डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका
डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका येल्लाप्रगडा सुब्बाराव हे नाव आपण कदाचित ऐकलं असेल. अर्थात ऐकलं असण्याची शक्यता फार कमी आहे. भारतीय शास्त्रज्ञ म्हणलं की काही मोजकी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, रामन, भाभा, एपीजे अब्दुल कलाम अशी काही लोकप्रिय नावं आपण ऐकलेली असतात, मात्र या नावांच्या यादीत येल्लाप्रगडा सुब्बाराव असं अवघड नाव कधीच नसतं. पण सुब्बाराव यांनी जे शोध लावले आहेत, ते तुम्ही समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की हा खूप मोठा माणूस होता. फॉलिक ॲसिड तसेच किमोथेरपीमध्ये वापरण्यात येणारी औषधं यांवर सुब्बाराव यांचं अतिशय महत्वाचं संशोधन आहे. म्हणूनच जगप्रसिद्ध पत्रकार डोरॉन ऍन्ट्रीम हे ऑर्गोझी या अमेरिकन नियतकालिकामध्ये म्हणतात की, “तुम्ही येल्लाप्रगडा सुब्बाराव हे नाव ऐकलेलं असो किंवा नसो, हा माणूस या जगात येऊन गेला म्हणून आपण आज जिवंत आहोत आणि अधिक आयुष्य जगणार आहोत.” सोरायसिस आणि सेझरी सिंड्रोम यासारख्या आजारांवर भारतातील त्वचारोगतज्ज्ञ मेथोट्रेक्झेट हे औषध सर्रास लिहून देतात. कारण हे औषध स्वस्त आहे आणि परिणामकारक देखील आहे. शिवाय या औषधाला अमेरिकन अन्न आणि...