असीमा मुखर्जी चॅटर्जी
असीमा मुखर्जी चॅटर्जी : आणि त्यांची असीम कामगिरी xx गुणसूत्रे घेऊन जन्म झालेली व्यक्ती असो किंवा xy.. व्यक्तीच्या कर्तुत्वाला या गुणसूत्रावरून निसर्गानं बंधनं घातली नाहीत, समाजानं घातली आहेत. हे आजच्या काळातही खरे आहे की xy गुणसूत्रे घेऊन तुम्ही जन्माला आला असाल, तर तुम्हाला तुमचे कर्तुत्व दाखविण्याची अधिक संधी मिळते, अजूनही xx गुणसूत्रे असलेल्या बहुतेक व्यक्तींना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई करावी लागते. त्यातील काहीच ही लढाई जिंकतात. अशा या लिंगभेद करणाऱ्या समाजात शंभर वर्षापूर्वी जन्मलेल्या स्त्रीची कहाणी जाणून घेऊ, विज्ञानाच्या पुरुषप्रधान क्षितिजावर महिलांचं वेगळं स्थान निर्माण करून जी अजरामर झाली आहे. जी भारतीय विज्ञान काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती. भारतीय विद्यापीठामध्ये विज्ञान क्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेली ही पहिली महिला. पद्मभूषण असीमा मुखर्जी चॅटर्जी, सेंद्रिय रसायनशास्त्रात केलेल्या असीम करणारी ही विदुषी, ज्यांनी शोधलेली औषधे कर्करोग, फिट येणे, हिवताप यावरील उपचारासाठी वापरली गेली, काही आजही वापरली जातात. भारताचं नोबेल पारितोषिक समजलं जाणारं शांतीस्वरूप ...