मेंदू नसलेले कळप


लोकांना शांती, विवेक सांगणे खूप अवघडच... कृष्णाला अर्जुनाला युद्धास उद्युक्त करणे शक्य झाले..  दुर्योधनाला शांतीसाठी नाही...

जसे वणवा लावणे सोपे असते.. एक काडी सुद्धा पुरेशी ठरते.. मात्र जंगल वाढवणे अनेक वर्षे घेतात. तसेच डोकी भडकावने सोपे असते.. डोक्यात विचार पेरणे अवघड... स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून विचारांशी सहमत नसलेल्या व्यक्ती, समाजाची हत्या घडवून आणणे खूप सोपे असते.. बस तुम्हाला गरज असते मेंदू न वापरणाऱ्या कळपाची.. याचे खूप छान वर्णन गुलाल मधील गीतात पियूष मिश्रा यांनी केले आहे...

आरम्भ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या कि जान का हो दान
आज इक धनुष के बाण पे उतार दो
आरम्भ है प्रचण्ड...

मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले
वही तो एक सर्वशक्तिमान है
कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है
कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है
कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो
जो लड़ सका है वो ही तो महान है
जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो
मौत अंत है नहीं, तो मौत से भी क्यों डरें
ये जा के आसमान में दहाड़ दो
आरम्भ है प्रचंड...

वो दया का भाव, या कि शौर्य का चुनाव
या कि हार का वो घाव तुम ये सोच लो
जिस कवि की कल्पना में, ज़िन्दगी हो प्रेम गीत
उस कवि को आज तुम नकार दो
भीगती मसों में आज, फूलती रगों में आज
आग की लपट का तुम बघार दो
आरम्भ है प्रचंड...

इतक्या प्रभावी शब्दात या मस्तकांच्या झुंडीचे वर्णन मला तरी इतर कुठे आढळले नाही.. गम्मत म्हणजे हे गीत पियूष मिश्रा यांची परवानगी न घेता त्या पक्षाने निवडणूक प्रचारासाठी वापरले.. जे मस्तकांच्या झुंडीचे आणि हिंसेचे राजकारण करत आलेत... कदाचित त्या साऱ्या पक्षात या गाण्याचा आशय समजून घेण्याची पात्रता कोणत्याच व्यक्तीत नसावी.. मस्तकांचे कळप आहेत नुसते...  

पण हे कळप जाणीव पूर्वक निर्माण केले जात आहेत ... त्यासाठी आवश्यक असते काही तरी करू पाहणारी तरुणाई.. हळूहळू त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांच्या पुढे आभासी शत्रू निर्माण केले जातात आणि त्यांच्या विरूध्द हिंसा करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले जाते... त्यांचे मेंदू हायजॅक केले जातात.. दंगली घडवल्या जातात, खून पाडले जातात..

भिडे, एकबोटे बनणे सोपे असते.. दाभोलकर, पानसरे बनणे अवघड..

अवघड असले तरी आपण आपल्या परीने विवेकाचा प्रचार करू या... समोरचे हिंसा, द्वेष पसरवतील.. आपण विवेक, चिकित्सा, प्रेम हेच पेरुया... ✊✊

Comments

  1. दादा, शेअर करतोय.

    ReplyDelete
  2. हे गीत सुद्धा मला माहित नव्हते; आणि ते कोणत्या पक्षाने निवडणूक प्रचारात वापरले हे सुद्धा माहित नव्हते. खरे तर हे गीत उपहासात्मक, उपरोधात्मक आहे. त्याचा हेतू बिनडोक लोकांना टोचून त्यांचे डोके हलवण्यासाठी व त्यांना सुधारण्यासाठी आहे आणि जे अद्याप डोके शाबूत ठेवून आहेत त्यांना बिनडोक होण्यापासून वाचवण्यासाठी आहे. परंतु जर या गीताचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी केला गेला असेल तर तो लोकांना बिनडोक बनवण्यासाठीच. म्हणजे यातील उपरोध, उपहास लक्षात आलाच नाही. नीच लोक कशाचा कसा उपयोग करून घेतील ते सांगताच येत नाही. हे लोक धर्म नाही अधर्म पसरवित आहेत. हे लोक संस्कृती नाही, विकृती निर्माण करीत आहेत. समाजात जेवढा नीचपणा, अनैतिकता वाढेल तेवढा या लोकांचा फायदा होईल असे यांचे सामाजिक आणि धार्मिक तत्त्वज्ञान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो अगदी बिनडोक पणे या गीताचा वापर भाजपा ने केला होता😀

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव