७२ हूर .. एक प्रवास
७२ हूर .. एक प्रवास🤨
काल एक व्हिडिओ भेटला.. व्हिडिओ मधील ह्या मौलाना ला खरी युवकांची नस सापडली आहे. जिहाद मध्ये शहीद व्हा .. जन्नत मध्ये प्रत्येकाला ७२ हूर (अप्सरा) मिळणार... भारी ऑफर दिली आहे राव..
आसपास बुरखा धारी मुली बघून ज्यांचे डोळे आसुसले आहेत, त्यांच्यासाठी ही प्रानापेक्षा प्रिय गोष्ट होणार.. त्यासाठी जिहाद करताना दुसऱ्याला मारणेच काय स्वतच्या बुडाखाली सुद्धा बाँब फोडून घेतील रताळे.....
इतके दिवस विचार यायचा ७२ हूर एकदम भेटून काय उपयोग आहे.. पण त्याचे उत्तर पण मौलाना कडे आहे... नो शिलाजीत. नो व्हायग्रा.. कशाची गरज नाही. इथे 100 पुरुषांची ताकद आपोआप मिळून जाते.. ऑफर सॉलिड ना....
यार एवढी मोठी ऑफर कोणत्याच धर्मात नाही.. हिंदू धर्मात स्वर्ग म्हणजे काय तर मस्त कल्पवृक्ष खाली बसायचे किंवा कामधेनू कडे मागायचे.. तुमच्या सगळ्या सात्विक इच्छा पूर्ण होतील.. पोटभर अमृत प्या.. इंद्राच्या दरबारात मेनका रंभा उर्वशी चा डान्स सुरू असेल तर त्याचा सात्विक आनंद घ्या....
जे काही आहे ते सगळे सात्विक.. अप्सरा जरी तुमच्या पुढे नाचत असल्या तरी त्यांना हात नाही लावायचा.. नायतर इंद्र लगेच भडकतो.. गाढवचे लग्न पाहिले आहे ना .. तुमची एन्जॉयमेंट ची व्याख्या इथे फिट बसत नसेल तर नाईलाज..
कारण बसायच्या सगळ्या जागा नरकात.. आपले सगळे मित्र नरकात.. आंबटशौकीनांचे पुरवठादार सगळे नरकात.. मग कोणाला मोह पडेल स्वर्गाचा.. असल्या फुस्क्या स्कीम ला वैतागून लोक पुण्य करायचे टाळतात.. ज्यामुळे हिंदू धर्माची अवनती होत आहे असे आता माझे ठाम मत झाले आहे. कुणाला रे आकर्षण वाटणार..
माझ्या आधी जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर देखील म्हणाले आहेत
अरे इंद्रा सांगू नको त्या मेनका त्या उर्वश्या
हव्या कुणाला विसळूनी तुमच्या या उष्ट्या कपबश्या😂
सोबतच्या व्हिडिओ मध्ये पाहा. मौलाना किती आत्मविश्वास ने ऑफर सांगत आहे राव.. नक्कीच याचा बापाने जन्नत मध्ये ही सगळी ऐश करत असताना वेळात वेळ काढून ह्याला कळवले आहे.
मुळात जन्नत मध्ये किती हूर चा साठा आहे याचा आकडा पण एकदा जाहीर व्हायला पाहिजे .. कारण जिहादी वाढत आहेत .. का मागणी तसा पुरवठा हा सिद्धांत तिथे पण लागू आहे. त्याशिवाय थोडी अशी ऑफर जाहीर करतील.. कुणीतरी ग्राहक संरक्षण कायद्या खाली खेचले असते ना आता पर्यंत😂
मुस्लिम महिलांना मात्र अशी काहीच ऑफर नाय😔 परवा एका पोस्ट वर एक विद्वान मित्र आले होते सांगायला की इस्लाम मध्ये सगळ्यात जास्त समानता आहे. 😂😂 मग इथे का नाही.. याचे पण उत्तर द्यावे.. orgasm ची गरज फक्त पुरुषांना नाही स्त्रियांना पण असते.. त्यांच्या साठी काही आॅफर काढली तर जिहाद मध्ये महिला पण जास्त येतील ना..
अर्थात आता सुरू असलेल्या ऑफर चा परिणाम होतोय याची सनातन हिंदू धर्मियांनी गंभीर दखल घ्यायला पाहिजे. विशेषत साध्वी योगी वगैरे बिरुदे लावून मिरवतात त्या लोकांनी.. आपल्याला तरुण वाढवायचे असतील तर बघा इकडे पण काही अशी ऑफर देता येईल का.
वाटल्यास शंकराचार्य लोकांची बैठक बसवा. आहे त्या पोथ्या तून काही तोडगा काढा. रीच्याची मदत लागली तर सांगा. आपण तर तरुण तरुणींसाठी असे काही विधायक करायला कायम उत्सुक.. फक्त लैंगिक विषमता करू दिली जाणार नाही.🙏🏽🙏🏽
पोस्ट आवडली तर बिंदास शेअर करा.
#richyabhau
Video rahila yat
ReplyDeleteहो ना राव.. व्हिडिओ जोडला जाईना...
Delete