डास दडूनी राहतो

डास दडूनी राहतो कामावरून दमून आल्यानंतर रात्री तुम्हाला कधी एकदा पाठ टेकवता असं झालेलं असतं. घशाखाली कसेबसे दोन घास टाकून तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करता. मोठा दिवा बंद करून छोटा दिवा लावता आणि आपल्या पलंगावर जाता. अशावेळी आपल्या जोडीदाराने काय तरी रोमँटिक गुणगुणावं असं तुम्हाला वाटत असतं.😍 तुम्हाला गुणगुण ऐकू येते मात्र ती रोमँटिक नसते तर धडकी भरवणारी असते. काही सेकंद आधीच तुम्ही बेडरूममध्ये "मच्छर नाही ना" हे पाहिलेलं असतं तेव्हा तो दिसलेला नसतो. कारण "डास दडूनी राहतो, वाट संधीची पाहतो." आणि आता त्याला वाटते हीच ती वेळ, हाच तो क्षण.. चलो पार्टी करे 🤪 तुम्ही या गुणगुणीकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करता. तुम्हाला माहित असतं, की बेडरूममध्ये आणखी एक व्यक्ती आहे, कदाचित डास तिकडं जाईल. किंबहुना तो डास तिकडं जावा अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असता. तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत काढत असता की हा मच्छर तुम्हाला चावणार नाही. मात्र हे खोटं ठरतं. तुमच्या जोडीदाराकडं ढुंकून देखील न पाहता हा मच्छर तुमच्या शरीराचा ताबा घेतो आणि आपलं प्रेमपत्र तुम्हाला पोचवतो. आता त्याचा...