रिचर्ड डॉकिन्स.. आपला भिडू..

  रिचर्ड डॉकिन्स.. आपला भिडू.. 


माझ्या प्रोफाइल वरील नाव ज्यांच्या नावावरून घेतले आहे असे रिचर्ड डॉकिन्स यांना जागतिक नास्तिकवादाच्या चळवळीचे अग्रणी मानले जाते. चार्ल्स डार्वीन नंतर उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे नाव मानाने घेतले जाते.


रिचर्ड डॉकिन्स यांचा जन्म २६ मार्च इ.स. १९४१ रोजी नैरोबी, केनिया येथे झाला. बालपणीच्या त्यांच्या आयुष्यात काही क्लायमॅक्स नाही. विज्ञानाला पोषक अश्या सधन घरात त्यांचे बालपण गेले.  थोडक्यात खायचे प्यायचे वांदे नव्हते आणि विचार करायला स्वातंत्र्य पण होते. नियमित चर्चला देखील ते जात होते.


मात्र वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या वाचनात चार्ल्स डार्विन चा उत्क्रांतीवाद आला आणि त्यांचे जीवन बदलून गेले. त्यांनी चर्च मध्ये जाणे सोडून दिले. महाविद्यालयीन काळात त्यांना जगप्रसिद्ध साहित्यिक आणि नास्तिक सर बर्ट्रांड रसेल यांचे why I am not a Christian पुस्तक वाचायला मिळाले आणि त्यांची नास्तिक धारणा पक्की झाली.


उत्क्रांती वादी जीव शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक म्हणून नाव कमावत असताना त्यांनी विपुल लिखाण केले आहे. द सेल्फीश जीन - १९६७, द एक्स्टेंडेड फिनोटाईप - १९८२, द ब्लाइंड वॉचमेकर - १९८६, द गॉड डेल्युजन - २००६ (मराठी मध्ये अनुवाद देव नावाचा भ्रम ) द मॅजिक ऑफ रियालिटी -  २०११ (मराठी मध्ये अनुवाद जादुई वास्तव) या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत.

द गॉड डेल्युजन या पुस्तकाच्या तीस लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. उत्क्रांतीची सांगड उकलत असताना त्यांच्यातील जीवशात्रज्ञ या मताला येतो की कोणतीही या जगात कोणतीही सुपर natural power असणे शक्य नाही. विश्वाची रचना मानव केंद्रित मानणे बालिश पणाचे आहे.


जोतिषशास्त्रविषयी ते म्हणतात याला शास्त्र म्हणणे खगोलशास्त्राचा अपमान आहे. हे म्हणजे खाजेच्या मलमाची जाहिरात करायला ए आर रेहमान चे संगीत वापरण्यासारखे आहे ( इथे जरा आपल्या भाषेत उदाहरण दिले 😎)


आस्तिक लोक म्हणतात की देव आहे हे आम्ही सिद्ध करू शकत नाही.. नाही हे तुम्ही सिद्ध करा. इथे रिचर्ड भाऊ फिरकी घेत म्हणतात.. की लहान पणी तुम्ही परीची कहाणी ऐकली असेल. मोठे झाल्यावर तुम्हाला समजले की परी वगैरे काही नसते.. तेव्हा तुम्ही ती नाही हे सिद्ध व्हायची वाट पाहता की आपली सारासार बुद्धी वापरता.. देव संकल्पनेचे तसेच आहे.

 

धर्माबद्दल बोलताना रिचर्ड डॉकिंस म्हणतात धर्मांध लोकांना केवळ झापडबंद अनुयायी हवे असतात जे कशाचा पुरावा मागणार नाहीत, धर्मग्रंथा वर डोळे झाकून विश्वास ठेवतील. असल्या धर्माची आता जरुरी नाही. नव्या युगात प्रेम, शांती, सदाचार हीच मूल्ये जगण्याचा आधार हवीत. निवृत्तीची शिकवण देणारा धर्म हा तुमच्या जिवंत असण्याचा अपमान आहे. 


सत्य हे तुमच्या सोयीचे नसते. ते अनुकूल असेल किंवा प्रतिकूल. ते  सत्य म्हणून सिद्ध झाले तर ते स्वीकारले पाहिजे. उत्क्रांती की केवळ एक संकल्पना आहे असे म्हणता मग गुरुत्वआकर्षण ही पण संकल्पना आहे.  मारता का उंच इमारती वरून उडी.😂😂  लक्षात घ्या आजवरच्या धर्म ग्रंथांनी केवळ पाप पुण्याचा काथ्याकुट केला, मात्र देवीच्या रोगांवर विज्ञानाच्या मुळेच लस मिळाली आहे. 


जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्राध्यापकी करणारे रिचर्ड डॉकिंस आता निवृत्त झाले आहेत. England च्या royal society मार्फत वैज्ञानिकांना दिला जाणारा मायकल फ्यारेडे पुरस्कार निवडण्याच्या समिती मध्ये भाऊ आहेत. याशिवाय भाऊने रिचर्ड डॉकिंस फाऊंडेशन फॉर रिझन अँड सायन्स स्थापन केली असून दर वर्षी नास्तिकता विषयावर काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार आपल्या जावेद अख्तर यांना मिळाला आहे. 


आपल्या सडेतोड भूमिकेमुळे रिचर्ड भाऊ ला अनेक दुश्मन आहेत. नास्तिक मत प्रचारासाठी सगळ्यात जास्त शिव्या खाणारे ते असावेत.  मात्र आपल्या अनोख्या शैली मुळे ते वाद विवादांचा सामना सहजतेने करतात. त्यांचे शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत.  याशिवाय त्यांची उत्क्रांती आणि निरिश्वरवाद यावर व्याख्याने जगभर चालू आहेत. त्यांनी लावलेल्या प्रचाराचा धडाका पाहून  त्यांचे टीकाकार त्यांना militant atheist  म्हणतात. 


तर भारी आहे ना आपला भाऊ.. त्यांची पुस्तके जमेल तशी वाचून काढा. त्याच्या फेसबुक पेज ची लिंक देतो.. भेटा त्यांना तिथे. 

https://m.facebook.com/RichardDawkinsBooks/?locale2=hi_IN


हा त्याच्या वेबसाईट चा पत्ता 

https://www.richarddawkins.net/


गरज लागली तर आपली ओळख सांगा.😀😉 आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका.. 

#richyabhau

Comments

  1. खूपच छान !!!
    आपले अभिनंदन !!!!
    आणि आता आपल्यातल्या खऱ्या व्यक्तीला बघण्याची इच्छा आहे आणि तीही लवकरचं पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  2. रीच्या भाऊ, सबस्क्राइब बटण ठेवा...
    ह्या पेज वरील update मिळण्यास मदत होईल.

    आपलाच वाचक
    Shrisundar.

    ReplyDelete
    Replies
    1. शिकत आहे मी अजून.. झाल्यावर सांगतो

      Delete
  3. खुप छान लेख रिच्या भाऊ.. नास्तिक चळवळ पुढे नेउ !!

    ReplyDelete
  4. तर्कशुद्ध मांडणी ही रिचर्ड भाऊ ची खासियत..
    हे स्वीकारण्याचं जो कोणी धाडस करेल तो आपला ही भाऊ..

    आपण करीत असलेल्या कार्यास सलाम

    ReplyDelete
  5. तर्कशुद्ध मांडणी ही रिचर्ड भाऊ ची खासियत..
    हे स्वीकारण्याचं जो कोणी धाडस करेल तो आपला ही भाऊ..

    आपण करीत असलेल्या कार्यास सलाम

    ReplyDelete
  6. MSc (Genetics) ला असतांना प्रत्येक संकल्पना अभ्यासताना ह्या माणसाच्या तर्कबुद्धीची जाणीव व्हायची

    ReplyDelete
  7. नमस्कार सर ...
    आपले लेखन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रेरक आहे. त्यानिमित्त मला एक fb वर मिळालेल्या video ची लिंक दिली आहे. त्यात दर्शविलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा का ?
    कृपया लिंक उघडून पहावी.
    https://fb.watch/5HizqAx0JD/

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी भंपक प्रकार आहे. फसवणूक आहे

      Delete
  8. नास्तिक मत ठाम पणे मांडणारा विचारक गुरू, मार्गदर्शक, प्रेरक व्यक्तिमत्व

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव