विजीगिषू मायकल फॅरेडे

 विजीगिषू मायकल फॅरेडे


न्यूटन, आइन्स्टाइन या थोर प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे नाव घेताना बिचाऱ्या मायकल फॅरेडेकडे बहुतेक वेळा  दुर्लक्ष होते. त्याने लावलेले शोध आणि त्यातून मानव जातीचे झालेले कल्याण पाहता तो या दोघांपेक्षा मुळीच कमी नाही.


न्यूटन नंतर आणि आइन्स्टाइन च्या आधी असा मधल्या काळात याचा जन्म झाला.. त्याची आत्मकथा ही अतिशय रोमांचकारी तसेच प्रेरणा दायी आहे. मनात इच्छा असेल तर व्यक्ती सर्व कुंपण तोडून आपले ध्येय कसे गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल फॅरेडे...


शाळेत असताना त्याला र उच्चारता येत नव्हता...मात्र शिक्षिकेला वाटले तो तिची टिंगल उडवतो आहे.. त्याला शिक्षा दिली.. भाऊचा हा शाळेचा शेवटचा दिवस . मग परत कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. 


वयाच्या अकराव्या वर्षा पासून कामाला लागला.. बुक बायंडींग चे काम भेटले.  तिथेच काम करत वाचनाची गोडी लागली.. ती त्याने काळजीपूर्वक जोपासली. त्याचे हे वाचनाचे वेड पाहून एका मित्राने त्याला रॉयल इन्स्टिट्यूट लंडन  मध्ये होणाऱ्या वैज्ञानिक प्रदर्शनाचा पास मिळवून दिला.रॉयल इन्स्टिट्यूट चा संचालक  रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याचे तिथे सप्रयोग व्याख्यान होते.


त्या वेळी डेव्ही खूप लोकप्रिय होता. त्याचे प्रयोग पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करायचे. त्या दिवशी आकाशस्थ विजेवरील संशोधनावर डेव्ही बोलला. त्याचे व्याख्यान ऐकून प्रभावित झालेल्या फॅरेडेने त्या व्याख्यानाची टिप्पणे व प्रयोगाची चित्र काढली. त्या सर्व हस्तलिखितची बांधणी करून त्याचे एक पुस्तक तयार केले. तो डेव्हीला देवून आला. मात्र डेव्हीने त्याची तेव्हा दखल घेतली नाही. 


काही वर्षानी प्रयोग शाळेत रासायनिक स्फोट झाल्याने डेव्ही अंध झाला. परिणामी हुशार मदतनीसाची गरज भासू लागल्याने, त्याने फॅरेडेची सहाय्यक म्हणून नियुक्ती केली. प्रयोग शाळेची सफाई करताना, फॅरेडेच्या प्रयोगकार्याचे निरीक्षण करत, अभ्यास करत, विज्ञान क्षेत्रात त्याने आगेकूच केली.


एके दिवशी डेव्ही हा आपला सहकारी विल्यम वॉलस्टॉन याच्यासमवेत ‘विद्युत चुंबकतत्त्वावर’ प्रायोगिक संशोधन करताना, विद्युतप्रवाह सोडलेली तार चुंबकाप्रमाणे का कार्य करते? याचा शोध घेत होता. दिवस चालले होते, पण उत्तर सापडत नव्हते. वैतागून फॅरेडेला डेव्ही फॅरेडेला उपरोधाने म्हणाला, साफसफाई करून झाल्यावर तू पण एकदा प्रयोग करून बघ.


पडत्या फळाची आज्ञा.. काही दिवसात, फॅरेडेने डेव्हीच्या प्रश्नाचे उत्तर तर शोधलेच, पण त्याही तो पुढे गेला. ‘यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते.’ या तत्त्वावर आधारलेली त्याने पहिली ‘इंडक्शनमोटर’ तयार केली.  या उपकरणाचा वापर करून पंखा, शिवणयंत्र, चारचाकी, आगगाडी, विमान ही प्रगत साधने आज तयार केली जातात.फॅरेडे आता लंडन मध्ये electric boy म्हणून ओळखला जाऊ लागला 


 या शिष्याच्या पराक्रमावर डेव्ही खूश होण्याऐवजी जळू लागला. लोक आता म्हणू लागले की डेव्हीचा सगळ्यात मोठा शोध फॅरेडे ला जगासमोर आणणे हाच आहे. फॅरेडेला दूर करण्यासाठी त्याने एक युक्ती योजली. बव्हेरियम काचेपासून दूरदर्शक दुर्बीण (टेलिस्कोप) व सुक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) केली जायची. त्या काचेतील घटक शोधण्याची जबाबदारी ही डेव्हीने फॅरेडेवर सोपवली. हे काम तो यशस्वी करू शकेल असे मनातून डेव्हीला वाटत नव्हते.  


झाले पण तसेच. फॅरेडेने चिकाटीने चार वष्रे काम करूनही त्याला काचेच्या तुकडय़ातील घटक शोधता आले नाहीत. शेवट त्याने बनवलेला काचेचा तुकडा आठवण म्हणून त्याने कपाटात जपून ठेवला.


१८२९ साली, डेव्हीच्या झालेल्या मृत्यूनंतर फॅरेडे हा प्रयोगशाळेचे प्रमुख झाला. आता त्याला  अडवायला कोणीच नव्हते. त्याने लोकांना थक्क करून टाकणारे प्रयोग दाखवायला सुरुवात केली.  स्वतच्या अंगातून विद्युत धारा खेळवून बोटाने गॅस पेटवणे ... आपण आता दोनशे वर्षानंतर देखील धाडस करू शकणार नाही. लयच येडा ना हा..🤣🤣


 गतिमान चुंबक हा विद्युतप्रवाह निर्माण करतो, यातूनच त्याने विद्युज्जनित्राचा(इलेक्ट्रिक मोटर) शोध लावला. परिणामी भौतिकशास्त्रात फॅरेडेचे नाव कायमचे नोंदले गेले.


१८४०च्या सुमारास फॅरेडेला विस्मरणाचा विकार जडला. तरी चिकाटीने त्याने संशोधन चालू ठेवले. ‘प्रकाशाचा विद्युतचुंबकत्त्वाशी असलेला संबंध’ त्याला शोधायचा होता. या संशोधनात सर्व मूलद्रव्य, रसायने वापरून त्याला यश येत नव्हते. गम्मत म्हणून त्याने तो बहेरियन काचेचा तुकडा वापरून पाहिला. आणि प्रयोग यशस्वी.


 चुंबकसान्निध्यात प्रकाश भिन्न दिशांनी न विखुरता, एकतरंगी होऊन एका दिशेने जातो’ हे सिद्ध केले आणि ‘ध्रुवीकरण’ (पोलनायझेशन) या संकल्पनेचा जन्म झाला.


 विद्युत शक्तीचे प्रयोग लोकांना पटले होते मात्र पृथ्वीच्या चुंबकीय शक्ती या संकल्पनेवर लोक विश्वास ठेवेनात. शिक्षण झाले नसल्याने लोकांना अपेक्षित असलेले गणितीय समीकरण याला मांडता येईना. नैराश्य बरोबर जूना विस्मरणाचा त्रास पुन्हा उफाळून आला. मात्र त्याच्या मदतीला एक तरुण गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ धावून आला...... जेम्स मॅक्सवेल.


‘लोहकिसाजवळ चुंबक नेल्यामुळे त्या किसाची वर्तुळाकार नक्षी तयार होते.’ हे निरीक्षण मॅक्सवेल ने मांडलेल्या समीकरणाच्या आधारे फॅरेडेने सचित्र व सोदाहरण स्पष्ट केले.. आज आपण वापरत असलेल्या जवळ जवळ प्रत्येक उपकरणात विद्युत आणि चुंबक याचा वापर आहे.. ज्याचे श्रेय या गरीब घरात जमलेल्या आणि शाळा न शिकलेल्या वल्ली कडे जाते.


जगात देव नाही .. पण या मानव जातीवर अतिशय उपकार केलेली लोक आहेत.. रीच्याच्या दृष्टीनं तेच देव.. आणि मायकल फॅरेडे😍 महादेव. 💪


पोस्ट मनापासून आवडली तर शेअर करा


#richyabhau

#Micheal Farade

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव