ही सृष्टी बनवणारा कोण

ही सृष्टी बनवणारा कोण तरी असेलच ना....... 

सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं
आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था

सृष्टि का कौन है कर्ता?
कर्ता है या है विकर्ता?
ऊँचे आकाश में रहता
सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच में जानता
या नहीं भी जानता
है किसी को नही पता
नही पता
नही है पता.... नही है पता

शाम बेनेगल दिग्दर्शित "भारत एक खोज" मालिकेचे हे शीर्षक गीत.. मानवाचा मेंदू जेव्हा विकसित होऊ लागला आणि त्याला सृष्टी, अंतरीक्ष, ऋतुचक्र यांचे कुतूहल निर्माण होऊ लागले तेव्हा त्याच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले .. आणि त्याने जी उत्तरे त्यावर शोधली याचे सुंदर वर्णन या गीतात केले आहे. पृथ्वी वरील आणि अंतरिक्षातील नवलाई पाहून केवळ मानवालाच प्रश्न पडतात बरं का.. इतर प्राण्यांना नाही... 

या साऱ्या नवलाईचा निर्माता कोण असेल याची कल्पना प्रत्येक संस्कृतीतील मानवाने त्याच्यापरीने केली आहे. जसे ब्रम्ह हा निर्माता, विष्णु हा पालनकर्ता आणि शिव हा अंतकर्ता अशी आपल्याकडे समजूत तशीच जगातील सर्वच आदीम संस्कृती मध्ये दिसून येते..

तीन देव आणि त्यांना दिलेली कामे मेसापोटियन संस्कृतीत अगदी तशीच आहेत.. फरक एवढा की आपले जसे शंकर बाबा कैलासावर जाऊन बसले आहेत आणि विष्णु क्षीरसागराच्या तळाशी आराम करत आहेत.. तसे यांचे तीन तारे आकाशात उत्तर, दक्षिण आणि मध्यभागी आपला डेरा टाकून बसले आहेत.

प्राचीन चीन मध्ये देखील तीन देवतांना महत्त्व देण्यात आले आहे..मात्र इथे यात एक महिला आहे (३३% आरक्षण आहे बाबा) आपल्या ब्रम्हाच्या ऐवजी तिकडे एक पंगू आहे ज्याने हे विश्व निर्माण केले आहे.. आणि मानव निर्माण केला आहे नुवा देवीने.. तिचा भाऊ कम नवरा फुक्सी हा देवांचा हीरो.  भाऊ कम नवरा शब्दाला दचकू नका. आपल्याकडे देखील यम यमी संवादात बहीण भावासोबत प्रबळ कामेच्छा प्रकट करते.  (नवनाथ कथामध्ये तर असे उल्लेख आहेत की ब्रम्ह आपल्या पोटच्या पोरीवर अनुरक्त होतो.. पुढे काय घडते सांगत नाही.. आंबट शौकीन लोकांनी स्वतः वाचावे..)

जपान मधील प्राचीन शिंतो संस्कृतीत तीन देवतांनी विश्व बनवले असे मानले जाते.. यात सर्वात महत्त्वाची देवता स्त्री आहे बरं का... नंतर अजून देव आले (भाऊ बहीण च बर का) त्यांनी पृथ्वीवर येऊन आधी समुद्र हटवून जमिनीची निर्मिती केली, त्यानंतर एक एक करत अनेक देवांची निर्मिती केली.. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत म्हणून आपण हसतो.. मात्र चिमुकल्या जपान मध्ये देखील ८० लाख देव (कामी त्यांच्या भाषेत) आहेत. नोर्स संस्कृतीत पण ओडीन, थॉर आणि स्त्री देवता फ्रेया या त्रिकुट भोवती विश्र्वनिर्मिती आणि संचालन यांची जबाबदारी दिलेली असते.

माया संस्कृतीत हे विश्व बनवणारी देवांची एक टीम असल्याची मान्यता होती. त्यांची पूर्ण खात्री होती की आकाशातल्या ताऱ्यांवर देव राहतात...  आणि पृथ्वीवर आलेले 'देव' हे वृषभ राशीतील तारकापुंजातून आले होते. लक्षात घ्या.. ही काही रानटी संस्कृती नव्हती.. शुक्राचे ५८४ दिवसांचे चक्र तर पृथ्वीचे ३६५.२५ दिवसांचे अचूक कालमापन करणारी ही संस्कृती होती. या संस्कृतीत देखील निर्माता, पालनकर्ता आणि अंत कर्ता अशी विभागणी तीन देवात झाली आहे..या देवांना खुश ठेवण्यासाठी यज्ञ करायची, बळी द्यायची परंपरा होती.

