दहशत पसरवल्याबद्दल अशा चॅनलवर कारवाई व्हायला हवी. सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यामागे केवळ गणित असते. आणि ते गणित आपल्या पूर्वजांना हजारो वर्षापूर्वीच चांगले माहीत झाले होते. मात्र आज एकविसाव्या शतकात जेव्हा प्रसिध्दीमाध्यमातील प्रतिनिधी त्यांचे अज्ञान प्रदर्शित करत असतात, तेव्हा त्यांची कीव येते. राहू केतू हे राक्षस असून खरच सूर्य चंद्राला गिळतात असेही कदाचित त्यांना भविष्यात वाटेल.. खरं तर त्यांच्या बुद्धीला ग्रहण लागलेलं असतं.😭😭   आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास अगदी अचूकपणे करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे भविष्यातील ग्रहणे कोणत्या तारखेला किती वाजता येणार आहेत, ती कुठून दिसणार आहेत हे आपण अगदी अचूकपणे सांगत असत...

धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच

Image
धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच डावकिनाचा रिच्या धूमकेतू.. अवकाशातील एक आकर्षक मात्र दुर्मिळ आविष्कार. धूळ आणि बर्फाचा बनलेला एक मोठा आकार जो सूर्याभोवती फिरतो. लांब आणि प्रकाशमान शेपटामुळं धूमकेतू अतिशय सुंदर दिसतात. आणि ते क्वचितच दिसतात म्हणून त्यांना भाव मिळतो. जसं आमिर खान वर्षा-दोन वर्षांतून एकच चित्रपट काढतो तर लोक उत्सुकतेनं वाट पाहतात, तोवर अक्षय कुमारचे पाच सहा चित्रपट कधी येऊन जातात ते पण कळत नाही.😭 या आकाशस्थ हिरोला भाव देत आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून धूमकेतूंचं निरीक्षण नोंदवलं आहे. लांब पांढरे केस मोकळे सोडून फिरणाऱ्या झिपऱ्या म्हातारीप्रमाणे त्यांना धूमकेतू वाटला. अर्थात त्यांच्या काळात हॅरी पॉटर सिरीज आली असती तर त्यांनी हॅरीच्या झाडूची उपमा धूमकेतूला दिली असती.🤔  आकाशात आपल्या नेहमीच्या ग्रहताऱ्यांपेक्षा काही वेगळे घटक देखील फिरत असतात. अशनी किंवा ॲस्ट्रॉईड हे देखील त्यापैकी एक. आपल्या सौरमालेत मंगळानंतर आणि गुरुपूर्वी ॲस्ट्रॉईडचा मोठा पट्टा आहे, ज्यामध्ये लाखो अशनी देखील सूर्याभोवती फिरत आहेत. याशिवाय भरपूर लहानमोठे घटक अंतराळात फिरत असतात, कधीकधी ते गुर...

जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी

Image
जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी कोsहम..  मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? माझा आणि या सृष्टीचा निर्माता कोण? मानवी बुद्धीला पडलेला हा आदीम प्रश्न. प्रत्येक संस्कृतीमध्ये त्याची वेगवेगळी उत्तरं शोधली गेली. ईश्वर संकल्पना निर्माण करण्यात आली. अध्यात्म आणि वेगवेगळी ग्रंथसंपदा तयार झाली आणि या काल्पनिक आधारांच्या बळावर मानवाने स्वतःची समजूत करून घेतली की तो निर्माता नक्की कोण असावा. या निर्मात्याची काल्पनिक जन्मकथा जन्माला आली. विज्ञानाच्या या जगात आता आपल्याला कोणत्याही काल्पनिक आधाराची गरज राहिली नाही.  गेल्या दीडदोन शतकात उत्क्रांतीचे सिद्धांत तसेच बिग बँग, सृष्टीच्या निर्मितीचे, ताऱ्यांच्या जन्माचे सिद्धांत मांडण्यात आले. या सिद्धांताचे समर्थन करणारे नवे नवे पुरावे समोर येत गेले, अजूनही रोज नवे पुरावे समोर येत आहेत.. आता तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे विज्ञानाची दृष्टी एवढी विकसित झाली आहे की अब्जावधी वर्षांचा कालखंड ओलांडून मानव त्या काळात डोकावून पाहू शकेल. तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज अर्थात ताऱ्यांच्या जन्माचा मरणाचा सोहळा आपल्याला पाहता येऊ शकतो. विश्वाच्या निर्मित...

