हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री

हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री अभिनेत्र्या आणि त्यांची सुमार बुद्धिमत्ता यावर आपण आजवर अनेक विनोद ऐकले असतील. या अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या असतात अशी पुरूषी मानसिकता त्यामागे असेल. काही वर्षांपूर्वी आलिया भटच्या विनोदांचा तर खूपच मोठा ट्रेण्ड चालला. मात्र मला तर ती खूपच समजदार पोरगी वाटत आली आहे. (आताही रणवीर सिंगच्या फोटोशूट प्रकरणात तिने अतिशय विवेकी भूमिका घेतली आहे.) आपल्या सिनेसृष्ठीतील स्मिता पाटील, शबाना आझमी, दीप्ती नवल यांसारख्या सकस अभिनेत्र्या त्यांच्या विद्वत्तेसाठी आणि सामाजिक भानासाठी प्रसिद्ध आहेतच. "बुद्धी असेल तर सौंदर्य नाही, सौंदर्य असेल तर बुद्धी नाही" अश्या पुरूषी म्हणींना चपराक देणाऱ्या या अभिनेत्र्या. 😘 मात्र अभिनय आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात अचाट कामगिरी करणाऱ्या हेडी लॅमारने सर्व तारकांपेक्षा आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ❤️ आज वाय-फाय आणि ब्ल्यू टूथ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा शोध या अभिनेत्रीने लावला आहे. अशी अभिनेत्री, जिला या पृथ्वीतलावरची सर्वात सुंदर स्त्री असं संबोधलं जायचं. ऑस्कर फॉर इन...