कुंभ मेळा.. वेड्यांचा बाजार
या वर्षी आषाढी एकादशी झाली. कोरोनाच्या साथीच्या सावटामुळे मुळे या वर्षी पायी वारी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा पंढरीत फुलला नाही. शासन निर्णया ला वारकरी संप्रदायातील सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. याच वेळी प्रकर्षाने जाणीव झाली कुंभमेळ्याची.
दर बारा वर्षांनी येणारी सिंहस्थ पर्वणी.. त्या निमित्ताने होणारा शासन पुरस्कृत नंगा नाच.. हो शासन पुरस्कृत म्हंटले पाहिजे कारण ४५० कोटींचे बजेट या पर्वणीसाठी दिले जाते. आणि त्यातून साध्य काय होते.. अंधश्रद्धेची बजबजपुरी माजण्या पलीकडे यातून काहीच मिळत नसते.
तिथे येणारे साधू कोण असतात... मुळात त्यांना साधू म्हणावे का हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांनी साधू कुणाला म्हणायचे हे आपल्या अभंगात सांगितले आहे. मृदू सबाह्य नवनीत ऐसे ज्याचे चित्त.. इथे अंघोळीच्या क्रमांकाच्या मानावरून हाणामाऱ्या होतात, प्रसंगी खून पडतात असले हे साधू..
अंघोळीला जात असताना बँडबाजा लावून स्वतची मिरवणूक काढणारे... ज्यांच्यासाठी गांजाची आयात टनावर केली जाते. काय भले केले आहे समाजाचे या साधूंनी.. निम्मे अर्धे तर गुन्हेगार असतील त्यात.. गुन्हे करून फरार झालेले अन् ओळख लपविण्यासाठी या टोळ्यांमध्ये सामील झालेले.. आणि या लोकांसाठी ४५० कोटी रुपये सोबत सगळी शासकीय यंत्रणा दिमतीला.
ज्या राज्यात प्रचंड बेकारी आहे अश्या उत्तर प्रदेश ने २०१९ साली झालेल्या मेशस्थ पर्वणीसाठी ४२०० कोटी रुपये खर्च केले😬😬 तिकडं मानसिकताच विचित्र आहे.. पण आपल्या महाराष्ट्रात असल्या थेरांची खरचं गरज आहे का. महाराष्ट्र म्हणल की प्रबोधनाची परंपरा डोळ्यापुढे येते. वारकरी परंपरा आणि पुढे फुले शाहू आंबेडकर विचारांनी जिथे मनांची मशागत केली आहे. तिथे किमान शासनाने तरी आपली भूमिका बदलायला हवी. जनतेचा पैसा असा निरर्थक कामासाठी उडवायला नको.. निरर्थक च.. कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात
आली सिंहस्थ पर्वणी l न्हाव्या भटा झाली धणी ll
अंतरीं पापाच्या कोडी l वरि वरि बोडी डोई दाढी ll
पाप गेल्याची काय खूण l नाही पालटले अवगुण ll
भक्ती भावे विन l तुका म्हणे अवघा शिन ll
मुळात गुरु ग्रह सूर्याभोवती फिरत असताना सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणे याला खगोलीय दृष्ट्या काहीच महत्व नाही. शब्दशः सिंह राशीत काही गुरु प्रवेश करत नसतो.. सिंह राशीचा प्रमुख तारा आपल्या पासून १२०० प्रकाश वर्षे लांब आहे. तर गुरु केवळ आपल्यापासून प्रकाशाच्या वेगाच्या आठ मिनिटे अंतरावर ( ०.००००८ प्रकाश वर्ष).
ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज ( हे नाशिकचे रहिवासी.. जिथे सिंहस्थ पर्वणी भरते) हे आपल्या कवितेत या सगळ्या थोतांडा वर आसूड ओढताना व्यथित होऊन म्हणतात
व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार वांझ झाले.
आपल्याला आपली संत परंपरा हवी आहे की कुंभ मेळ्याचा नंगा नाच.. आता पासून वादळ उठवले तर पुन्हा २०२७ मध्ये येणाऱ्या संकटाला विरोध करण्यासाठी जनमानस तयार होईल.. तेव्हा पोस्ट आवडली..तर जास्तीत जास्त शेअर करा. 🙏
#richyabhau
#कुंभमेळा
Comments
Post a Comment