म्हणजेच प्रत्येक प्राचीन संस्कृतीने विश्वाच्या निर्मितीचे कोडे त्यांच्या त्यांच्या बुद्धीने सोडवायचा प्रयत्न केला आहे.. पुढच्या काळात धर्मांचे स्वरूप बदलत गेले, नवीन मिथके जोडली गेली.. अब्राहमी तिन्ही धर्म (इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू) यांच्यात विश्व निर्माण होण्याची अलमायटी अल्ला कल्पना एकच आहे.. 

आपल्याकडे तर इतकी विसंगती की पृथ्वी कुठे.  शेशनागाच्या फणीवर. मग शेषनाग कुठे.. हे विचारायचे नाही.. कोणत्याच यानाला आजवर शेषनाग दिसला नाही😜😜 माती खाल्लेल्या बालकाच्या तोंडात आईला ब्रम्हांड दिसते अशा आपल्या कथा.. मात्र आपण प्रश्न विचारायचे नाहीत.. कारण त्यापुढे त्यांचे वाक्य ठरलेले असते विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते😬

मग त्यांची मांडणी अशी.. " आम्ही म्हणतो सृष्टी देवाने निर्माण केली.. तुम्ही म्हणता बिग बँग ने..मग सांगा बिग बँग आधी काय होते" त्यांना वाटते आपण समोरच्याला निरुत्तर केले आहे.. आता ह्यांचे विज्ञान संपले.. आता आपले अध्यात्म पटेलच..

बिग बँगच्या आधी काय होते याचा शोध विज्ञान घेत आहे.. आणि आजवरचे वैज्ञानिक पद्धतीचे यश पाहता त्यामागे आपण जाऊ शकू.. पण त्या आधी देखील काय असेल हा प्रश्न तेव्हा असेल.. जे एंडलेस आहे.. मात्र याच एका कारणासाठी कुणी देव संकल्पना मानायची काही गरज नाही... कारण त्या देवाच्या जन्मा आधी काय होते हा प्रश्न तेव्हा पण राहतोच.. जर कोणी निर्मिक असेल तर तो पण कुणाची तरी निर्मिती असेल ना.. हे साधे तत्व आहे राव.. त्यापेक्षा हे विश्व स्व कार्य कारण भावाने बद्ध आहे.. कोणी निर्मिक नाही असे म्हणणं जास्त संयुक्तिक आहे.

 " तुम्ही महात्मा फुले यांना मानता ना.. मग त्यांनी पण निर्मिका ची संकल्पना मांडली होतीच की" महात्मा फुले यांचा कालखंड पाहता त्यांनी जी चिकित्सा केली तीच मुळात अद्वितीय आहे.. मात्र त्या काळात त्यांच्यापुढे उपलब्ध असलेल्या माहितीला मर्यादा होत्या.. त्यांना काय कोणत्या देवाकडून संदेश येत नव्हते😜 तर उपलब्ध माहितीच्या आधारे विवेकबुद्धी आणि मानवता केंद्रित धरून त्यांनी "सत्यशोधक समाजाची" निर्मिती केली.. त्यावेळी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला नसल्याने त्यांना निर्मिक असावा असे वाटले. 

आजच्या काळात उत्क्रांतीचे पुरेसे पुरावे समोर आले आहेत. विज्ञान रोज नवीन माहिती समोर आणत आहे... तरीही विज्ञानाला त्याची मर्यादा माहीत असते.. मर्यादा समजणे आणि मान्य करणे हाच तर विज्ञानाचा मोठेपणा..

अध्यात्माला मर्यादा मान्य नसतात.. विश्वाचे ज्ञान आमच्या आणि आमच्याच धर्माला समजले आहे असा सगळ्यांचा दावा असतो..  खरे तर अध्यात्म म्हणजे नुसते शब्दाचे बुडबुडे... व्यवहारात शुन्य किमतीचे असते... शून्य आहे म्हणून तर त्याने कशाला भागता येत नाही😀 मात्र आजच्या काळात अध्यात्माचा ढोल वाजवणारे नाहक दमतभागत असतात. दमु द्या बिचारे. आपल्याला काय

आपल्याला माहीत जीवन एकदाच आहे.. पाप पुण्ण्याच्या लफड्यात पडायचे नाही आपल्याला.. आपली सद्सद्विवेक बुद्धी सांगेल तसे वागायचे आणि मस्त बिनधास्त जगायचे.. आयुष्यावर प्रेम करायचे भरपूर आणि जीवन सुंदर करायचे.. आपले पण आणि सोबत्यांचे पण... आपण काय बरे वाईट करतो हे आपले मन जाणत असते, त्याला कोणी फसवू शकत नाही.  तेव्हा जगताना आपल्या मनाची चाड बाळगली तरी पुरे.. आकाशातून तुम्हाला कोणी बघणारे नाही...

नाही पुण्ण्याची मोजणी 😍
नाही पापाची टोचणी😍😍

https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव