शेंडी जाणवे आणि दाढी टोपी
शेंडी जाणवे आणि दाढी टोपी
११ जुलै रोजी फुले हा सिनेमा प्रदर्शित होत आहे, ज्याचा टीजर नुकताच रिलीज झाला असून त्यावर ब्राम्हण महासंघाने आक्षेप नोंदवला आहे. शाळेत मुलींना शिकवायला जाणाऱ्या सावित्रीमाईवर एक शेंडी जाणवे धारी बटू शेण फेकतो असे दृश्य आक्षेपार्ह आहे असे त्यांचे म्हणणे आहे. शेंडी जाणवे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा रास्त इशारा त्यांनी दिला आहे.
मुळात दिग्दर्शकाला समजायला पाहिजे होते की शेंडी जाणवे ही या देशाची संस्कृती आहे, त्याला खलनायकी वृत्ती दाखवायची असतील तर सध्या ट्रेंड मध्ये असलेली दाढी टोपी ही प्रतीके दाखवायची होती ना.. आपण कोणत्या देशात राहतो एवढे पण अनंत महादेवन या दिग्दर्शकाला समजू नये का?त्यांना समजत नसेल तर मी या चित्रपटासाठी दोन दृश्य नव्याने लिहितो..जी या बदलत्या भारतासाठी एकदम ओके असतील..
१) हिरव्या रंगाचे एक घर, मागे नमाजाची बांग ऐकू येते आहे. बचकभर सुरमा लावलेला, दाढी लाल रंगाने रंगवलेला उस्मान दारूचे घोट पित बसला आहे..तेव्हढ्यात अब्दुल धावत येतो..दोघांच्या डोक्यावर दाढी टोपी आहे
उस्मान: क्या हुवा अब्दुल
अब्दुल: चाचा.. वो सावित्रीबाई लडकियो को पढा रेली है..
उस्मान: उसकी इतनी जुर्रत..
अब्दुल: देखो ना चाचा..उसके स्कूल मे पुणे के सब बम्मन उनकी पोट्टीयोको स्कूल भेज रेले..
उस्मान: और तुम लोग क्या खाली मुह देखते फिर रेले क्या?
अब्दुल: नय ना चाचा.. अब्बि सावित्रीबाई के अपर गोबर फेक के आरेला ना मे.. वो भिकंभट ने देखा.. उसके हात लगता, तो चपाट पडती.. इस्लिए भाग के आया..
उस्मान: देख अब्दुल, अगर गोबर मारने से भी सावित्रीबाई बाज नय आती तो कल उसकू पत्थरा मार.. उसका स्कूल बंद होना मंगदा.. नय तो एकबार पोट्टीया सीख गई तो देश की तहजीब बिगड जाएगी..
अब्दुल: वो बम्मन लोगो का कुछ करो ना.. वो कायकु उसका साथ दे रेले.
उस्मान: देख, ये सनातनी बम्मन ऐसेंच करेंगे.. उसकाच साथ देंगे.. मगर हमे चुपके, छुपके हल्ले करने पडेंगे और उसका स्कूल बंद गिरायेंगे.. इंशाअल्लाह हम जरूर कामयाब होंगे..
अब्दुल: आमेन
मागे पुन्हा एकदा नमाजाची बांग..
२) उस्मान : अब्दुल.. ये क्या सुन रेला मे, हजाम लोगो ने बम्मन बेवाओके सर की हजामत करणे से इनकार किया.. ऐसा कैसे चलेगा?
अब्दुल: नाई और बम्मन सब वो जोतिबा को मिल गये है.. वो सब बम्मन बोलते है के हमारे बहूबेटीयोकी सर की हजामत नहीं करेंगे..
उस्मान : तो क्या अब गोपालभट की बहन का सर भी नहीं मुंडेगा?
अब्दुल: गोपालभट तो बोला, किसीभी मुसलमान की हिंमत हो, तो वो मेरी बहन की तरफ आख उठाके देखे.. उसकी आखे निकालुंगा लेकीन अपने बहन का सर नहीं मुंडवावुंगा..
उस्मान: खवीस की औलाद.. रामशास्त्री की बहू तो अभी बेवा हुइ है ना.. उसका तो सर जरूर मुंडवा देना चाहिए
अब्दुल: रामशास्त्री तो बोलता उसकी बहू का दुजा ब्याह रचाउन्गा.. या फिर उसकू पढाउन्गा..
उस्मान : या खुदा. या अल्लाह.. या परवर्दीगार.. ये क्या कयामत ढा रहे हो.. बेवा लोग बाल रखेंगे तो दीन का क्या होगा..
(इथे अरेबिक संगीतातील एखादे गाणे टाकता येईल.. गाणे ऐकताना आणि नृत्य पाहताना उस्मान त्याचे दुःख विसरतो वगैरे दाखवता येईल..)
मला वाटते चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून काही दिवस आहेत, तोवर दिग्दर्शकाने हे दोन सीन बदलून घ्यावेत.. देशाच्या अस्मितेसाठी, देशाच्या संस्कृतीसाठी.. धर्मासाठी, धर्मरक्षकासाठी
जय वैदेही परशुरामी..
#richyabhau
Comments
Post a Comment