जेम्स वॉट : व्हॉट अ जेम इन सायंस

जेम्स वॉट : व्हॉट अ जेम इन सायंस वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला?? अहो हे काय विचारणं झालं का.. जेम्स वॉट.. बच्चा बच्चा जानता है. कारण आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी एक गोष्ट ऐकलेली असते. "चहाच्या किटलीवरील झाकण पुन्हा पुन्हा का उडत आहे हा प्रश्न पडलेला जेम्स नावाचा छोटासा मुलगा आधी घाबरतो, त्याला वाटतं नक्कीच किटलीमध्ये भूत आहे. किटलीमध्ये कोंडलेल्या वाफेमध्ये शक्ती असेल असे त्याला सुचते." आपल्याकडे शास्त्रज्ञांच्या संशोधनाला गोष्टीचं रूप दिलं की मुलांना सांगायला सोपं पडतं. (मी सुद्धा अनेक व्याख्यानामध्ये जेम्स वॉटची किटली आणि न्यूटनच्या सफरचंद यांचं उदाहरण दिलं आहे, मात्र आता नाही देणार) खरतर वाफेच्या शक्तीवर चालणारी उपकरणे आपल्याकडे गेल्या दोन हजार वर्षापासून बनवण्यात येत आहेत. वाफेवर वाफेच्या शक्तीवर चालणारे पहिले इंजिन बनवण्याचा मान देखील थॉमस न्यूकोमेन या शास्त्रज्ञाला जातो. मात्र थॉमस न्यूकोमेनच्या इंजिनात आमूलाग्र बदल करून, त्याची उपयुक्तता पाच पटीने वाढवून जेम्स वॉटने औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. निःसंशय जेम्स वॉट हा औद्योगिक क्रांती...