देव .. नाबाद

 W G ग्रेस यांना इंग्लंड मध्ये क्रिकेटचे पितामह म्हणले जाते.. इंग्लंड मध्ये क्रिकेट रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची बॅटिंग बघायला गर्दी जमायची.. आणि ते खेळायचे पण धमाल.. अनेक किस्से मशहूर आहेत त्यांचे.... 


पण त्यांची एक खोड होती.. आपण आऊट झालो आहे हे मान्य करायला तयार नसत.. एकदा पहिल्या बॉल वर lbw आऊट दिल्यावर हा भाऊ अंपायर ला जाऊन बोलला पण "ही जी लोक आली आहेत.. ती माझी बॅटिंग पाहायला आली आहेत.. तुझी पंच गिरी बघायला नाही." 😁😁😁


तर थोडक्यात नंतर अंपायर मंडळींवर पण दडपण असायचे ह्याला आऊट देताना चूक व्ह्यायला नको असे


एकदा हा बॅटिंगला आला .  पहिल्या बॉललाच चेंडू ह्याच्या बॅटचे पुसटसे चुंबन घेऊन कीपरच्या हातात.. जोरदार अपील...  मात्र याचे हावभाव असे.. की कट लागलाच नाही .. अंपायरने नाबाद दिले.


दुसऱ्याचं बॉलच्या वेळी ह्याचा पाय स्टंप समोर... Lbw चे जोरदार अपील.  मात्र याने bat दाखवून सूचित केले की bat ला देखील चेंडू लागला होता.. अंपायरचा निर्णय अर्थात "नाबाद"


बॉलर तर इरेला पेटला... तिसरा बॉल असा टाकला की ह्याचा ऑफ आणि मिडल स्टंप गुल... नाराज ग्रेस त्या उडालेल्या स्टंप कडे बघत असताना बॉलर जवळ आला आणि म्हणाला... दोन स्टंप उडाले आहे.. कदाचित लेग स्टंप जागेवर आहे हे पाहून तुम्हाला वाटत असेल तुम्ही आऊट नाही😀


देव संकल्पना पण अशीच हट्टी आहे.. किती वेळा सपशेल आऊट झाली तरी भक्त मानायला तयार होत नाहीत राव🤣🤣

Comments

  1. आधीच्या चित्रापेक्षा हे हत्तीचं चित्र भारी आहे. पोस्टला मॅच होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके

गोमू आणि गोमाजीराव

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी