दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का घडतात यामागचं कारण ठाऊक होत असल्यानं या खगोलीय घटनांमागची भीती कमी होत चालली आहे. विशेषतः सूर्यग्रहणामधील वेगवेगळ्या अवस्था पाहण्याचा आनंद आज सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणावर घेत आहे. आपल्याकडं असलेला एकुलता एक चंद्र, पृथ्वी आणि सूर्य आले तर ग्रहणं होतात. मग या सूर्यमालेत इतर ग्रहांना एकापेक्षा जास्त चंद्र आहेत, तिथं ग्रहण घडत असतील का? चला “हा खेळ सावल्यांचा” समजून घेऊ आपला शेजारचा मंगळ, त्याला दोन उपग्रह आहेत. त्यातील फोबोस तर मंगळाभोवती आपली प्रदक्षिणा अर्ध्या दिवसात पूर्ण करतो. दिवसातून दोन वेळा उगवतो, दोन वेळा मावळतो. मात्र त्याचा व्यास अवघा बावीस किलोमीटर असल्यामुळं, आपण जर मंगळावर असु तर केवळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकू. वर म्हणल्याप्रमाणं त्याला उगवायची आणि मावळायची घाई असल्यामुळं हे ग्रहण अवघं तीस सेकंद टिकतं. त्याचा आकार लहान असल्यामुळं ग्रहण होण्याची शक्यता देखील कमी होत जाते. डीमोस हा मंगळाचा दुसरा उपग्रह तर खूपच लहान आहे, आणि तो दुरून फेरी मारत असल्यामुळं तो जरी सूर्याच्या आणि मंगळाच्या मध्ये आला तरी मंगळावरील अभ्...