महिन्यांची नावं कुठून आली?

Image
महिन्यांची नावं कुठून आली? जानेवारी, फेब्रुवारी आणि सोमवारी, मंगळवारी.. लहानपणी दोन्हीचा काही संबंध असेल असं वाटायचं. पण क्रमवार आणि सहावार, नववार यामधल्या वारांचा जसा एकमेकांशी काही संबंध नाही त्याच पद्धतीनं आठवड्याच्या वारांचा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या नावाशी काहीच संबंध नाही.. खरं तर महिन्याच्या नावांमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने निर्वासित आहेत, कदाचित म्हणूनच त्यांचं वेगळेपण आहे. त्याआधी, जेव्हा दहा महिन्याचं वर्ष पकडलं जायचं, हे दोन महिने आणि त्यांची नावं अस्तित्वात नव्हती. तेव्हा नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरू व्हायचं. 😳   होय.. मार्च महिन्यापासून सुरू झालेल वर्ष डिसेंबर महिन्यात संपायचं. आणि त्यापुढच्या काळात कडक थंडी असल्यामुळं पुढचे दिवस सोडून दिले जायचे. त्यांच्याकडे आधी ८ दिवसाचा आठवडा होता.. आणि ३८ आठवड्याचे वर्ष. ३८*८ म्हणजे केवळ ३०४ दिवस होते का वर्षात?? नाही... वर्ष ३६५ दिवसाचेच होते, तरी बाकीचे ६१ दिवस हे चक्क सोडून दिलेले असायचे. कारण युरोपात एवढी कडाक्याची थंडी पडायची की दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले असायचे. आता देखील नाताळ म्ह...

एक एप्रिल च्या निमित्ताने : लोच्या झाला रे

Image
एक एप्रिलच्या निमित्ताने : लोच्या झाला रे एक एप्रिल हा लोकांना मूर्ख बनवायचा दिवस. "बुरा ना मानो होली है" या टाईपमध्ये या दिवशी मूर्ख बनवले तरी लोकं हसण्यावारी नेतात. माणसं खोटे बोलतात..सर्रास खोटं बोलतात.. कदाचित उत्क्रांतीमध्ये मानवाला भेटलेली ही देणगी असावी, फलनासाठी किंवा भोजनासाठी सजिवांमध्ये आपल्या प्रजातीबाहेरील प्राणी, कीटक यांना फसवण्याचे प्रकार संशोधनातून समोर आले आहेत. मात्र आपल्याच प्रजातीला फसवण्याचा मार्ग इतर सजीव सहसा अवलंबत नाहीत. मात्र काही लोकं खोटे बोलण्यात एवढे सराईत होतात, की आपण खोटे बोलत आहोत हे देखील त्यांना लक्षात येत नाही. राजकारणात तर लोक अपरिहार्यपणे खोटं बोलत असतात, प्रत्येकालाच सत्याचे प्रयोग करायला जमत नाही.. परंतु सर्रास खोटं बोलण्यासाठी, किंबहुना असत्य हेच हत्यार म्हणून वापरण्यासाठी निबर काळीज आणि पाठीमागे आयटीची फौज लागते. 😀   जेव्हा मोबाईल आले नव्हते आणि गावातील मोजक्याच लोकांकडे लँडलाईन असायची तेव्हा एप्रिल फुल करणं खूप सोप्प जायचं. माणसं सहज फसायची. अर्थात तो काळ वेगळा होता, ज्या काळात केवळ सणवार असतानाच ताटात श्रीखंड दिसायचं, मात्र...